Login

तू हवीशी भाग २

दीर्घकथा
दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा खूप उत्साहित होती. तिच्या मनात थोडीशी भीती होती, पण त्याचसोबत नवीन संधीची ओढही होती. साक्षी तिला शुभेच्छा देऊन म्हणाली,
"रेवा, तुझ्यासारख्या टॅलेंटेड मुलीला काही भीतीची गरज नाही. तू नक्की निवडली जाशील!"

रेवा स्मितहास्य करत म्हणाली,
"धन्यवाद, साक्षी! आता बघू कसा जातो इंटरव्ह्यू."

रेवा वेळेवर सरनाईक इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. इमारत भव्य आणि देखणी होती. ती रिसेप्शनवर नाव नोंदवून वेटिंग रूममध्ये बसली. तिथेच इतर उमेदवारही होते. रेवा शांत आणि आत्मविश्वासाने भरलेली होती.

थोड्या वेळाने तिचं नाव पुकारलं गेलं,
"Ms. Reva Mehta, please come in."

ती भानावर येऊन आत गेली. समोरच्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती पाहून ती थोडी चमकली. समोर कोण होता तर कालच्या पावसात गार्डनमध्ये तिला पाहणारा विराज सरनाईक! त्याला बघून क्षणभर तिची ताळमेळ हरवला. पण लगेचच तिने स्वतःला सावरलं आणि आत्मविश्वासाने नमस्कार केला.

विराजने देखील तिला ओळखलं. त्याचं मन क्षणभर भूतकाळात हरवलं. पण त्याने प्रोफेशनल अंदाजात विचारले,
"Ms. Mehta, तुमचं बायोडेटा मी पाहिलं आहे. तुम्हाला इथे का काम करायचंय हे सांगा."

रेवाने आपल्या ओळखीचं हास्य करत उत्तर दिलं,
"सर, सरनाईक इंडस्ट्रीज ही फक्त एक कंपनी नाही, तर लोकांना प्रेरणा देणारी संस्था आहे. इथे काम करून मला माझं कौशल्य सिद्ध करायचं आहे आणि तुमच्याशी शिकायची संधी हवी आहे."

विराज तिचं आत्मविश्वासपूर्ण उत्तर ऐकून प्रभावित झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर तो काहीही दाखवत नव्हता. त्याने तिला अजून काही प्रश्न विचारले, आणि रेवा प्रत्येक प्रश्नाला अतिशय हुशारीने उत्तर देत होती. इंटरव्ह्यू संपल्यावर विराजने म्हणालं,
"थँक यू, Ms. Mehta. आम्ही तुम्हाला कळवू."

रेवा बाहेर पडली आणि मनाशीच म्हणाली,
"इंटरव्ह्यू चांगला झाला, पण हा माणूस खूप कडक वाटतोय."

दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा सरनाईक इंडस्ट्रीजमध्ये सिलेक्शनसाठी कॉल येईल या आशेने वाट पाहत होती. इकडे विराज आपल्या टीमशी बोलत होता,
"त्या रेवाची प्रोफाइल मला खूप आशादायक वाटते. ती आमच्या टीमसाठी योग्य वाटते. तिचा सिलेक्शन फायनल करा."


रेवा सरनाईक इंडस्ट्रीजमध्ये सिलेक्शन झाल्याचा कॉल आल्यावर खूप खुश झाली. तिचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं. साक्षीने तिला मिठी मारली आणि आनंद व्यक्त करत म्हणाली,
"आता सरनाईक इंडस्ट्रीजची स्टार बनायचंय हं!"

दुसऱ्या दिवशी रेवा ऑफिसला जायला निघाली. ती खूप उत्साही होती, पण तिच्या मनात थोडीशी भीतीही होती. "विराज सर खूप कडक आहेत," असा विचार तिच्या मनात वारंवार येत होता.

पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये प्रवेश करताच तिला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवला. तिला कॅबिन दाखवून दिलं गेलं, आणि तिचं काम सांगण्यात आलं. रेवा कामाला मनापासून लागली. तिच्या बॉसने म्हणजेच विराज सरांनी पहिल्याच दिवशी तिला एक मोठं प्रोजेक्ट दिलं,
"Ms. Mehta, ह्या प्रोजेक्टसाठी तुम्ही लीड असाल. याचा रिपोर्ट तीन दिवसांत हवा आहे."

रेवा थोडीशी घाबरली होती, पण ती आत्मविश्वासाने म्हणाली,
"सर, मी नक्की काम पूर्ण करून दाखवेन."

तिनं प्रोजेक्टवर मेहनत घेतली. तिचा स्वभाव चुलबुला असला तरी कामाच्या बाबतीत ती खूप प्रामाणिक होती. विराज तिला काम करताना लांबून निरीक्षण करत होता. त्याच्या मनात एकच विचार होता,
"ती हुशार आहे, पण तिचा उत्साह आणि मोकळेपणा मी कधीच पाहिलेल्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा वेगळा आहे."

तीन दिवसांनी रेवानं प्रोजेक्ट पूर्ण करून त्याचा रिपोर्ट सादर केला. विराजने तो रिपोर्ट बारकाईने पाहिला आणि म्हणाला,
"चांगलं काम केलं आहे. पण पुढच्या वेळी थोडं डिटेलिंग हवं. Keep it up."

रेवा खुश झाली, पण त्याचवेळी तिला जाणवलं की, विराज फार कमी बोलतो, नेहमी गंभीर राहतो. तिने मनाशी ठरवलं,
"सर कितीही कडक असले तरी त्यांना हसायला लावायचंय. बघू या कसं ते!"

पुढील काही दिवस…

रेवाच्या मोकळ्या स्वभावाने आणि कामातल्या चपळतेने ऑफिसमधले सगळे तिचे चाहते बनले. ती सगळ्यांशी हसून, खेळून बोलायची. मात्र विराजसोबत तिचा संवाद नेहमी प्रोफेशनल स्वरूपात असायचा.

एका दिवशी ऑफिसमध्ये एका मोठ्या प्रोजेक्टसाठी टीम मीटिंग होती. विराजने प्रोजेक्टचं महत्त्व समजावून सांगितलं,
"हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी निर्णायक ठरेल. चुकांसाठी जागा नाही. सर्वांनी मन लावून काम करायचं आहे."

रेवा म्हणाली,
"सर, काळजी करू नका. आपण ही डेडलाईन फोडून टाकू!"

सगळे हसले, पण विराज तिला एक गंभीर नजर देऊन म्हणाला,
"Ms. Mehta, हे गमतीचा विषय नाही."

रेवाचं तोंड उतरलं. तिने स्वतःला शांत ठेवलं, पण मनाशी ठरवलं,
"सर, तुम्हाला हसायला लावूनच सोडेन."

एका संध्याकाळी…

काम संपवून रेवा लिफ्टजवळ थांबली होती. अचानक लिफ्ट बंद पडली, आणि त्यात विराजही तिच्यासोबत अडकला. दोघेही थोडं अस्वस्थ झाले. रेवा बोलायचा प्रयत्न करत होती,
"सर, पाऊस खूप छान ना! तुम्हाला पाऊस आवडतो?"

विराज शांत राहिला. रेवा हसून म्हणाली,
"तुम्ही किती बोरिंग आहात, सर! असं हसून-खेळून जगायला शिका."

विराजने हलकंसं स्मितहास्य केलं, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला,
"Ms. Mehta, मला फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवायला आवडत नाही."

पण त्याच्या चेहऱ्यावरचं हलकं स्मित पाहून रेवा खुश झाली. तिने मनाशीच विचार केला,
"हा माणूस आतून वेगळाच आहे. फक्त त्याच्या अवघडपणाचं कवच भेदायचं आहे."

पुढे हळूहळू…

रेवाच्या चुलबुल्या स्वभावामुळे विराजचा कठोरपणा थोडा कमी होऊ लागला. ती छोटी-छोटी गंमती करून त्याला हसवायचा प्रयत्न करायची, आणि कधीतरी तो नकळत हसायचा. ऑफिसमधल्या सगळ्यांना त्यांच्या भिन्न स्वभावाचा कळत-नकळत संवाद आवडू लागला.