Login

तु तुझ्यासाठी उभ रहा भाग 1

सहन करायची ही काही मर्यादा असते यातून बाहेर पडल पाहिजे
तू तुझ्यासाठी उभ रहा भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.......

"आपले तिकीट कॉन्फर्म झालं आहे." मुकेश ऑफिस मधून आल्या आल्या त्याचा लेकीला आराध्याला सांगत होता.

"ये बाबा. कधी निघायच आहे?" ती खुश होती.

" पंधरा दिवस आहेत अजून. बरका आई बाबा तयारीला लागा आता. काही हव असेल तर मागवून घ्या."

"अरे आम्ही कशाला हवे सोबत? तुम्ही तीघ जावून या ना. आमच्या कडून आता हल्ली धावपळ होत नाही. " पदमा ताई बोलल्या.

" ते चालणार नाही. तुम्ही दोघ हवे. मी ऐकणार नाही. सगळीकडे आपण स्पेशल गाडी केली आहे. फक्त दूरचा प्रवास ट्रेनचा आहे. " मुकेश आग्रह करत होते.

त्या सगळ्यांचा आवाज ऐकुन आसावरी किचन मधून बाहेर आली. "काय सुरू आहे? मला पण सांगा ना." पण मुकेशने तिच्याकडे बघितल ही नाही. तो आई बाबां सोबत बोलण्यात बिझी होता.

आसावरी, मुकेश.. नवरा बायको. आणि आराध्या त्यांची लेक. त्याचे आई बाबा. असे पाच लोक एकत्र रहात होते. मुकेश त्याचे आई बाबा तिघे खूप प्रेमाने एकमेकांना धरून रहात होते. आराध्या सगळ्यांशी नीट वागत बोलत होती. आसावरी अजूनही त्या घरात परकी होती. मुकेश तिला कुठल्याही गोष्टीत सामील करून घेत नव्हते. तीच काम फक्त स्वयंपाक करण. घरच्यांची सेवा करण. बाकी काही विचारायच नाही. तिने ते मान्य केल होत. त्रास करून घ्यायचा नाही. शांत रहायच. बोलून उपयोग नव्हता. दुप्पट मनस्ताप होत होता.

"आई आपल फिरायला जायचं तिकीट कॉन्फर्म झाल. आपण आता हळू हळू तयारीला लागु." आराध्या तिच्या गळ्यात पडत बोलली.

"हो नक्की." आसावरी आत निघून गेली. शेवटच्या दोन पोळ्या बाकी होत्या त्या केल्या. डायनिंग टेबल वर सगळे भांडे ठेवले. ताट करायला घेतले. तो पर्यंत मुकेश फ्रेश होवुन आले. " आधी आई बाबांच ताट दे. " नेहमीप्रमाणे बोलले.

"जस काही त्यांच्या आई बाबांना मी दिवस भर उपाशी ठेवल आहे. हे आल्याने ते जेवतील. नेहमी अस का करतात हे समजत नाही. तरी किती काळजी घेते मी सासू सासर्‍यांची. पण त्यांना विश्वास नाही ." ती मनाशी विचार करत होती.

"हो ताट करते आहे." आसावरी बोलली.

"सावकाश आवर आसावरी. सगळ्यांसोबत बसू आम्ही ही." पदमा ताई बोलल्या. त्या चांगल्या होत्या.

"नाही आई बाबा चला बसा. तुमच्या गोळ्या असतात. आटपा." मुकेश स्वतः त्यांना घेवून आले.

जेवण झाल. आवरून झाल. सगळे पुढे बसले होते.

"तयारीला लाग आता आराध्या. तुझ्या मम्मीला मदत कर. तिला काही सुचत नाही. ती गोंधळ घालून ठेवते. " नेहमी प्रमाणे मुकेश बोलले. आसावरीचा चेहरा उतरला.

" सुचत की तिला किती व्यवस्थित काम आहे तिच. बाबा तुम्ही सदोदित आईला बोलू नका. घरच एवढ मॅनेजमेंट कोण करत? एक दिवस काही बोलायला जागा नाही इतक परफेक्ट काम आहे तिच." आराध्या बोलली.

आसावरी घाबरली. ही आराध्या ना अजिबात ऐकुन घेत नाही. आता हे चिडले म्हणजे माझ्याशी बोलणार नाहीत. म्हणून मी यांच्याशी डोक लावत नाही. एक तर ट्रीप आहे. किती बोर होईल तिकडे.

आराध्या आजी सोबत ठरवत होती काय काय करायच ते. "अगदी धमाल करणार आहोत आपण आजी." आजोबा पण हसत होते. दोघांच आराध्याशी छान पटत होतं. दोन दिवस देव दर्शन. नंतर दोन दिवस जवळच्या हिल स्टेशन वर ते जाणार होते.

"चला आराम करा आता." ते आत गेले.

"आई मला नवीन ड्रेस हवे. " आराध्या रूम मधे आली.

आसावरी आत आवरत होती. "हो घेवू."

दुसर्‍या दिवशी आसावरी नेहमी प्रमाणे कामात होती. मुकेश ऑफिसला गेले. आसावरीने आजी आजोबांचे कपडे व्यवस्थित आहे का ते बघितल.

कॉलेज सुटल आराध्या घरी यायला निघाली. तिने मार्केट मधून घरी फोन केला. "आई अग इथे छान सेल लागला आहे. छान ड्रेस आहेत. ये ना पटकन."

"अग अस काम सोडून कस जमेल. आजी आजोबा जेवता आहेत."

"ते घेतील ना त्यांच त्यांच. लहान आहेत का ते. आणि ते काही म्हणत नाहीत. दहा मिनिटात नीघ." आराध्या घाई करत होती.

"बरोबर आहे आजी आजोबा काही म्हणत नाही. पण तुझे बाबा त्यांना समजल तर? होऊ दे यांचे जेवण. त्या नंतर येते मी. "

ठीक आहे. दोघांच जेवण झालं. गोळ्या औषध घेवून झाले.

" आई मी आराध्या सोबत शॉपिंगला जाऊ का? " आसावरीने विचारल.

" हो जावून ये. "

" तुम्हाला काही हव का?"

" नाही. "

" मी लगेच येते दोन तासात. प्लीज काही आवरु नका. "

नाही.

तिने त्यांच्या रूम मधे पाणी नेवून ठेवल. मागे अस झालं होत. कोणत्या तरी कार्यक्रमाला आसावरी गेली होती. इकडे पदमा ताईंना चहा करतांना चटका लागला. मुकेश किती चिडले होते. फाडफाड बोलले होते तिला. "आधी घरचे काम करायचे. आई बाबांच करायच. मग इतर गोष्टी समजल ना. आईला काही झालं तर तू आहेस आणि मी आहे."

तेव्हा पासून आसावरीने धसका घेतला होता. माझ राहू दे. आधी ही जबाबदारी पूर्ण करू. यामुळे ती पूर्ण पणे अडकून गेली होती. अगदी स्वतःसाठी तिला वेळ काढता येत नव्हता. सासू सासरे चांगले होते. पण लहान मुलां प्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागायची.

स्वतः मुकेश काही करायचे नाहीत सगळं काम आसावरीला द्यायचे. आई वडील त्यांचे. करणारी आसावरी. तरी तिला कायम बोलणे बसायचे . काय अस आहे हे? आसावरीला समजल नव्हत. ती खूप कंटाळली होती.


0

🎭 Series Post

View all