Login

तू माझे काळीज भाग-3

आशुतोष भूतकाळातील प्रेमाच्या आठवणीत हरवलेला असतो, पण अनुगत त्याला जगायला बळ मिळतं.शोधाच्या प्रवासात त्याला धक्कादायक सत्य कळतं
तू माझे काळीज
भाग – ३

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

वर्तमान;

"चार–पाच तास तिथेच बसलो होतो. लोक येत होते, जात होते. तरी मी तिथेच बसलो होतो. खूप वेळ वाट बघूनही ती आली नाही. मग मी घरी निघून गेलो. त्यानंतर तिला खूप शोधलं. तिच्या घराच्या खूप फेऱ्या मारल्या. तिच्या मैत्रिणींना पण विचारलं. पण कोणालाच काही माहिती नव्हतं. " आशुतोष म्हणाला.

समीर विचार करायला लागला.
“आशुतोष, टीनाला विचारलंस का? तिला सगळं माहिती असतं. ती आपल्या कॉलेजची खबरी होती,” समीर म्हणाला.

“तिचं लग्न झालं आहे. हे मी ऐकलं, म्हणून तिच्या घरी गेलो नाही,” आशुतोष म्हणाला.
समीर काही बोलणार इतक्यात दरवाजा वाजला.

“कम इन,” आशुतोष म्हणाला.

ऑफिस बॉय आत आला.
“रमेश, काय झालं?” आशुतोष म्हणाला.

“सर, तुमच्या नावाचं हे आलं आहे,” रमेश म्हणाला.

काही तरी इन्व्हलप होतं. आशुतोषने ते उघडलं.
“बिझनेस इव्हेंटचं आमंत्रण आहे,” तो म्हणाला.

“तू नक्की जा. तुला तिथे प्रिया पण भेटू शकते,” समीर म्हणाला.

“जाईन, उद्याच आहे,” आशुतोष म्हणाला.

समीर आणि आशुतोष थोडावेळ बोलत राहिले. नंतर समीर निघून गेला. आशुतोष पुन्हा आपल्या कामाला लागला.

थोड्यावेळाने आशुतोषचे बाबा त्यांच्या केबिनमध्ये आले.
“आशु, चलायचं,” ते म्हणाले.

आशुतोषने घड्याळाकडे पाहिलं.
“किती वेळ निघून गेला, कळलंच नाही. हो बाबा, निघूया,” आशुतोष म्हणाला. त्याने लॅपटॉप बंद केला आणि बाबांसोबत निघाला.दोघेही घरी आले.
अनु खेळत होती. ती शाळेतून आल्यावर आधी अभ्यास करून झाली होती.

आशुतोष दिसताच ती पळत त्याच्याकडे गेली.
“चाचू… तुला काहीतरी सांगायचं आहे,” अनु म्हणाली.

“काय सांगायचं आहे? आज शाळेत कायं केलंस? अभ्यास केला का?” आशुतोष विचारत म्हणाला.

“मी शाळेतून आल्यावर आईने अभ्यास घेतला. खाल्लंही आहे. आता खेळत होते. आज आमच्या शाळेत आश्रमातील मुलं आली होती. त्यांच्यासोबत त्यांची ताई पण होती. ती खूप छान होती. आमच्यासोबत खेळली, बोलली, आणि खूप छान गोष्टी सांगितल्या,” अनु आनंदाने म्हणाली.

“खूप मजा केली आहेस वाटतं. छान गोष्टी ऐकल्या आहेस ना, मला पण सांगायच्या आहेत,” आशुतोष म्हणाला.

“त्या ताईचं नाव कायं होतं?” आशुतोषची आई विचारतात.

“प्रियांका नाव होतं,” अनु म्हणाली.

“मी फ्रेश होऊन येतो. आईला , चहा करायला सांग,” आशुतोष म्हणाला आणि आपल्या रूममध्ये गेला.
आशुतोषची आईही किचनमध्ये गेली.

“अनु कोणत्या प्रियांकाबद्दल बोलत होती? तीच प्रिया असेल का?” आशुतोष मनात म्हणाला आणि बाथरूममध्ये गेला.

“तुम्ही आशुसोबत बोललात का?” आशुतोषची आई विचारते.

“मी बोललो पण तो त्या मुलीचाच विचार करत असतो. त्याला त्या मुलीसोबतच लग्न करायचं आहे,” आशुतोषचे बाबा म्हणाले.

“मी या मुलाचं काय करू?” आशुतोषची आई चिंतेने म्हणाली.

“आई-बाबा, मी काही बोलू का?” अनुची आई म्हणाली.

“हो, बोल. तुला काय सांगायचं आहे?” दोघेही म्हणाले.