Login

तू तर चाफेकळी - भाग 21

Love story

तू तर चाफेकळी - भाग 21 


काव्याच्या कंपनीचं नाव जाहीर होतं तशी ती खुश होते. सगळेच टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करतात. पण अबिरचा चेहरा मात्र उतरतो. इतकं करूनही काहीच हाती लागलं नव्हतं. 


" एक मिनिट एक मिनिट..... " मॅनेजर सर सर्वांना हातानेच शांत राहायला सांगतात. 


" हे प्रोजेक्ट केवळ SP कंपनीला मिळालेलं नाही तर सोबत ND कंपनीला सुद्धा मिळत आहे. दोन्ही कंपनीजनी मिळून हा प्रोजेक्ट हँडल करायचा आहे. 


हे ऐकल्यावर मात्र अबिरची कळी खुलली. खूप आनंद झाला त्याला. काय करू नि काय नको. असं झालं त्याचं..!! पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला. सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. थोडफ़ार आभाराच बोलून मॅनेजर सरांनी कॉन्फरस संपवली. सगळे बाहेर आले.


" Heartious congratulations...... "  काव्याने हात पुढे करत अबिरच अभिनंदन केलं. 

" thank you.... Thank you so much.... "  त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडुन वहात होता. 

" आता आपल्याला मिळुन काम करायचं आहे... Be ready..."  काव्या

" Yess....... "  अबिर 


थोडा वेळ बोलून काव्या निघुन गेली. निषाद त्यांच काम आटपून बाहेर आला. त्याने तर अबिरला मिठीच मारली. 

" वा.... अबिर .. एक नंबर भाई.. अभिनंदन.... " तो त्याच्यापासून बाजूला होत म्हणाला.

" थँक्स यार.... मला वाटलं आता गेलं प्रोजेक्ट हातातून.. किती दिवस काम करत होतो त्यावर काय सांगू तुला. पण आता खूप छान वाटतंय. केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतंय... " अबिरचा चेहरा देखील फुलला होता.

" अंजलीला कळवलं का....?? " निषाद 


" छे. मी नाही सांगणार तिला. ऑफिसमधून समजू दे तिला.. माझ्यावर नको नको ते आरोप केले. इतक्या सहज मी तिला माफ करेन असं वाटतंय का तुला....?? " अबिर 

" जाने दे सब....इतकी आनंदाची बातमी आहे तर तिला सांग. तिच्यामुळे हे प्रोजेक्ट तुम्हाला मिळालंय हे विसरू नको... " निषादने हलकेच त्याच्या पाठीवर थोपटलं. 


" बरं करतो फोन...... " त्याने खिशातून मोबाईल काढला आणि अंजुला फोन लावला. 


" हॅलो..... " 

" हॅलो.... हा बोल... काय झालं...?? " अंजुने उत्सुकतेने विचारलं. 


" आपल्याला प्रोजेक्ट मिळालं..... " त्याने शांतपणे सांगितलं.


" काय....?? खरं सांगतोयस...?? Waw.... कसलं भारी वाटतंय एकदम रिलॅक्स....." ती खुश झाली.


" आपल्याला नि काव्याच्या कंपनीला प्रोजेक्ट हँडल करायला सांगितलं आहे. " अबिर 


" ok.... congrats ... " अंजली 

" थँक्स......... " बाजुला उभा असलेला निषाद त्याला उभं राहून ' अरे तब्बेत कशी आहे विचार ना तिला... ' म्हणून सारखा खुणावत होता. पण अबिर लक्षच देईना.


" धर तूच विचार....... " त्याने मोबाईल निषादकडे दिला. अचानक असा फोन दिल्यावर तो गोंधळला.


" हॅलो..... मी ... मी निषाद बोलतोय... " 

" हॅलो... हा बोल ना... " 


" अभिनंदन तुमचं......" अबिरकडे बघत तो हळूच म्हणाला.


" ओहह थॅंक्यु...... " तीही खुशीत होती.


" तब्येत ... तब्येत कशी आहे तुमची आता....?? " त्याने जरा घाबरतच विचारलं.


" हो बरी आहे. थोडफार चालता येतंय...... " अंजु 


" हा ok.. काळजी घ्या......" एवढं बोलून त्याने फोन अबिरकडे दिला.


" हॅलो.... अबिर... मला बोलायचंय तुझ्याशी...." अंजु


" हमम........" 


" ते म्हणजे...... त्या दिवशी ऑफिसला जे काही झालं त्यासाठी सॉरी... मी तुला लेटर पण लिहिलं होतं... पण तू वाचलस नाहीस...... सॉरी..... " अंजु मनापासून बोलत होती.


" झालं बोलून.....?? ठेवू फोन.....?? " त्याचा राग अजूनही कायम होता.


" अबिर..... अरे ऐक तरी......... " पण पलीकडून फोन केव्हाच कट झाला होता. 


अंजु हिरमुसली. ह्याचा राग कसा घालवायचा तेच कळेना. कारण मॅडमनी गुन्हाच तेवढा मोठा केला होता.

....................................

अंजु आता हळूहळू फिरत होती. संध्याकाळी अमेय घरी आल्यावर तिने प्रोजेक्ट मिळाल्याचं घरी सांगितलं. सगळेच खुश झाले. त्या आनंदात बाबांनी अमेयला मस्त आईस्क्रीम आणायला पिटाळलं. 


" बाबा मला कंटाळा आलाय हो जायचा..... " अमेय कुरकुरला.


" तू जातोयस की मी जाऊ.....?? " बाबांनी एवढंच विचारलं नि अमेय बाहेर जायला निघाला. त्याची गंम्मत बघुन अंजुला हसायला येत होतं.


" तू का हसतेस डुचके...... ?? " अमेय


" मी कुठे हसतेय...... " तरी ती मान फिरवुन हसत होती. 


" मला काय मूर्ख समजतेस. बघ बघ माझी पण वेळ येईन तेव्हा मी पण हसेन असा.... " तो रागाने बाहेर जात म्हणाला.


" हो एकटाच हस.... एकट्याने हसणाऱ्याला काय म्हणतात माहितेय ना....??? " अंजु जोरात हसली.

" तुझ्या तर आता...... " तो पुन्हा मागे वळला.


" अरे काय लहान आहात का आता भांडायला.... " आई 


" बघ ना मला चिडवते मुद्दाम..... " अमेय


" एवढं कळतंय ना...मग जा बघू.. ए आणि मला मँगो आईस्क्रीम आण हा... " आई 


" बरं आणतो... "  


" नि मला बटरस्कॉच..... " अंजु 


" अजिबात नाही.. आणेन ते खा गप.... " एवढं बोलून तो तरातरा निघून गेला. तसा एकच हशा पिकला.


..............................

प्रोजेक्ट मिळाल्याची खबर आधीच ऑफिसमध्ये पोहचली होती. दुसऱ्या दिवशी अबिर ऑफिसला गेला तेव्हा सगळेच त्याच अभिनंदन करायला जमले होते.


" congrats यार....... " राकेशने हात मिळवला.


" थँक्यु........ " अबिरने हसून म्हटलं.


" अरे भाई तुने तो कमाल कर दी..। हमे लगा हमारी जॉब ही चली जाइगी.....Congrats ... "  यशने तर त्याला चक्क मिठीच मारली. 

सगळ्यांनीच त्याच अभिनंदन केलं. यश म्हणाला ते काही चुकीचं नव्हतं. हे प्रोजेक्ट फक्त अबिरसाठी नाही तर कंपनीसाठी देखील तितकंच महत्वाचं होतं. दिवसेंदिवस कंपनी लॉसमध्ये चालली असताना. मिळालेला प्रोजेक्ट हा आधार झाला होता कंपनीचा. 


" अरे पण अंजु कशी आली नाही.....?? " राकेशने विचारलं. 


" तिचा पाय मुरगळलाय परवा... मेहता कंपनीच्या इथे.. त्यामुळे ती काल कॉन्फरसला पण आली नव्हती.... " अबिर म्हणाला

" काय....?? अरे मग आता कशी आहे ती...?? " राकेशने काळजीने विचारलं.

" अरे यार..... मला अंजुचा फोन आला होता. पण मी विसरले सांगायला..... " सीमा 


" सीमा तू पण ना..... कधी सांगायचं हे...?? अंजु स्वतःच्या पायांनी चालत ऑफिसला आल्यावर....?? " राकेशला राग आला होता. 


" हो........ " पाठीमागून आवाज आला. सगळ्यांनीच मागे वळुन पाहिलं. 


" अंजु तू.....??? " सीमाने येऊन तिला मिठीच मारली. अंजु सावकाश चालत पुढे आली.


"  अग बर वाटतंय का तुला....?? कशाला आलीस तू...?? पाय दुखतोय का अजून ....?? " सीमाने प्रश्नांची सरबत्तीच चालु केली. 


"  थोडा दुखतोय. पण आता बरं आहे. नि काल सुट्टी झालीच की... आता ठीक आहे...  " अंजु अबिरकडे बघत म्हणाली.

" हा काळजी घे..  नि जरा कमी धडपड..... " यश म्हणाला नि सगळे हसले. अबिर सोडून. फुगा आला होता ना साहेबांना काय करणार.


थोड्या वेळाने सगळे कामाला लागले. पण अबिर अंजूकडे अजिबात लक्ष देत नव्हता. पण अंजुला मात्र तिचं मन खात होतं. अबिरची काहीही चूक नसताना आपण त्याला नको नको ते बोललो त्यामुळे तिला अपराधी वाटत होतं. तिने इकडे तिकडे नजर फिरवली. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. तिने टेबलवरची एक फाईल उचलली आणि ती अबिरच्या डेस्कजवळ जायला निघाली. तिला आपल्याकडे येताना बघुन अबिर आधीच उठला आणि कॅफेटेरियात गेला. तिला वाईट वाटलं. तीही मग त्याच्या मागोमाग कॅफेटेरियात गेली. 

" तू काहीच बोलणार नाहीयेस का माझ्याशी......?? " तिने अगतिक होऊन विचारलं

" काय बोलू......?? तू काही शिल्लक ठेवलंय का बोलायला...." त्याने कॉफी मशीन चालू केलं. 

" खरंच सॉरी... मला तसं म्हणायचं नव्हतं. त्या दिवशी मी रागाच्या भरात बोलले. माझ्या मनात तसं काही नव्हतं.... " अंजु

" बोलून झाल्यावर प्रत्येक माणुस असंच म्हणतो..... " त्याने कॉफी मशीन बंद केलं नि कॉफी घेतली. 

" असं नाहीये अबिर... तू नवीन आला आहेस म्हणून मला अस वाटलं. आणि कुलकर्णी सर अस करतील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.... खरंच सॉरी.... " अंजु 

" नवीन आहे म्हणजे फ्रॉड नाही ना......मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये.... " तो पुन्हा डेस्क एरिया मध्ये आला. तीही आपल्या जागेवर आली. डोळ्यात आलेलं पाणी तिने हलकेच टिपलं आणि ती कामाला लागली.


थोड्या वेळाने मॅनेजर सर बाहेर आले. त्यांनी अंजु आणि अबिरच अभिनंदन केलं आणि मॅनेजर सर म्हणाले.

"  तुम्हा सगळ्यांसाठी उद्या एक सरप्राईज असणार आहे....." 


क्रमशः... 


भाग पोस्ट करायला उशीर झाला आहे मला मान्य आहे. पण कोकणात सध्या पाऊस आणि त्यामुळे झालेली हानी या सगळ्याचा सामना करावा लागत आहे. मोबाईलच नेटवर्किंग पूर्णतः बंद होतं. त्यामुळे इंटरनेटही चालू होतं नाही. त्यामुळे भाग पोस्ट करायला अडचणी येत आहेत. पुढील भाग रेगुलर पोस्ट होतील. इराच्या अँप वरती ज्यांनी कमेंट केल्या असतील त्या सगळ्यांना खूप खूप थॅंक्यु.. कारण माझ्याकडे इराच अँप ओपन होत नाहीये. कृपया कोणीही रागावू नये. 
धन्यवाद.