भाग -1
"अनिकेत?...", ती त्याला मागूनच आवाज देते... तोही तिचा आवाज ऐकून उठून उभा राहतो...
"हेय... आरु... ये ना बस...", अनिकेत तिला बसायला सांगतो...
तीही त्याच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसते...
तीही त्याच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसते...
"कशी आहेस तू?...", अनिकेत...
"मी ठीक... तू?...", आर्या...
"कसा दिसतोय?...", अनिकेत...
"छान ... बरं काल इतक्या वर्षांनी मेसेज केलास?... आणि इथे बोलावलंस माझ्याकडे काही काम होतं का?... ",आर्या...
"काम असं नाही... हे द्यायचं होतं...", असं म्हणून अनिकेत आपल्या बॅगेत काही शोधू लागतो...
"काय शोधतोयस?...",आर्या...
"हे गं जे तुला द्यायला इथे आलोय...", असं म्हणून तो एक पत्रिका समोर करतो...
"पत्रिका... कोणाची रे?...", आर्या...
"अर्थात माझ्या लग्नाची... आपल्यात ठरल्याप्रमाणे तुला पहिली पत्रिका...", अनिकेत...
"ओह अभिनंदन...", असं म्हणून ती त्याच्याकडून ती पत्रिका घेते आणि आपल्या बॅगेत ठेवते...
"थँक यु...", अनिकेत...
"अजून लग्न केलं नव्हतंस?...", आर्या...
" करायचंच नव्हतं... ", अनिकेत...
"का?...", आर्या...
"तुला कारण माहितेय तरी विचारतेयस?...", अनिकेत...
त्याच्या या वाक्यावर ती शांतच बसते... काहीवेळ ती तशीच शांतच होती... मग परत तोच बोलायला सुरुवात करतो...
त्याच्या या वाक्यावर ती शांतच बसते... काहीवेळ ती तशीच शांतच होती... मग परत तोच बोलायला सुरुवात करतो...
"पण आरु हे काही चांगलं नाही हा... अजूनही टिकली लावत नाहीस तू?... बिचारा तुझा नवरा... कसं वाटत असेल त्याला... मंगळसूत्र नाही, टिकली नाही त्याचं काही अस्तित्व आहे की नाही?...", अनिकेत...
"नाहीच आहे... ते आता नाहीत या जगात...", आर्या...
"काय?... सॉरी मला माहित नव्हतं... खरंच...", अनिकेत...
"इट्स ओके रे... तसं टिकली वगैरे लावणं सुरु केलेलं मी...", आर्या...
"कधी झालं हे?...", अनिकेत...
"दोन वर्ष झाली...", आर्या...
"कसं झालं?...", अनिकेत...
" आत्महत्या केली त्यांनी... ", आर्या...
"का?...", अनिकेत...
"स्ट्रेसमध्ये होते म्हणे...", आर्या...
"कसला स्ट्रेस?...", अनिकेत...
"नाही माहित... पण काय तू सगळं मलाच विचारशील?... तुझी ती कशी आहे ते तरी सांग...माझं सोड...", आर्या...
"माझी ती... खरंतर माझी ती नाही तिचा मी आहे...", अनिकेत...
"म्हणजे?...", आर्या...
"तिचं माझ्यावर प्रेम आहे...", अनिकेत...
"आणि तुझं?...", आर्या...
"माझं प्रेम करून झालंय एकदा... आता फक्त समोरच्याच्या प्रेमाचा आदर...", अनिकेत...
"फक्त आदर?...", आर्या...
"हो... तुला माहितेय पाच वर्ष थांबलीय ती माझ्यासाठी... खूप प्रेम करते माझ्यावर... मला काय आवडतं? काय नाही... सगळ्याची खूप खूप काळजी घेते माझ्या ऑफिसमधलीच आहे... आणि मला आवडतं म्हणून जीन्सवर पण टिकली लावते...", असं म्हणून तो हसू लागतो...
"टिकली कपाळावर लावतात जीन्सवर नाही...", आर्या मिश्किलपणेच बोलते...
"नॉट बॅड... पारंपारिक जोक... अगं मला म्हणायचं होत जीन्स टॉप असतात ना मुलींचे तो मॉडर्न लुक तर तो केला तरी टिकली लावते खरंच वेडी आहे ती...", अनिकेत...
"म्हणजे फायनली तुला तुझं प्रेम मिळालं...", आर्या...
"नाही... आणि ते कसं हे तुलाही माहितेय...", अनिकेत...
"अनिकेत... अरे नको गुंतून राहूस भूतकाळात... भूतकाळ सोडून पुढे निघून जायचं असतं...", आर्या...
"पुढे तर जातोच आहे ना... आणि शाहरुख खान काय म्हणतो? हम जिते एक बार हैं, मरते एक बार, शादी भी एक बार होती हैं और प्यार... वो भी एक बारही होता हैं... ", अनिकेत...
"तुझ्यासमोर बोलण्यात कोणी जिंकलंय का आजवर?...", आर्या...
"एक होती ती जिंकायची...", अनिकेत...
"सध्या ती सगळ्याच बाजूने हरलीय...", ती स्वतःशीच बोलते...
"काही म्हणालीस का?...", अनिकेत...
"नाही... मी कुठे...", आर्या...
"बरं काही मागवायचं का?... नाहीतर हा कॅफेवाला म्हणेल फुकट बसायला आलेत हे...", अनिकेत...
"बरं...", आर्या...
तो तिच्याकडे मेनूकार्ड देतो...
"मागव तुला हवं ते...", ती मेनुकार्ड तर हातात घेते पण ते पाहून ती खूपच गोंधळून जाते...
"अगं मागव...", अनिकेत...
"प्लीज तू मागव ना... मला काहीही चालेल...", आर्या...
"अगं मागव काहीही तुला हवं ते...", अनिकेत...
"प्लीज...", आर्या...
"बरं...", अनिकेत...
अनिकेत वेटरला बोलवून दोन कॉफी आणि दोन सँडविचची ऑर्डर देतो...
"आरु... ठीक आहेस ना तू?...", अनिकेत...
"अ... हो... तू बोल ना...", आर्या...
"मेनूकार्ड बघून इतकी का गोंधळलीस तू?...", अनिकेत...
"आजकाल निवड करायची म्हंटली ना की भीतीच वाटते...", आर्या...
"भीती?... कसली भीती?...", अनिकेत...
"सोड जाऊदे...", आर्या...
"अगं बोल ना... बोलून मोकळी हो...", अनिकेत...
"ऐक ना निघुयात?...", आर्या...
"अगं कॉफी तरी येउदे... बरं मी नाही विचारत तुला काहीच तुझ्या आयुष्याबद्दल चालेल... मग तर थांबशील?...", अनिकेत...
ती मानेनेच होकार देते... तितक्यातच वेटर त्यांची कॉफी आणि सँडविच घेऊन येतो... दोघेही कॉफी पिऊ लागतात...
"बरं मग आता काय करतेयस तू?... नोकरी, व्यवसाय?...", अनिकेत...
"नोकरी करतेय सध्या एका ऑफिसमध्ये...", आर्या...
"तुझ्या नवऱ्याचा व्यवसाय होता ना ?...", अनिकेत.. M
"त्यांच्या पार्टनरने फसवून तो बळकावला...", आर्या...
"ओह...नोकरी चांगली आहे ना?... ", अनिकेत...
"हो... म्हणजे आम्हां दोघींना पुरेल इतकं कमवते मी... स्वतःचं घर आहे यांनी घेऊन ठेवलेलं तिथेच राहतो... ",आर्या...
"दोघी?...", अनिकेत...
"मी आणि मीरा... माझी मुलगी... ", आर्या...
"ओह... मुलगी आहे तुला?...", अनिकेत...
"हो सात वर्षांची आहे... आता क्लासला...", आर्या...
"काय झालं?...", अनिकेत...
"अरे वाजले किती?...", आर्या...
"सहा..."
"मला निघावं लागेल मीरा सुटली असेल मी तिला दिसले नाही ना तर गोंधळून जाईल... मला उशीरच झालाय...."
"हो हो अगं श्वास तरी घे... उशीर झालाय ना?... मी सोडतो तुला..."
"सोडशील प्लीज... घाबरेल रे ती..."
"हो सोडतो तू इतकी पॅनिक नको होऊस..."
असं म्हणून तो बिल मागवतो आणि बिलचे पैसे तिकडेच ठेवतो... आर्याही आपल्या कॉफीचे पैसे काढून त्याला देते...
"अगं मी दिले ना..."
"प्लीज घे..."
"मी बोलावलं म्हणून आलीस ना?... मग बिल मी भरणार... आणि तुला उशीर होतोय ना?... मग चल..."
"बरं... चल लवकर..."
असं म्हणून ती पैसे बॅगेत ठेवते आणि दोघेही कॅफेच्या बाहेर येतात... अनिकेत कारचा दरवाजा उघडतो... ती आत जाऊन बसते... तो कार सुरु करतो... त्या प्रवासात ती काहीही बोलत नाही सारखी सारखी फक्त घड्याळ बघत होती...
इकडे मीरा क्लासच्या बाहेर येऊन थांबली होती...
असं म्हणून ती पैसे बॅगेत ठेवते आणि दोघेही कॅफेच्या बाहेर येतात... अनिकेत कारचा दरवाजा उघडतो... ती आत जाऊन बसते... तो कार सुरु करतो... त्या प्रवासात ती काहीही बोलत नाही सारखी सारखी फक्त घड्याळ बघत होती...
इकडे मीरा क्लासच्या बाहेर येऊन थांबली होती...
"काकू तुम्ही जा मी थांबेन आई येईलच आता... "
"नाही म्हणजे नाही मी माझ्या बेस्टीला एकटीला सोडून नाही जाणार...", अथर्व(मीराचा मित्र)...
"अथर्व अरे काकूंना लेट होत असेल...", मीरा...
"नाही गं बाळा थांबतो आम्ही... आणि तुला इथे एकटीला सोडून जाईल का? तुझा बेस्टी?..."
"अथर्व..."
"नो..."
"ओके..."
आर्या त्याला जायला सांगत होती पण तो काही जात नव्हता... तितक्यात तिथे एक कार येऊन थांबते आणि त्यातून आर्या उतरते... आर्याला पाहून मीरा धावतच तिच्यापाशी येते आणि ती आर्याला बिलगते...
आर्या त्याला जायला सांगत होती पण तो काही जात नव्हता... तितक्यात तिथे एक कार येऊन थांबते आणि त्यातून आर्या उतरते... आर्याला पाहून मीरा धावतच तिच्यापाशी येते आणि ती आर्याला बिलगते...
"सॉरी बाळा मला उशीर झाला..."
"अगं नाही गं आई... तू कामात असशील ना कुठल्यातरी... म्हणून उशीर झाला ना?..."
"घाबरली नाहीस ना बाळा तू?..."
"आई मी शूर मुलगी आहे मी कोणालाच घाबरत नाही..."
"हेय प्रिन्सेस..."
अनिकेत मीराला हाक मारतो...
"कोण तुम्ही?..."
अनिकेत मीराला हाक मारतो...
"कोण तुम्ही?..."
"मी तुझ्या आईचा बेस्टफ्रेंड... अनिकेत..."
"बेस्टफ्रेंड म्हणजे बेस्टी?... अथर्वसारखा?..."
"हो..."
"हा अथर्व कोण आहे गं प्रिन्सेस ?...""
"माझा बेस्टी... आणि माझं नाव प्रिन्सेस नाहीये ओ... माझं नाव मीरा आर्या आहे..."
"मीराला नाही आवडत तिचे बाबा... ती असंच नाव सांगते सगळीकडे..."
"ओह... हॅलो मीरा आर्या मॅडम... कशा आहात तुम्ही... नाईस नेम हा..."
"हो की नाही?... तरी ही आई मला ओरडत असते..."
"अगं बाळा ते तुझे..."
"ओके फाईन.... मला सांग प्रिन्सेस ओह सॉरी मीरा आर्या मॅडम आपण आईस्क्रीम खायचं?..."
"येस... मला खूप आवडतं आईस्क्रीम... आणि चॉकलेट आईस्क्रीम म्हणजे...आणि चॉकलेट्स पण..."
"आईवर गेलीयस पक्की..."
"म्हणजे आईलापण आईस्क्रीम आवडतं का?..."
"हो मग... अगं आई आहे ना तुझी तुला नाही माहित?..."
"नाही... ती फक्त मला घेऊन देते स्वतः खातच नाही..."
"बरं मग आपण आज जाऊ खायला..."
असं म्हणून तो गाडी एका आईस्क्रीम पार्लरपाशी नेऊन थांबवतो... तो गाडीतून उतरतो आणी आधी मागचा दरवाजा उघडून मीराला बाहेर घेतो आणि मग आर्याचा दरवाजा उघडतो...
"ऐक ना तुम्ही खाऊन या मी थांबते इथे..."
"अगं असं कसं?... आपण तिघे एकत्र आहोत ना मग तुला सोडून कसं जाणार आम्ही... प्लीज चल आरु... "
"आई चल ना गं..."
"बरं... "
असं म्हणून ती गाडीतून उतरते... तिघेही पार्लरमध्ये येतात आणि एके ठिकाणी बसतात...
असं म्हणून ती गाडीतून उतरते... तिघेही पार्लरमध्ये येतात आणि एके ठिकाणी बसतात...
"सर ऑर्डर..."
"दोन चॉकलेट आणि एक वॅनिला..."
"आईलापण चॉकलेट आईस्क्रीम आवडतं?..."
"हो खूप..."
"तुम्हांला कसं माहित?..."
"मी तिचा बेस्टी आहे ना..."
"अरे हो की..."
"बरं प्रिन्सेस म्हणजे मीरा... मी तर तुझ्या आईचा बेस्टी आहेच पण मला तुझा काका नाही व्हायचं गं इतक्या क्युट मुलीने काका म्हणावं इतका म्हातारा थोडीच आहे मी..."
त्याच्या या वाक्यावर मीरा हसू लागते...
"मग कोण व्हाल तुम्ही?..."
"अम्म... हम आपके हैं कौन?... अ... अ... अ... बेस्टी?..."
"नो..."
"का गं?..."
"अथर्व आहे ना माझा बेस्टी?..."
"अरे हो की विसरलोच होतो... मग फ्रेंड्स?...जस्ट फ्रेंड्स व्हायला काय हरकत आहे ना?..."
असं म्हणून तो आपला हात पुढे करतो...
असं म्हणून तो आपला हात पुढे करतो...
"ओके... फ्रेंड्स..."
असं म्हणून मीराही त्याच्या हातात आपला हात देते...
असं म्हणून मीराही त्याच्या हातात आपला हात देते...
"बरं मग फ्रेंड... एका फ्रेंडने दुसऱ्या फ्रेंडला अहो जाओ नसतं करायचं... मी करतो का तुझ्या आईला किंवा तुला?... म्हणजे मी बेस्ट फ्रेंड आहे..."
"मीपण बेस्ट फ्रेंड आहे..."
"असं कसं तू तर मला आहोजाओ करतेस की..."
"आईने सांगितलंय की मोठया माणसांना अहो जाओ करायचं..."
"ते इतरांना आपल्या फ्रेंडला नसतं करायचं गं... आता आपण फ्रेंड्स आहोत ना?..."
"ओके फ्रेंड... मी तुला फ्रेंड म्हणत जाईन..."
"बेस्ट... बरं आता आईस्क्रीम संपवा त्या वेटरने कधीचा आणून ठेवलाय वितळेल... "
तिघेही आईस्क्रीम खाऊ लागतात... आर्याचं सगळ्यात आधी खाऊन होतं... तशी ती या दोघांची वाट बघत शांत बसते... इतक्यात त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिच्या चेहऱ्याकडे बघून हसू लागतो...
"काय झालं?... असं का हसतोयस?..."
"तुझा चेहरा..."
"काही लागलय का?..."
असं म्हणून ती चेहरा पुसू लागते...
असं म्हणून ती चेहरा पुसू लागते...
"थांब..."
असं म्हणत तो समोरचा एक टिशूपेपर घेतो आणि तिच्या नाकावर लागलेलं आईस्क्रीम पुसू लागतो... ती त्याच्याकडे पाहतच राहते...
असं म्हणत तो समोरचा एक टिशूपेपर घेतो आणि तिच्या नाकावर लागलेलं आईस्क्रीम पुसू लागतो... ती त्याच्याकडे पाहतच राहते...
"काय हे आरु अजूनही बदलली नाहीस तू..."
"आई तुझ्या नाकाला आईस्क्रीम लागलेलं..."
असं म्हणून मीराही हसू लागते... ती मोबाईलच्या सेल्फी कॅमेरात चेक करते तर आता तिचा चेहरा साफ होता...
असं म्हणून मीराही हसू लागते... ती मोबाईलच्या सेल्फी कॅमेरात चेक करते तर आता तिचा चेहरा साफ होता...
"आता नाहीये... झालं सगळ्यांचं निघायचं?..."
"हो... तू राहतोस कुठे?..."
"गुलमोहर हाईट्स..."
"म्हणजे स्टेशन जवळ ना?..."
"हो..."
"अरे मग म्हणजे इथून जवळच आहे तू जा आम्ही जाऊ रिक्षाने..."
"ओ समजूतदार मॅडम... मी सोडतोय ना?... आणि तुझ्यासाठी नाही बरं माझ्या फ्रेंडसाठी इतक्या लांब वगैरे येतोय मी... इतकी लहान गर्लफ्रेंड म्हणजे फ्रेंड मिळालीय मला... "
"ओके..."
"खरंतर आईने तुला घरी आणायला सांगितलं होतं तिला भेटायचंय तुला... तुला आता वेळ आहे का?... असेल तर इथून जवळच आहे जाऊ आपण किंवा पुन्हा केव्हा ते सांग..."
"तुझ्या लग्नाला येईनच ना?... तेव्हा होईलच भेट..."
"ते वेगळं हे वेगळं... तसं मला संशय आहे तू येशील किंवा नाही यावर..."
अनिकेतच्या या बोलण्यावर आर्या मंदच हसते...
अनिकेतच्या या बोलण्यावर आर्या मंदच हसते...
"अगं ओळखतो मी तुला..."
"खरंच?..."
"हो म्हणूनच शांत होतो तेव्हाही आणि शांत आहे आजही..."
"थँक्स..."
"निघायचं?..."
"फ्रेंड आता मी तुझ्या बाजूला बसणार..."
"ओक्के... चला..."
तिघेही पैसे देऊन निघतात... पार्लरमधून बाहेर पडता पडताच अनिकेत आपल्या आईला फोन करून आर्या येत असल्याचं सांगतो... तिघेही कारमध्ये बसतात आणि थोड्याचवेळात एका मोठया टॉवरजवळ येऊन त्यांची कार थांबते...
तिघेही पैसे देऊन निघतात... पार्लरमधून बाहेर पडता पडताच अनिकेत आपल्या आईला फोन करून आर्या येत असल्याचं सांगतो... तिघेही कारमध्ये बसतात आणि थोड्याचवेळात एका मोठया टॉवरजवळ येऊन त्यांची कार थांबते...
"ओह व्वा फ्रेंड तू इथे राहतोस?..."
"इथे म्हणजे रस्त्यात नाही राहत याच्या आत घरात राहतो..."
असं म्हणून अनिकेत हसू लागतो... पण या दोघीही शांतपणे त्याच्या तोंडाकडे बघत होत्या...
असं म्हणून अनिकेत हसू लागतो... पण या दोघीही शांतपणे त्याच्या तोंडाकडे बघत होत्या...
"वाईट होता का गं फ्रेंड?..."
"थोडासा..."
"आरु... कधी जमणार गं मला..."
"जमेल हळूहळू पुढच्या जन्मी वगैरे ..."
असं म्हणून ती हसू लागते... या एवढ्यावेळेच्या भेटीत ती आता पहिल्यांदा हसली होती... तो तिच्याकडे पाहतच बसतो...
असं म्हणून ती हसू लागते... या एवढ्यावेळेच्या भेटीत ती आता पहिल्यांदा हसली होती... तो तिच्याकडे पाहतच बसतो...
"ब्युटीफुल..."
त्याच्या मुखातून शब्द निघतात... तीही ते ऐकते... पण न ऐकल्यासारखं करून आत जाण्यास निघते...
त्याच्या मुखातून शब्द निघतात... तीही ते ऐकते... पण न ऐकल्यासारखं करून आत जाण्यास निघते...
"आत जाऊया..."
"हो प्लीज या ना..."
तिघेही लिफ्टपाशी येतात...
तिघेही लिफ्टपाशी येतात...
"ऐक ना जिने नाहीयेत का?..."
"आहेत पण कशाला..."
"आई फ्रेंड आहे ना?... तू का घाबरतेयस?..."
"तुला भीती वाटते लिफ्टची?... कधीपासून?..."
" हो... प्लीज जिन्यानी जायचं?...प्लीज... "
"अगं गेलो असतो पण पंधराव्या माळ्यावर जायचंय खूप चालावं लागेल... आणि मी आहे ना मग कसली भीती चल..."
असं म्हणून तो तिचा हात पकडतो... मीराही लगेचच लिफ्टमध्ये प्रवेश करते... तो लिफ्टची बटन दाबतो आणि लिफ्ट सुरु होते... तशी ती घाबरते आणि त्याचा हात घट्ट पकडून डोळे बंद करून घेते... तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहतो... थोड्याचवेळात तिघेही अनिकेतच्या घरापाशी पोहोचतात आणि बेल वाजवतात...
असं म्हणून तो तिचा हात पकडतो... मीराही लगेचच लिफ्टमध्ये प्रवेश करते... तो लिफ्टची बटन दाबतो आणि लिफ्ट सुरु होते... तशी ती घाबरते आणि त्याचा हात घट्ट पकडून डोळे बंद करून घेते... तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतच राहतो... थोड्याचवेळात तिघेही अनिकेतच्या घरापाशी पोहोचतात आणि बेल वाजवतात...
लेखिका
सेजल सारिका संतोष बागवे "जल "
सेजल सारिका संतोष बागवे "जल "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा