तू माझ्या स्वप्नांचा पारिजात......
भाग 1 :
आर्मी ऑफिसर यांनी घडी घातलेला तिरंगा साक्षीच्या हातावर ठेवला, आणि इतके वेळ, गेले सात-आठ दिवस ठेवलेला संयम, एकवटलेले धैर्य, हिम्मत सगळे संपले. तिच्यामधील वीर पत्नीची जागा, मैत्रीण,प्रेयसी जीवनसाथीने घेतली.
" कौस्तुभ, बघ रे तुझं पहिलं प्रेम, तुझा जीव, तुझा सन्मान, तुझा प्राणप्रिय तिरंगा माझ्या हातात आहे. बघ... एकदा तरी डोळे उघडून बघ... रेवाच्या वाढदिवसासाठी येणार होतास ना तू?? किती वाट बघत होतो रे आम्ही तुझी... तू आलास पण असे? खूप बोलायच आहे रे कौस्तुभ तुझ्यासोबत. बोल ना रे एकदा माझ्याशी.... "
साक्षीचा दुःख आवेग उपस्थित प्रत्येकाचा हृदय पिळवटून टाकत होता. साक्षी कौस्तुभ ची आई वडील, यांचे दुःख आक्रोश सांत्वनाने थांबण्यासारखे नव्हते. चार वर्षाच्या चिमुकल्या रेवाला मात्र हे सगळे काय चालू आहे हे समजण्या पलीकडे होते.
तिचा लाडका डॅडा झोपलेला आहे. मम्मा ,आजी, आजोबा, आतू सगळेच का रडत आहेत? हे तिला कळतच नव्हते.
आपल्या इवल्या हातांनी साक्षीचे डोळे पुसत, ती साक्षीला समजावत होती,
" तू रडू नकोस ना मम्मा , डॅड झोपला आहे ना. तूच म्हणते ना कोणी झोपलं तर उठवायचं नाही. मग नको ना झोप मोडू डॅडाची. तो उठला की मी सांगते त्याला तुझ्यासाठी कॅडबरी आणायची. "
रेवाच्या या बोलण्याने यांच्याच काळजाला घरे पडत होते.
कौस्तुभ भारतीय लष्करात कॅप्टन पदावर कार्यरत होता. तो भारत पाकिस्तान सीमेलगत काश्मीर बॉर्डर वर काम करत होता.
भारत पाकिस्तानची बॉर्डर म्हणजे ताण तणाव....
बॉर्डर म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न......
बॉर्डर म्हणजे अनपेक्षित हल्ले....
बॉर्डर म्हणजे ऊन वारा पाऊस भूक तहान याची पर्वा न करता, तासन् तास डोळ्यात तेल घालून पहारा देत राहणे.. ....
बॉर्डर म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न......
बॉर्डर म्हणजे अनपेक्षित हल्ले....
बॉर्डर म्हणजे ऊन वारा पाऊस भूक तहान याची पर्वा न करता, तासन् तास डोळ्यात तेल घालून पहारा देत राहणे.. ....
याच बॉर्डरवर मागील सात-आठ महिन्यांपासून कौस्तुभ तैनात होता.
लहानपणापासूनच देशभक्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या कौस्तुभने मातृभूमीची सेवा करण्यासाठी भारतीय लष्कराचे क्षेत्र निवडले.
बाल वर्गात असताना पासूनचे,
" शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव देश अन धर्मासाठी....
प्राण घेतलं हाती..... "
" शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव देश अन धर्मासाठी....
प्राण घेतलं हाती..... "
हेच त्याचं आवडतं गीत! वेशभूषा स्पर्धा असो, नाटिका असो वा गीत गायन स्पर्धा. कौस्तुभ लष्कराच्या वेषातच असणार, आणि हेच गीत गाणार,
काळ्या दगडावरची रेघ असायची.
काळ्या दगडावरची रेघ असायची.
तो साक्षीला नेहमी म्हणायचा ,
" माझ्या आयुष्यात माझा देश सर्वात आधी आहे. देशच माझा श्वास आणि ध्यास आहे. तू आणि रेवा देखील देशानंतर आहात. "
यावर साक्षी गमतीने म्हणे,
" जाऊदे, कौस्तुभ उगाच लग्न केले आपण. तू काही देशभक्ती आणि लष्करा शिवाय राहू शकत नाही. मला मात्र लष्करातील हे हातावर प्राण घेऊन जगणे आवडत नाही.
माझ्यासाठी मात्र तूच माझा देव, तूच माझा श्वास, आणि तूच माझा ध्यास आहेस. "
यावर दोघांची शब्दांची भाषा संपून, ऐकमेकांच्या उबदार मिठीत त्यांना जगाचा विसर पडत असे.
मागच्या वेळी बॉर्डर वर जाताना साक्षीने कौस्तुभ चे औक्षण केले आणि परत सुखरूप येण्याची ताकीद दिली होती. त्यानेही सुखरूपच येईल , असे वचन साक्षीला दिले.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पुन्हा हे सौख्य , हे सौभाग्य ,हे प्रेम , त्यांच्या झोळीत पडणारे नव्हते. ती भेट, तो स्पर्श शेवटचा ठरेल, हे त्या अखंड प्रेमात बुडालेल्या जीवांच्या ध्यानी मनी ही नव्हते.
एका सैनिकाच्या पत्नीचे आयुष्य देखील , सैनिकाच्या आयुष्यासारखे बेभरवशाचे असते. आपलं सौभाग्य परत दिसणार की नाही , याची शाश्वती नाही. खरी हिम्मत ,खरे धैर्य, खरा त्याग फक्त एका सैनिक पत्नीकडेच असतो.
तिच्या त्यागामुळेच , तिच्या रात्र रात्र जागून काढण्यामुळेच इतर स्त्रिया सुखाची झोप घेऊ शकतात.
कौस्तुभ परत येणार याच विश्वासावर, त्याच्या विरहात रात्र रात्र जागून काढणाऱ्या साक्षीला त्याचे हे 'असे 'येणे मान्य नव्हते.
तिचा श्वास , तिचा ध्यास, तिची जगण्याचे आस आज तिला सोडून गेली होती.
तिचा श्वास , तिचा ध्यास, तिची जगण्याचे आस आज तिला सोडून गेली होती.
आयुष्यभर साथ देण्याचं, सोबत राहण्याचं वचन कौस्तुभने अर्ध्यावरच तोडले होते. अंत्यविधी झाला, लष्करी अधिकारी मंत्री, सगळे हितचिंतक सांत्वन करून निघून गेले. दहा-बारा दिवस थांबून नातलग मंडळी देखील निघून गेली. वर्तमानपत्रासाठी देखील कौस्तुभ ची बातमी मागे पडली.
पण कौस्तुभ च्या आई-बाबा आणि साक्षी यांच्यासाठी हे जग थांबले होते. एक भयानक पोकळी त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती.
छोट्या रेवाला मात्र डॅड झोपला होता तो आजारी आहे, त्याला गोळी लागली म्हणून पेटीत ठेवून दवाखान्यात नेले. आणि तो लवकर बरा होऊन घरी येणार आहे. हेच माहीत होते. पण मम्मा, आजी आजोबा सगळेच सारखं का रडतात याचे उत्तर मात्र तिला सापडत नव्हतं.
कौस्तुभ ची काश्मीरच्या बॉर्डरवर कॅप्टन पदी नियुक्ती झाली आणि सगळेच बदलून गेले. घरात सतत काळजी, चिंता , रात्री अपरात्री आलेल्या कॉल्समुळे वाढणारी धडधड, कौस्तुभ सोबत कधी बोलणे न झाल्यास जाणारी मनाची हुरहुर ती प्रत्येक आणि अनुभवत होती.
कौस्तुभ आता परत आला जाताना मात्र ती त्याच्यासोबतच जाणार होती . त्याला अजिबात एकटे सोडणार नव्हती. त्याची पोस्टिंग पंधरा दिवसानंतर अहमदाबाद येथे होणार होती.
आणि मग रेवा कौस्तुभ आणि साक्षी यांचे त्रिकोणी कुटुंब सहजीवनाचे सुख अनुभवणार होते. पण दोन दिवसांपूर्वी लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. कौस्तुभ आणि त्याच्या टीमने या भ्याड हल्ल्याला चोख प्रतिउत्तर दिले. पण दुर्दैवाने हल्लेखोरांची एक गोळी कौस्तुभ ला लागली. त्याही अवस्थेत कौस्तुभने दहशतवाद्यांचा पाठलाग केला. पाठलाग करताना कौस्तुभही बेपत्ता झाला. सर्वांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण कोणालाच यश येत नव्हते.
रात्री मात्र गस्त घालणाऱ्या एका जवानाला, दाट झाडाच्या मागे काहीतरी मानवी आकृती सारखे दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले तर कॅप्टन कौस्तुभ!
सैनिकांनी ताबडतोब कौस्तुभला लष्करी इस्पितळात दाखल केले. पण त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती. जखमी अवस्थेत दोन दिवस त्याने जगण्यासाठी झुंज दिली होती. कोणत्या परिस्थितीत आणि कसे कसे तो एथवर पोहोचला होता, ते फक्त त्यालाच ठाऊक होते.
गोळीच्या विषामुळे, रक्तस्त्रावामुळे, आणि जखमेत संसर्ग झाल्यामुळे कौस्तुभ चा मृत्यू झाला होता.
गोळीच्या विषामुळे, रक्तस्त्रावामुळे, आणि जखमेत संसर्ग झाल्यामुळे कौस्तुभ चा मृत्यू झाला होता.
देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. आज लष्करी अधिकाऱ्यांनी कौस्तुभच्या वापस दिलेल्या वस्तू बघताना, साक्षीने थरथरत्या हाताने मोबाईल चालू केला. त्यात तिला कस्तुभ आणि तिच्या अनेक आठवणी कॅमेरात कैद करून ठेवलेल्या दिसत होत्या.
गॅलरीतील दोघांचे फोटो बघताना साक्षी हरवून गेली होती. डोळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे तिला मोबाईल स्क्रीन देखील तिच्या धुसर होऊ घातलेल्या आयुष्यासारखे दिसत होती.
सहन न होऊन तिने रेकॉर्डिंग चे ॲप उघडले. कौस्तुभ ला स्वतःच्या आवाजात गाणी, मेसेजेस रेकॉर्ड करण्याचा छंदच होता. साक्षी परत परत त्या रेकॉर्डिंग ऐकत होती. कौस्तुभ सोबत परत त्या मंतरलेल्या क्षणात जगत होती.
पण अचानक कौस्तुभ चा धीर गंभीर आवाजातील एक ऑडिओ तिच्या नजरेसमोर आला......
क्रमश :
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा