तू माझे काळीज
भाग – ४
भाग – ४
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
"आशुतोष आणि तृप्तीची जोडी कशी वाटेल? बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं," अनुची आई म्हणाली.
"पण आशुतोष त्या दुसऱ्या मुलीच्या मागे आहे म्हणून मी काही बोलले नाही. त्याच्या मनात अजूनही तीच आहे. ती त्याच्या मनातून काढावी लागेल. तू तृप्तीला बोलावून घे, आपण बघू," आशुतोषची आई म्हणाली.
अनुची आई लगेच तृप्तीला मेसेज करते "उद्या ये."
तृप्ती लगेच ऑनलाईन येते आणि "ओके" असा रिप्लाय देते.
तृप्ती लगेच ऑनलाईन येते आणि "ओके" असा रिप्लाय देते.
दरम्यान, आशुतोषने सगळे विचार बाजूला ठेवले. बाहेर आला, सगळ्यांशी गप्पा मारल्या. जेवण झाले आणि सगळे आपल्या रूममध्ये निघून गेले.
आशुतोष रूममध्ये मोबाईल बघत होता. त्याला काही मेल आले होते. खूप वेळ तो मेल्स चेक करत राहिला. नंतर मोबाईल ठेवून झोपून गेला.
प्रियांका दचकून उठली. घामाने पूर्ण भिजली होती. ती उठून बसली.
तिचा आवाज ऐकून यश लगेच तिच्या रूममध्ये आला.
तिचा आवाज ऐकून यश लगेच तिच्या रूममध्ये आला.
"प्रियांका, कायं झाले?" यश काळजीने म्हणाला.
"नेहमीचेच स्वप्न पडलं. बाकी काही नाही. तू झोप, मी पण झोपते," प्रियांका म्हणाली.
"तुला लगेच झोप लागेल का?" यश विचारतो.
"आज लागेल. मुलांसोबत छान वेळ गेला," ती हसून म्हणाली.
"आज लागेल. मुलांसोबत छान वेळ गेला," ती हसून म्हणाली.
"उद्या आपण इव्हेंटला जायचं आहे," यश म्हणाला. तिच्या डोक्यावर हात ठेवून तो बाहेर गेला.
"मी पण झोपते," प्रियांका म्हणाली आणि झोपायचा प्रयत्न करू लागली.
"मी पण झोपते," प्रियांका म्हणाली आणि झोपायचा प्रयत्न करू लागली.
सकाळी आशुतोष उठला. आवरून तयार होत असताना अनु त्याला बोलवायला आली.
"चाचू... तुला एक मुलगी भेटायला आली आहे," अनु म्हणाली.
"चाचू... तुला एक मुलगी भेटायला आली आहे," अनु म्हणाली.
"कोण आले आहे?" आशुतोषने विचारले.
"तृप्ती मावशी आली आहे," अनु म्हणाली.
"तृप्ती मावशी आली आहे," अनु म्हणाली.
"चला, आपण तिच्याशी बोलू," आशुतोष म्हणाला. अनुचा हात धरून तो बाहेर आला.
तृप्ती त्याच्याजवळ आली.
"हॅलो आशुतोष, कसा आहेस?" तृप्ती म्हणाली.
"हॅलो तृप्ती, मी मस्त आहे. तू इथे कशी कायं आलीस?" आशुतोष म्हणाला.
"मी पण मस्त आहे. अशीच भेटायला आले," तृप्ती म्हणाली.
"हॅलो आशुतोष, कसा आहेस?" तृप्ती म्हणाली.
"हॅलो तृप्ती, मी मस्त आहे. तू इथे कशी कायं आलीस?" आशुतोष म्हणाला.
"मी पण मस्त आहे. अशीच भेटायला आले," तृप्ती म्हणाली.
"आशु, नाश्त्याला ये," आशुतोषची आई म्हणाली.
सगळे मिळून नाश्ता करायला बसले.
सगळे मिळून नाश्ता करायला बसले.
"तृप्ती, तू पण नाश्ता करून घे," त्या म्हणाल्या.
नाश्त्यानंतर अनुचे आई-बाबा आणि आशुतोषचे बाबा पण आले.
नाश्त्यानंतर अनुचे आई-बाबा आणि आशुतोषचे बाबा पण आले.
आशुतोषची आई मग त्याच्याजवळ आली आणि म्हणाली
"आशु, आम्ही तुझ्यासाठी तृप्तीला पसंत केलं आहे. आम्हाला ती खूप आवडली आहे. तू पण तिच्यासोबत बोल आणि तिच्याशी लग्न कर."
"आशु, आम्ही तुझ्यासाठी तृप्तीला पसंत केलं आहे. आम्हाला ती खूप आवडली आहे. तू पण तिच्यासोबत बोल आणि तिच्याशी लग्न कर."
"आई, किती वेळा सांगितलं आहे तुला मी प्रियाशीच लग्न करणार. आधीच स्पष्ट सांगितलं ना!" आशुतोष चिडून म्हणाला.
"किती दिवस तिच्यासाठी थांबणार आहेस? आहे की नाही तिचा काही पत्ता? आम्हाला वाटतं तुझं लग्न आता व्हायला हवं. एवढं कायं तिच्यात सोनं लागलं आहे का?" आई चिडून म्हणाल्या.
"तुम्ही काहीही बोला, मी प्रियाशीच लग्न करणार. गरज पडली तर तिला शोधून आणीन सुद्धा!" आशुतोष ठामपणे म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला.
तृप्ती रडत-रडत तिच्या घरी निघून गेली.
"आशु ऐकत का नाही?" आई म्हणाल्या.
"मी तुला आधीच सांगितलं होतं पण तूच ऐकत नाहीस," बाबा शांतपणे म्हणाले आणि रूममध्ये निघून गेले.
"मी तुला आधीच सांगितलं होतं पण तूच ऐकत नाहीस," बाबा शांतपणे म्हणाले आणि रूममध्ये निघून गेले.
आशुतोष ऑफिसला जायला तयार झाला. घरात तो काहीच बोलला नाही. बाबांसोबत ऑफिसला निघून गेला. तिथून त्याला इव्हेंटला जायचं होतं.
दोघेही ऑफिसकडे निघाले.
"आजी, चाचूला ज्या मुलीसोबत लग्न करायचं आहे, तिच्यासोबत करू दे ना," अनु म्हणाली.
अनुची आई तिला शांत करत तिथून घेऊन गेली.
अनुची आई तिला शांत करत तिथून घेऊन गेली.
क्रमशः..
दिपाली चौधरी
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा