तु तु मै मै भाग 2

सासु सुनेची तु तु मै मै
तू तू में में भाग 2


शुभमन - " यापुढे पोरांना न्यायचेचं नाही तुझ्या माहेरी. माझी निरू माझी चिमणी फणफणली तापाने. आता मुक्ता तूच कर तिची शुश्रूषा. पळ दवाखान्यात."


उषाताई - " पैसा जातो..पाण्यासारखा खर्च होतो. पोरांची तब्येत खराब. आपल्याही त्रास होतो. दवाखाना, धावपळ आता होत नाही माझ्याकडून."


मुक्ता - " मदत नाही कोणाची. वर बोलणी. दवाखाना म्हणाले की कसे हळूहळू सगळे कसे काढता पाय घेतात."


मुक्ता दोन दिवसरात्र दवाखाना, घरातले सगळं पाहून दमली होती. तशीच खुर्चीवर बसून तिला झोप लागली. तेवढ्यात शुभमन आला. निरंजनाला सलाइन चालू होते.


शुभमन बसून होता. त्यालाच मनात वाटले आपण मुक्ताला जरा जास्तच बोललो. पण वरून तो तसे दाखवत नव्हता.


उषाताईचा मुक्ताला निरंजनाची चौकशी करायला फोन आला, " नात बरी आहे का माझी? " फोन आल्यामुळे मुक्ता झोपेतून जागी झाली....


मुक्ता बोलली, हो. आता बरी आहे." एवढेच बोलून तिने फोन ठेवला.

ती मनात विचार करू लागली की, सासूबाई कधी प्रेमाने संवाद साधत नाहीत, कधी अबोला धरून बसतात, कधी मोजके कामापुरते बोलतात, माझ्यामागून माझ्याविषयी सगळ्यांना वाईटचं सांगतात. एकदा धुणीभांडी करणाऱ्या बाईशी माझ्या विरोधात बोलत होत्या तेव्हा मी सगळे ऐकले माझ्या कानांनी तेव्हा मी त्यांना बोलले तर माझ्याकडे रडून शुभमनची सहानुभूती मिळवली. मलाच वाईट केले शुभमनच्या नजरेत. रडून घेतात. नाटक बरी जमतात. शुभमन पण आईकडूनच असतो लगेच.


नुसत्या उंटावरून शेळ्या हाकलायच्या. सासूबाईंना नातवंडाची तोंडं पहायची होती. पण दोन्ही मुलांचे काही करण्याची वेळ येते तेव्हा काढता पाय घेतात. हात वर करून घेतात. मुलांचे सगळं माझ्यावरचं. माझीच मुले आहेत मी आनंदाने करते. पण नातवंडांसाठी काही करायचे नाव नाही. शी, शू, दवाखाने, न्हाऊ माखू घालणे, शाळेत सोडा - आणा, क्लासेस मध्ये सोडा - आणा सगळं मी एकटीने करते. सासूबाई तेव्हा हे दुखते ते दुखते करत राहतात. आता होत नाही असे बोलत राहतात. तेच सासूबाईंना यात्रा करायला, नातेवाईकांच्या कार्यक्रमात जायला, फिरायला जायला, मैत्रिणींच्या सोबत जायला खूप ताकद असते. मुलीच्या सासरी जायचे. जावई आणि लेकीबरोबर, मुलासोबत नातवंडासोबत फिरायला जायचे. ही त्यांची वृत्ती स्पष्ट दिसते. शुभमनला हे दिसत नाही. त्याला हे सगळं सांगितले की मीच वाईट विचार करते असे म्हणतो.


सासूबाई मुलीकडे सासरी एन्जॉय करतात, फिरायला जातात, शॉपिंगसाठी जातात, चित्रपटसुद्धा पहातात. पण आमच्यासोबत त्यांना यायचे नसते. नुसती कारणे काढायची असतात. आमचा कार्यक्रम रद्द करायचा असतो. कित्येक उदाहरणे आहेत अशी.

तेच माझे आई बाबा येऊ द्या. या सासूबाई आणि शुभमन त्यांच्याशी बोलत नाहीत. दारात येताना माझी आई दिसली की एकदा तर पटकन झोपून गेल्या तोंडावरून साडीचा पदर घेऊन. हा किस्सा विसरणारचं नाही. मी आणि माझी आई सुद्धा. माझ्या आई बाबांना या बसा नाही. बोलणे नाही. सूनेच्या आई आणि बाबांना अशी वागणूक का? माझे आई, बाबा स्वाभिमानी तेही येतच नाही मग माझ्या सासरी. मलाचं बोलवतात माहेरी.

शुभमनला बोलते माझ्या आई, बाबांशी बोल. तर म्हणतो मी काय बोलू?


सासूबाईंचे, शुभमनचे वागणे असे का? एकदा विचारणार आहे मी सासूबाईंना. बोलून मोकळे होईन एकदा.. आता निरंजनाला बरे वाटले. डिस्चार्ज झाला की घरी गेल्यावर सासूबाईंना सगळे विचारले पाहिजे असे का ? पण बोलून काही फायदा होणार आहे का? परत नाटक दोन मिनिटे श्वास थांबवायचा. नाटके करायची म्हणजे शुभमन आणि माझ्यामध्ये भांडण. नंतर सासूबाई मध्ये बोलून फरक पडेल का ? काय करावे अशांना सुधारायला.. बोलणे बंद,अबोला धरायचा. बोलणे सोडून द्यायचे. याला पर्याय काय?


डॉक्टर आल्यामुळे मुक्ताच्या मनातले विचार थांबतात. डॉक्टर विचारतात, " निरंजनाला बरे वाटते का ? आज काय म्हणतो छोटासा पेशंट माझा ?"

निरांजना डॉक्टरांना घाबरते. इंजेक्शन, सलाइनची तिला भिती वाटत असते.. डॉक्टर म्हणतात, " घाबरू नकोस. आता बरे वाटते आहे ना ? आता काही नाही होणार." डॉक्टर मँगो चॉकलेट देतात. निरंजना खुश होते. हसल्यामुळे तिच्या गालाला खळी पडते.

मुक्ता मनात पुन्हा विचार करू लागते. सासूच्या आणि नवऱ्याच्या स्वभावाला, वाईट वागण्याला काही औषध नाही.


क्रमशः

🎭 Series Post

View all