तू माझे काळीज
भाग – ५ (अंतिम भाग)
भाग – ५ (अंतिम भाग)
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
आशुतोषने ऑफिसचे काम पूर्ण केले. बाबांना सांगून तो संध्याकाळी सहा वाजता ऑफिसमधून इव्हेंटला जायला निघाला.
प्रियांका पण तयार होत होती. ती यशसोबत जाणार होती. यशलाही आमंत्रण आले होते. त्यांचा आश्रम होता, जो आधी त्याची आई पाहायची, आता प्रियांका सांभाळत होती.
यश हा प्रियांकाचा बालपणापासूनचा मित्र होता. प्रियांकाला आशुतोषसमोर जायचं नव्हतं, म्हणून ती यशसोबत राहत होती.
"प्रियांका, झाले का? आपल्याला उशीर होईल," यश म्हणाला.
"झाले आहे, आलेच," प्रियांका म्हणाली. ती बाहेर आली तेव्हा खूप सुंदर दिसत होती. तिने पर्पल रंगाचा ड्रेस घातला होता आणि केस मोकळे सोडले होते.
"झाले आहे, आलेच," प्रियांका म्हणाली. ती बाहेर आली तेव्हा खूप सुंदर दिसत होती. तिने पर्पल रंगाचा ड्रेस घातला होता आणि केस मोकळे सोडले होते.
यश तिच्याकडे पाहत होता. त्याला प्रियांका आवडत होती, पण तिच्या मनात दुसरा कोणी आहे म्हणून त्याने कधीच व्यक्त केले नव्हते. ती त्याच्यासोबत आहे, एवढ्यातच तो आनंदी होता.
दोघे इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचले.आशुतोष आधीच तिथे आला होता. तो ओळखीच्या लोकांशी गप्पा मारत होता. अचानक त्याचे हृदय जोराने धडधडू लागले. त्याला कळेना असे का होत आहे.
प्रियांका आत आली होती.आशुतोषने नजर इकडे-तिकडे फिरवली. त्याला समोर प्रिया यशसोबत दिसली. आधी तर त्याला राग आला प्रिया कोणासोबत तरी आहे! पण लगेच विचार बदलला कदाचित तो फक्त मित्र असेल.
तो तिच्याजवळ गेला.प्रिया पण त्याच्याकडे पाहत होती, पण लगेच नजर चोरली.
"प्रिया, कशी आहेस? कुठे होतीस? तुला किती शोधलं!" आशुतोष भावुक होऊन म्हणाला.
"मी मस्त आहे. तू कसा आहेस? मला का शोधत होतास?" प्रिया शांतपणे म्हणाली.
"मी मस्त आहे. तू कसा आहेस? मला का शोधत होतास?" प्रिया शांतपणे म्हणाली.
"प्रियांका, हा कोण आहे? तीन-चार वर्षांत मी याला पाहिलं नाही," यश विचारतो.
"मी आशुतोष," आशुतोष स्वतःची ओळख करून देतो.
"मी आशुतोष," आशुतोष स्वतःची ओळख करून देतो.
यश त्यांच्या दोघांकडे पाहत होता. हा पण बिझनेसमॅन आहे. मग प्रियांका याच्यासोबत का नाही आहे? तिला नेहमी स्वप्न पडतं, कदाचित काही घडलं असेल का? यश मनाशी म्हणाला.
आशुतोषने प्रियाचा हात धरला.
"प्रिया, तू मला का सोडून गेलीस? तुझ्याशिवाय मी कसे दिवस काढले, हे फक्त मलाच माहिती आहे. आता तू भेटली आहेस, तर मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे," तो ठामपणे म्हणाला.
प्रियाने हात झटकून घेतला आणि बाहेर निघून गेली.
यश तिच्या मागे जायला निघाला, पण आशुतोषने त्याला थांबवलं आणि स्वतः तिच्या मागे गेला.
यश तिच्या मागे जायला निघाला, पण आशुतोषने त्याला थांबवलं आणि स्वतः तिच्या मागे गेला.
ती गाडीजवळ रडत उभी होती.
"प्रिया, का रडतेस?" आशुतोष तिचे डोळे पुसत म्हणाला. "मला सांगू शकत नाहीस का? मी तुझी खूप वाट पाहिली आहे. आता तुला दूर करायचं नाही."
"प्रिया, का रडतेस?" आशुतोष तिचे डोळे पुसत म्हणाला. "मला सांगू शकत नाहीस का? मी तुझी खूप वाट पाहिली आहे. आता तुला दूर करायचं नाही."
"मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आहे," प्रिया रडत म्हणाली.
"पण तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस. तुझ्या डोळ्यांत ते स्पष्ट दिसत आहे. मग असे का म्हणतेस?" आशुतोष विचारतो.
"मी तुझ्यासाठी योग्य नाही आहे," प्रिया म्हणाली.
"कशावरून?" आशुतोष चकित झाला.
"पण तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस. तुझ्या डोळ्यांत ते स्पष्ट दिसत आहे. मग असे का म्हणतेस?" आशुतोष विचारतो.
"मी तुझ्यासाठी योग्य नाही आहे," प्रिया म्हणाली.
"कशावरून?" आशुतोष चकित झाला.
"मी तुला बाबा होण्याचं सुख देऊ शकत नाही," प्रिया अश्रूंनी म्हणाली.
आशुतोष काही क्षण थबकला. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला.
"तुला लहान मुलं खूप आवडतात म्हणून मीच तुझ्या आयुष्यातून निघून गेले," प्रिया म्हणाली.
"तुला लहान मुलं खूप आवडतात म्हणून मीच तुझ्या आयुष्यातून निघून गेले," प्रिया म्हणाली.
"तुझ्यासोबत कायं झालं? तुला कसं कळलं की तू आई होऊ शकत नाहीस?" आशुतोष विचारतो.
"त्या दिवशी तुला भेटून मी घरी गेले. मला इंटरव्ह्यूला जायचं होतं. इंटरव्ह्यू छान झाला आणि नोकरी मिळाली. मी खूप आनंदी होते. तुला सांगायला उत्सुक होते, पण रस्त्यात माझा अपघात झाला. पोटाला मार लागला. पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले.
डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या आणि त्यात समजलं की मी कधीच आई होऊ शकत नाही. ही गोष्ट समजल्यावर आईला धक्का बसला आणि हार्ट अटॅक आला…ती गेली
तेव्हा यश मला भेटला. तो कोणाला भेटायला आला होता. त्याने मला विचारलं आणि मी त्याच्यासोबत त्यांच्या घरी गेले. त्यांचा आश्रम होता. तेथे मी राहायला लागले," प्रिया म्हणाली.
तेव्हा यश मला भेटला. तो कोणाला भेटायला आला होता. त्याने मला विचारलं आणि मी त्याच्यासोबत त्यांच्या घरी गेले. त्यांचा आश्रम होता. तेथे मी राहायला लागले," प्रिया म्हणाली.
आशुतोषच्या डोळ्यांत पाणी आले.
"तू एक कॉल तरी करायचा होता…" तो भावुक होऊन म्हणाला.
"मला कॉन्टॅक्ट ठेवायचाच नव्हता. तू मला विसरून दुसऱ्या मुलीसोबत सुखात रहावा म्हणून…" प्रिया म्हणाली.
"मला आताच तुझ्यासोबत लग्न करायचं आहे!" आशुतोष ठामपणे म्हणाला.
"आशु, मी तुला सांगितलं ना, मी आई होऊ शकत नाही," प्रिया म्हणाली.
"आपण मुलं दत्तक घेऊ. मला फक्त तू हवी आहेस. बाकी काही फरक पडत नाही," आशुतोष म्हणाला.
"आशु, मी तुला सांगितलं ना, मी आई होऊ शकत नाही," प्रिया म्हणाली.
"आपण मुलं दत्तक घेऊ. मला फक्त तू हवी आहेस. बाकी काही फरक पडत नाही," आशुतोष म्हणाला.
तेवढ्यात यशही आला.
"प्रिया, तू आशुतोषसोबतच लग्न कर. माझ्यासोबत असूनही तू मला काहीच सांगितलं नाहीस," यश म्हणाला.
"काय सांगणार होते?" प्रिया शांतपणे म्हणाली.
"बरं, आता ते जाऊ दे. तुम्ही दोघं आनंदात राहा," यश हसून म्हणाला.
"प्रिया, तू आशुतोषसोबतच लग्न कर. माझ्यासोबत असूनही तू मला काहीच सांगितलं नाहीस," यश म्हणाला.
"काय सांगणार होते?" प्रिया शांतपणे म्हणाली.
"बरं, आता ते जाऊ दे. तुम्ही दोघं आनंदात राहा," यश हसून म्हणाला.
आशुतोष प्रियाला घरी घेऊन गेला. आई-बाबांनाही प्रिया खूप आवडली. अनु तर प्रियाला सोडायलाच तयार नव्हती.
तिच्या आश्रमातली "ताई" म्हणजे प्रियांका हे उघड झाल्यावर सगळे आनंदी झाले.
तिच्या आश्रमातली "ताई" म्हणजे प्रियांका हे उघड झाल्यावर सगळे आनंदी झाले.
फक्त एका महिन्यात त्यांचं लग्न झालं…
समाप्त
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा