तू तू में में अंतीम भाग
मुक्ता पहाटे रोज ब्रम्ह मुहूर्तावर उठून. 3 ते सूर्योदयाच्या आधीपर्यंत जमिनीवर एक आसन टाकून मांडी घालून डोळे मिटून चाळीस मिनीटे रोज रामाचे नाव घ्यायला लागली. दिवसभर तिच्या मनाला एक शांती, एक ठेहराव मिळाला. कधी रडू येत होते पण मन हलके होऊन जायचे. रामाचे नाव घ्यायचे. चाळीस मिनीटे गजर लावून रामाचे नाव घेऊन असे वाटते ते तिला शब्दात सांगण्यासारखे नव्हते. त्या रामाची मानसिक पूजा करा. त्याचीच मूर्ती डोळ्यासमोर आणून नमस्कार करा. साग्रसंगीत नमस्कार पुजा करून वा जे मिळेल ते अवर्णनीय आहे असे मुक्ताला वाटू लागले.
मुक्ता तिच्या नवऱ्याला म्हणजेच शुभमनला बोलली, " नंतर फ्रेश व्हा किंवा त्याआधी.. पण अनुभव म्हणजे अनुभव.. मनापासून नाव घ्या. एकाग्रतेने घ्या. रोज रामाचे नाव घ्या. शुभमन तुम्ही करून पहा. "
मुक्तामधला सकारात्मक बदल शुभमनला जाणवत होता.
मधुरा , शार्दूल, मुले - मंदार आणि केदार चार दिवस राहून परत मुंबईला जाणार असतात. मुक्ता त्यांना डबा करून देते.
सासूबाई - " मी येते स्टेशनवर सोडायला तुम्हाला शुभमन सोबत."
शार्दूल म्हणतो, " नको आई, नको त्रास करून घेऊस."
तरीदेखील उषाताई शुभमनसोबत जातात. स्टेशनवर कोणाची बॅग लागल्याने गुडघ्याला दुखापत होते. घरी येताच मुक्ताच्या सासुबाई जोरात आरडाओरडा करत असतात.
शुभमन ऑफिससाठी निघून गेला.
मुक्ता सासुबाईंना दवाखान्यात घेऊन जाते. डॉक्टर तपासणी करून सांगतात गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागेल. मोठीच फी सांगतात. मुक्ता शुभमनला फोन करते. शुभमन अर्ध्या दिवसाची सुट्टी काढून येतो. शार्दूल आणि मधुराला आता लगेच सुट्टी मिळणार नसते. शार्दूल काही पैसे पाठवतो. शुभमन त्याची सेव्हिंग काढतो. सासूबाईंच्या पेन्शनमधीलं काही रक्कम काढतात. डॉक्टरांकडे जमा करतात तरी डॉक्टर म्हणतात," अजून मोठी रक्कम बाकी आहे पूर्ण फी भरा मगच ऑपरेशन करू शकतो."
सासूबाईंचे गुडघे दुखतचं होते. अशावेळी काय करावे शुभमनला प्रश्न पडतो. उषाताई शुभमनला विचारातात किती पैसे कमी पडत आहेत तर एक लाख अजून हवे आहेत असे कळले. उषाताई डोक्याला हात लावून बसल्या. इतक्यात तिथे मुक्ता धावत पळत एक लाख रुपयांची सोय करून आलेली होती. मुक्ता शुभमन कडे एक लाख देत म्हणाली," डॉक्टरांकडे जमा करा लवकर म्हणजे सासूबाईंचे ऑपरेशन सुरू होईल."
शुभमन पैसे घेऊन जमा करायला गेला.
उषाताई - " पैसा कुठून आणलास ग तू मुक्ता? एवढे एक लाख रुपये? काय ग? तू काहीच तर कमवत नाहीस."
मुक्ता त्यावर बोलली, " माझ्या आई, बाबांनी, शुभमननी दिलेले मला ते पैसे. ते मी जमवलेले, डब्यात साठवलेले होते. सासूबाई, आता ऑपरेशन महत्वाचे आहे तुमचे."
मुक्ताचे म्हणणे ऐकल्यावर सासुबाईंच्या डोळ्यांत पाणी आले. त्या निःशब्द झाल्या. त्यांचा कंठ दाटून आला. ज्या मुक्ताला त्यांनी नीट वागवले नाही. जिच्या आई, बाबांशी नीट बोललो नाही. त्यांचे पैसे आज उषाताईंच्याऑपरेशनसाठी कामी आले होते.
इतक्यात तिथे शुभमन येतो आणि मुक्ताला विचारतो, " मी पैसे जमा केले आहेत. ऑपरेशन थोड्या वेळाने आहे. काय ग मुक्ता तू कोठून आणलेस पैसे ?"
मुक्ता म्हणते, "मी साठवलेले आहेत ते पैसे. वेळेवर कामी आले. बचतीचे महत्त्व आहे. "
सासूबाईंनी मुक्ताला जवळ बोलावले. त्यांनी तिच्या गालावरून मायेने पहिल्यांदा हात फिरवला आणि म्हणाल्या, " मुक्ता ! मी चुकले मला माफ कर. मुक्ता तू चांगली आहेस. माझ्या अडल्या वेळेला कामी आलीस. (सासुबाईंच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागते. )
मुक्ता म्हणते, " सासूबाई आता रडू नका. सगळं जुने विसरूया ना. आता ऑपरेशन झाले की तुमचा गुडघा दुखणार नाही. आता सगळे चांगले होणार आहे. "
सासूबाई -" हो "
मुक्ताने आपल्या आई, बाबांना सासूबाईंचे गुढघ्याचे ऑपरेशन होणार आहे असे कळवले.
मुक्ताचे बाबा म्हणाले, " काही मदत हवी आहे का सांग. काळजी घे सासूबाईंची. मुक्ता नेहमी चांगली बाजू पहावी. सासूबाईंनी तुझ्यासाठी, तुझ्या मुलांसाठी काही केले ते पहा. कोणीही आपल्याशी कसेही वागो आपण चांगले वागायचे. समोरच्याला चांगुलपणाने जिंकून घ्यायचे मुक्ता बेटा.."
आईवडिलांची चांगली शिकवणचं आज मुक्ताच्या कामी आली होती. मुक्ताने चांगल्या वागणुकीने तिच्या सासूबाईंचे मन जिंकले होते.
समाप्त

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा