तू तू में में भाग 3
निरंजना दवाखान्यातून दोन दिवसांनी घरी येते त्यामुळे मुक्ता फ्रेश होते. इतक्यात मुक्ताची सख्खी लहान जाऊ मधुरा, लहान दिर शार्दूल , त्यांची जुळी मुले मंदार, केदार मुंबईहून नोकरीच्या गावाहून उन्हाळ्याची सुट्टी म्हणून आले.
उषाताई - " आला गं बाई माझा शार्दूल...माझा चिमणा. (उषाताईची कळी खुलली. धाकटा मुलगा शेंडेफळ मध्ये जास्त जीव) लहान मुलगा, लहान सून, दोन नातू हे सगळे आजी, काका, काकूच्या पाया पडतात. सगळे फ्रेश होतात.
उषाताई ( सासूबाई ) - सोफ्यावर बसून मुक्ताला फर्मान सोडतात. " आज छान आंब्याचा रस कर भरपूर. माझी सगळी नातवंडे घरी आली आहेत. मस्त पुऱ्या कर, थोड्या पोळ्या कर, कुरडई तळ, उकडलेल्या बटाट्याची भाजी कर शार्दूलला आवडते तशी. मंदारला माझ्या लाडवाला भात - वरण, तूप, मीठ,लिंबू दे आधी.
मुक्ता पदर खोचून स्वयंपाकाला लागते. ( दोन दिवस दवाखान्यात लेकीचे करून मुक्ता दमलेली असतेचं पण सांगणार कोणाला असा विचार करते. )
प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी म्हणून लहान जाऊ मधुरा फ्रेश होते आणि," दमले. ग बाई दमले..." असे म्हणत स्वयंपाकघरात येते.
मुक्ता - " मधू कशी आहेस ? तुझे काय चालू आहे ? आठ - पंधरा दिवस झाले फोन नाही झाला आपला."
" अगं ! दोन दिवस निरूला ताप होता त्यामुळे ती अॅडमिट होती. आज सकाळी डिस्चार्ज मिळाला म्हणून घरी आले."
मधूरा - " अगबाई.."
उषाताई स्वयंपाक घरात येतात.
मुक्ता. (मनात) - कधी नव्हे ते आज स्वयंपाक घरात चक्कर सासूबाईंची..
मधूरा - " मुक्ता वहिनी मला काही सांगा काय करू मी ? "
उषाताई -" मधुरा दमली असशील. अग रात्रभर लांबच्या प्रवासातून आली आहेस. "
मधुरा -" नाही वहिनी पण दमल्या असतील ना दवाखान्यातून आल्या दोन दिवसांनी."
उषाताई - " गुणांची ग बाई माझी. निरू तिकडून आली की उन्हाळ्याच्या सुट्टीला जाऊन की आजारी पडते. "
सासूबाईंच्या बोलण्याने मुक्ता जोरात भांडे आपटते.
मधुरा परातीत कणीक मळायला घेते.
उषाताई -" बाई ग ! माझे गुडघे खूपच दुखतात ग. जरा ऊभी राहिले की.. आ.. आई.. गं.. आआ.. "
मधुरा पळत जाऊन सासूबाईंसाठी खुर्ची आणते.
उषाताई खुर्चीवर बसतात.
मुक्ता - (मनातल्या मनात) कायम या सासूबाईंनी मोठी सून आणि लहान सून कायम भेदभाव केला. कारण लहान सून त्यांच्या सख्या भावाची मुलगी. लहान मुलगा त्यांचा शेंडेफळ लाडाचे. कायम दोन सुनांमध्ये तुलना केली. मोठी कशी वाईट आणि लहान सून म्हणजे अगदी धुतल्या तांदळा सारखीच... मधुरा मुंबईत नोकरी करते. मधुरा कशी साडी घालते छानच रहाते.. मुक्ता मोठी सून म्हणून घरातील कर्ती स्त्री. मग घरात कुलाचार, कुळधर्म, नेवैद्य, सणवार, स्वयंपाक, घरची सगळी कामे करते. मुलांचे करते. नवऱ्याचे करते... गृहिणी घरात कितीही करा किंमत शून्य.... वर तू घरीच असते तुला काय काम आहे.... मधुरा चार - आठ दिवस सुट्टी घेऊन येते आणि करते सासूबाईंच्या पुढे पुढे.. इथेच जवळ माहेर आहे जाऊन येईल आणि माहेर घेऊन येईल. मुक्ता आहेच करायला.. या विचारातचं मुक्ताला चटका लागतो कढईचा जोरात ओरडते. " अग आई.. आई."
उषाताई -" हं लक्ष कुठे असते तुझे."
मधुरा - " पाणी आणते यात घाला बोटे भाजलेली. बर्नॉंल आणून लावते मुक्ताच्या भाजलेल्या बोटांना ."
मुक्ता - " या चटक्यापेक्षा तुमचे वागणे, बोलणे लागते."
उषाताई - " घ्या.. मी काय केले. मी काय म्हणाले आता हिला ? लहान जाऊ आली की असेचं होते. हिचं नेहमीच आहे."
मधुरा -" शांत व्हा आत्या.. "
मुक्ता -" अग मधुरा. पाणी दे त्यांना आणि मला. "
उषाताई पाणी पिऊन त्यांच्या खोलीत जाऊन जरा निवांत पडल्या.
मुक्ता आणि मधुरा स्वयंपाक करायला लागल्या.
मुक्ता -" मधुरा अग निरंजना झाली होती तेव्हा मुलगी झाली म्हणून सासूबाईना काही आनंद नाही झाला. फक्त शुभमनला आनंद झाला होता. सासूबाई दवाखान्यात माझ्याकडे पाठ करून उभ्या होत्या. त्या मधुराला दोन जुळी मुले आहेत याच कौतुक करतात. माझ्या दीपक आणि निरांजनामध्ये भेदभाव करतात. दोन सुनांमध्ये भेदभाव करतात. मला असे वागले की राग येणे स्वाभाविकचं आहे ना ?"

क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा