Login

तू तर चाफेकळी - भाग 4

Love story

तू तर चाफेकळी - भाग 4 

तिने अबिरला येऊन मिठी मारली आणि क्षणभर तो भांबावला. त्याने आजूबाजूला पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. अंजलीच्या चेहऱ्यावरून ती खूप घाबरल्यासारखी दिसत होती. त्याने हलकेच तिला बाजूला केलं. तशी ती भानावर आली. 

" सॉरी...... " ती म्हणाली.

" It's ok. काय झालं पण ? ... घाबरलेयस का एवढी...?? "  त्यानं विचारलं. 


" ते...... ते ऑफिसमध्ये...... " तिला पुढे बोलवेना. तिने आजूबाजूला नजर फिरवली.  " इथे नको दुसरीकडे जाऊन बोलू....."  


" माझं घर इथुन जवळच आहे. जाऊया का...? If u don't mind...." अबिर म्हणाला.  तिने मानेनेच होकार दिला. 


थोड्याच वेळात दोघेही अबिरच्या फ्लॅटवर आले. त्याने तिला बसायला खुर्ची दिली आणि तिच्यासाठी पाणी घेऊन आला. 

" कॉफी घेशील......?? " ती हो म्हणाली

त्याने मग दोघांसाठी मस्त कॉफी करून आणली. बाहेर चांगलाच अंधार पडला होता. तिने घड्याळात बघितलं तर साडेसात वाजलेले. त्याने दिलेल्या कॉफीचे दोन घोट पोटात गेल्यावर तिला जरा बरं वाटलं. 

" काय झालं... बोल आता. इतकी घाबरलीस का..?? " 

" तुझा फोन आला म्हणून मी आवरून ऑफिसला गेले. पण तिथे कोणीच नव्हतं. मग मी वरच्या फ्लोअर वरती गेले. तिथे मला पाल दिसली सो घाबरून मी खाली आले.... " 


" तू...... तू  काय पालीला घाबरून पळालीस की काय....??? " तो जोरात हसला. " एरवी तर झाशीची राणी होऊन फिरत असतेस नि पालीला घाबरतेस..  can't believe.... " तो अजूनही हसत होता. तिने फक्त त्याच्याकडे बघितलं . तिच्या नजरेतली धार बघुन तो गप्पच झाला. 

" सॉरी.... बोल तू . " त्याने दोन्ही हात दाखवत शरणागती पत्करली. 

" मग मी घाबरून खालच्या फ्लोअर वरती आले. आपले डेस्क आहेत तिथे. तेवढ्यात मला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला सो मी खाली प्रोडक्शन डिपार्टमेंटला गेले. तर तिथे एका केबिन मध्ये 2 माणसं बोलत होती. मी त्यांचा चेहरा नाही पाहिला. पण त्यांचं बोलणं ऐकलं... " तिने मग त्याला ते बोलत असलेल्या मेहता ग्रुपच्या प्रोजेक्ट बद्दलचं बोलणं तिने सगळं अबिरला सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं.

" मी मग तिथून घाबरून पळाले. तेवढ्यात तू मला बाहेर दिसलास... " 


" हो... म्हणुन तू मला मिठी मारलीस...." मिश्किल हसत त्याने डोळा मारला. 


" ते..... ते... मला काही सुचलंच नाही. सॉरी.. " ती मान खाली घालून बसली. 


" जोपर्यंत हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत ही गोष्ट आपल्यातच राहील. कारण तुला त्यांनी बघितलं की नाही हे आपल्याला माहीत नाही सो काही दिवस तरी आपल्याला जपून राहावं लागेल. आपलं काम करताना कोण आपल्यावर लक्ष ठेवत नाही ना हे बघावं लागेल ok. मी आहे तुझ्या सोबत आपण दोघे मिळून हे शोधून काढू.... " त्याच्या नुसत्या शब्दानीच तिला खूप बरं वाटलं. 


एव्हाना खूप उशीर झाला होता. घड्याळात साडेआठ वाजले होते. ती पटकन आपली पर्स घेऊन उठली.

" थांब मी सोडतो तुला..... " तो म्हणाला

" नाही..... नको मी जाईन... " 

" मी तुला विचारत नाहीये. सांगतोय. त्या आधी घरी फोन करून कळव की काम आटपायला उशीर झालाय सो अबिर घरी सोडायला येतोय. ते काळजी करत असतील. फोन कर... " त्याच्या अशा हळुवार वागण्याचं तिला कौतुक वाटलं. तिने घरी फोन करून अबिर सोडायला येत असल्याचे कळवले. 

...................................

घरी आल्यावर ती फारसं कोणाशी न बोलता आपल्या रूममध्ये गेली. तिला भूक नव्हती म्हणून मग आईने तिला जबरदस्ती दूध प्यायला लावलं. तिच्या डोक्यावर हळूच थोपटून आई खाली आली. अंजु बेडवर आडवी झाली तरी तिच्या डोक्यात संध्याकाळच्या गोष्टी घुमत होत्या. विचार करता करता तिच्या लक्षात आलं की तिला आज सुट्टी असून पण अबिरने ऑफिसला बोलावलं होतं. नि तो आला नव्हताच. त्याने हे सगळं मुद्दाम केलं. हे तिच्या लक्षात आलं नि मगाशी त्याच्याबद्दल वाटणारी सहानुभूती आता रागात बदलली होती. उद्या त्याला जाब विचारायचा असं ठरवूनच ती झोपेच्या अधीन झाली.

...............................

दुसऱ्या दिवशी अंजु ऑफिसला गेली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अबिर बद्दलचा राग स्पष्ट दिसत होता. आल्या आल्याचं तिने डेस्कवर आपली पर्स आपटली. त्यामुळे बाजूच्या डेस्कवर बसलेली सीमा दचकली. 

" अंजु..... अग काय...? कोणावर चढलाय एवढा रागाचा पारा....?? " सीमा तिच्या जवळ जात म्हणाली. 


" अग काल ते मी......" तिने पुढे सांगायचं टाळलं. 

" काय झालं....?? " 

" नाही काही नाही.... आपण मग बोलू. " ती जरा वैतागली.


" ok तुला सांगावस वाटलं तर सांग. मी आहे ok. " सीमाने हलकेच तिच्या खांद्यावर थोपटलं आणि ती आपल्या जागेवर जाऊन बसली. 

अंजुने मग आपल्या कॉल लॉग मधून अबिरचा नंबर शोधून काढला आणि मोबाईल घेऊन ती कॉफी प्यायला गेली. त्याला मेसेज केला की , केफेटेरिया मध्ये ये लगेच आणि ती त्याची वाट बघत तिथेच थांबली. इकडे अबिरच लक्षच नव्हतं. मोबाईल वाजला तसा त्याने तिचा मेसेज ओपन करून वाचला आणि तो देखील तिथेच आला. 


" बोला मॅडम... काय आता....?? " त्याने मोबाईल मधून डोकं वर न काढताच तिला विचारलं. 


" तू काल मला फोन केलास ना ऑफिसला ये काम आहे म्हणुन मग तू का नव्हतास इथे....??? " तिच्या प्रश्नाने त्याने चमकून वर बघितलं. 


" मी .... ते... येणारचं होतो... " 

" कधी..... मी घाबरल्यावर.....मुद्दाम केलंस ना तू हे सगळं.... " तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता तरी कोणाला ऐकू जाऊ नये म्हणुन ती हळू आवाजात बोलत होती.


" हे बघ. मी फक्त तुला थोडा वेळ वाट बघायला लावणार होतो बाकी काही नाही. पण काल ऑफिसमध्ये जे काही तू बघितलंस त्यातलं मला काहीही माहीत नव्हतं.. सॉरी.. " त्याने खांदे उडवले. 


" तेच तर. काल तर रविवार होता तरी तू मला असं का सांगितलंस...?? " अंजु आता चांगलीच चिडली. 

" कारण परवा मी मेहतांच्या ऑफिसला जाताना तू माझ्याशी जे वागलीस त्यासाठी. तुला माहीत होतं की त्या दिवशी ऑफिसचा हाफ डे असतो तरी तू मला मुद्दाम पाठवलस पत्ता तोच दिलास तरी तो इतका उलट सुलट होता की समोर असुनही मला ते सापडत नव्हतं.... " त्याच्या बोलण्याने ती गोंधळली. 


" ते.... ते.... मी........" तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते.
तो हळूहळू चालत तिच्याजवळ आला. तिला जरा भीतीच वाटली त्याची. तो तिच्या थोडं जवळ सरकला.

" मिस अंजली.... मी कोणतीच गोष्ट उधार ठेवत नाही. जे काही असेल ते व्याजासकट परत करतो मी.. सो माझ्याशी पंगा नाही घेतलास तरच बरं होईल. अबिर देसाई म्हणतात मला... " इतकंच बोलून आपल्याच ऍटिट्यूडमध्ये तो निघून गेला. ती दोन क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. इतक्या सहजासहजी दोघेही हार मानण्यातले नव्हते. 


क्रमशः.....  


कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथा कोणीही कॉपी पेस्ट करू नये. कथा आवडल्यास नावसहित शेअर करावी ही विनंती. 
© ® सायली विवेक

🎭 Series Post

View all