तू तू में में भाग 4
सगळा स्वयंपाक झाला.. सगळ्यांची जेवण झाली. शेवटी मुक्ता आणि मधुरा दोघी जावा बसल्या जेवायला.
मुक्ता - "बाईचा जन्मच मुळी वाईट."
मधुरा - " असे का म्हणतात वहिनी"
मुक्ता - " काही ठिकाणी गर्भात मारायची जन्मदात्यांनी. मुलगा आणि मुलगी भेदभाव करत वाढवायची. वयात आली मोठी झाली की तिची पाठवणी करायची.. मुलगी परक्याचे धन म्हणायचे जन्मदात्याने. सासरी सगळे अनोळखी माणसे त्यात नवऱ्याला सर्वस्व द्यायचे. तिथे कितीही कष्ट करा करा आणि करा. कोणाला काहीच नाही. सासरी अॅडजेस्ट करा. सासरच्यासाठी तुम्ही परक्या घरातूनच आलेल्या. नैसर्गिक म्हणा, पाळी दर महिन्याला, सगळ्या वेदना... गरोदरपणात, बाळंतपणात किती वेदना असतात. तिचा पुनर्जन्मच. सहन करा. बाळाला जन्म द्या. नाव यांचे आपलं काहीही नाही. एखादी स्त्री बाळाला जन्म नाही देऊ शकली तर सगळ्यांची बोलणी तिलाचं... लगेच तिला सवत काय आणतात.... माहेरी आई आणि बाबा आहेत तोपर्यंत माहेर. तेही लग्नानंतर चार दिवस. सासर आपलं नाही तिथे नवऱ्याची, सासरच्याची सत्ता. नवरा कधी पण म्हणतो निघ माहेरी.... तिचं स्वतःचं असे काय ? काही नाही. सासरी कष्ट, बोलणे, अपमान, टोमणे, सासूरवास काही ठिकाणी मारहाण..... गृहिणी असली तू तर घरीच असते तुला काय काम आहे ? धुणी, भांडी, स्वयंपाक, पाणी आणि स्वच्छता, सणवार जास्त काम, मुलांचे सगळे करा, नवऱ्याचे करा, सासरच्यांचे करा किंमत शून्य.... घरचे सगळे काम करा, विना सुट्टी, बिनपगारी... नोकरी असेल तर दोन्ही करा... नोकरीच्या ठिकाणी स्त्री म्हणून किती गोष्टी सहन कराव्या लागत असतात. . बंधने तर विचारूचं नका साडी नेसली पाहिजे. हातात काचेच्या बांगड्या हव्या. सातच्या आत घरात पाहिजे. कुठे घुंगट पाहिजे. कुठे काही. माहेरी जायला बंधने. . सणवार उपवास सगळे स्त्रियांना. रांधा, वाढा, उष्टी काढा.... कामाला आधी... जेवायला शेवटी.... विनोद आणि शिव्या स्त्रीवर. हुंडाबळी, त्रास, अन्याय, अत्याचार, बलात्कार, खून स्त्रियांचे रोज ऐकायला मिळतात. पोटतिडकीने खरेचं मुक्ता बोलत होती.
दोघी जावा पोटभर जेवल्या. मागची आवराआवर केली.. दमल्या होत्या गेल्या आपल्या आपल्या बेडरूम मध्ये झोपायला. ..
मधुरा मनात विचार करत असते, ' वहिनी खरचं बोलत होत्या. स्त्री जन्मा तुझी कहाणी.'
दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ताचा लहान दिर बाहेर जाण्याचा बेत बनवत होता. निसर्गरम्य ठिकाणी, देवाला, वॉटर पार्कमध्ये, चित्रपट, गार्डन, हॉटेलमध्ये कुठे जायचे ते ठरवा. सगळी फॅमिली जायचे ठरवते.
सासूबाईं म्हणाल्या, " निरंजनाला काल बरे वाटले तर तिने आणि मुक्ताने घरीचं थांबावे."
शेवटी हो नाही करता करता सगळे जण गेले. मुक्ता आणि निरंजना सुद्धा.
आता सासुबाईचे काही दुखत नव्हते त्या मजेत आहेत हे मुक्ताला जाणवले.
मुक्ता ही खूप खुश होती. असा एक दिवस तिला हवा होता. सगळ्या कुटुंबीयांनी सेल्फी, फोटो खूप काढले.
निरंजनाला मुक्ता जपत होती. दोघी एन्जॉय करता येईल तितकं करत होत्या.
जगून घे....
जरी तुझ्या आयुष्यात अनंत अडचणी
तरी तुझे जगून घे.. नको उगाच बोचणी....
जरी संघर्ष असेल प्रत्येक क्षणी
तरी अनुभव मोठा गाठीशी बांधोनी....
तू जगून घे.. नको उगाच बोचणी
तुझे रडणे, हसणे तुझी तू जगून घे जीवनी.....
दुःख, त्रास, संघर्ष, यातना सारे विसरोनी
तरी आपल्या सुखाच्या क्षणांनी घे ओंजळ भरोनी....
तुझी तू वेळ पडल्यास हो रणरागिणी
तुच आहे दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, शक्ती घे जाणोनी....
घे मोकळा श्वास भरोनी
उठ आता जिद्दीनी...
जगून घे या जीवनी...
जगून घे या जीवनी..
मुक्ताने सासूबाईंचे, सासूरवासाचे, वाईट अनुभव क्षण सोडून द्यायचे ठरवले. आणि पूर्ण दिवस आनंदात जगली. जे वाईट वागले त्यांचा हिशोब परमेश्वर बघेल. आपण आपल्यासाठी माफ करायचे जगाला. हे निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला गेल्यावर मुक्ताला जाणवले. आता मागे वळून पहायचे नाही. हा निश्चय केला आज मुक्ताने.
क्रमशः

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा