Login

तू माझे काळीज भाग-2

आशुतोष भूतकाळातील प्रेमाच्या आठवणीत हरवलेला असतो, पण अनुगत त्याला जगायला बळ मिळतं.शोधाच्या प्रवासात त्याला धक्कादायक सत्य कळतं
तू माझे काळीज
भाग – 2

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

आशुतोषची मिटिंग झाली. तो केबिनमध्ये बसला होता.

जुने दिवस त्याला आठवत होते
'कॉलेजला आपण किती छान दिवस घालवले. किती फिरलो, एकाच क्लासमध्ये होतो. पिकनिकला पण गेलो. पावसात भिजलो. तुझी खूप आठवण येते ग, तुझ्याशिवाय कोणाचा कसा विचार करू? तू कुठे आहेस? सगळीकडे शोधलं पण तू कुठेच भेटली नाहीस. एकदा तरी समोर ये, का मला असा त्रास देतेस?'तो तिच्या आठवणीत रमला होता.तेवढ्यात समीर त्यांच्या केबिनमध्ये आला. बराच वेळ समोर बसला होता, पण आशुतोषचे लक्ष नव्हते.

“आशु... आशु...” शेवटी समीरने हाक मारली.

आशुतोष विचारातून बाहेर आला.
“समीर, तू केव्हा आलास?” आशुतोष म्हणाला.

“तुला मित्राची आठवण येत नाही, पण आम्हाला येते. म्हणून तुला भेटायला आलो,” समीर म्हणाला.
आशुतोष काही बोलला नाही.

“आशु, किती वर्ष तिची वाट बघणार आहेस? ती गेली. आणि तू आमच्यापासून दूर झालास. मला माहिती आहे, तिची आठवण येईल म्हणून तू आम्हाला भेटायलाही येत नाहीस,” समीर तक्रार करत म्हणाला.

“मी तिला नाही रे विसरू शकतं म्हणून स्वतःला कामात गुंतवून घेतलं,” आशुतोष म्हणाला.

“तुमच्यामध्ये काही भांडण झालं होतं का?” समीरने विचारलं.

“भांडण होण्यासाठी ती यायला तरी हवी होती ना,” आशुतोष शांतपणे म्हणाला.

“म्हणजे?” समीर चकित झाला.

“आम्ही भेटायचं ठरवलं होतं पण ती मला भेटायलाच आली नाही. मी चार–पाच तास तिथे बसून राहिलो. सगळे मला वेड्यासारखं बघत होते. नंतर मी तिथून घरी निघून गेलो. घरी तर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. अनु तर तेव्हा दोन वर्षांची होती. चाचूच्या लग्नात नाचायचं म्हणाली होती, आणि खूप गोड नाचलीदेखील...” आशुतोष आठवणींमध्ये हरवून म्हणाला.

“हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. तुमचं कधी भेटायचं ठरलं होतं?” समीरने विचारलं.

“तुला सगळं सांगतो...” आशुतोष म्हणाला.

“कॉलेज संपल्यानंतर तुम्ही नोकरी शोधायला लागलात. मी मात्र बाबांचा बिझनेस सांभाळणार होतो. मला नोकरीचं काही टेन्शन नव्हतं.

मी आणि प्रियांका (प्रिया) भेटायचं ठरवलं होतं. ती इंटरव्ह्यूला जाणार होती...”


फ्लॅशबॅक;

“मी तिला कॉल केला,” आशुतोष सांगू लागला.
तिने लगेच उचलला.

“हॅलो आशु,” प्रिया म्हणाली.

“हॅलो प्रियु, मला आज भेटायला ये,” आशुतोष म्हणाला.

“अरे, मला आज इंटरव्ह्यूला जायचं आहे. खूप मोठी कंपनी आहे. मला हा चान्स सोडायचा नाहीये,” प्रिया म्हणाली.

“तू मला भेटायला ये, मी तुला त्या कंपनीत सोडून देईन,” आशुतोष हट्टाने म्हणाला.

“तू माझं काहीच ऐकणार नाही आहेस का?” प्रिया वैतागत म्हणाली.

“प्लीज, मला भेटायला ये. मला तुला बघायचं आहे, तुझ्याशी बोलायचं आहे,” आशुतोष लहान मुलांसारखा हट्ट करू लागला.

“बरं येते, तू अगदी मुलांसारखा वागतोस,” प्रिया हसत म्हणाली.आशुतोषही हसला.

“आता कॉल कट करते, तयार होऊन येते,” प्रिया म्हणाली आणि तिने फोन कट केला.त्यानंतर मी तिची सिटी पार्कमध्ये वाट बसलो होतो... तिची वाट बघतं.


क्रमशः
दिपाली चौधरी
0

🎭 Series Post

View all