तू तुझ्यासाठी उभ रहा भाग 3
©️®️शिल्पा सुतार
.......
.......
रात्री आसावरी खोलीत आली. मुकेश तिची वाट बघत होते. तिला महिती होत आज काहीतरी होणार आहे. हे चिडलेले होते. यांच्या मनाविरुद्ध थोड जरी झाल तरी त्या दिवशी मला खूप बोलणी खावी लागतात. काय हे अस. .
"थोड्या वेळा पूर्वी काय चालल होत तुझ आसावरी? सगळ्यां समोर तू मुद्दाम माझ ऐकत नाही ना. मला खाली बघायला लावते. एकदम तुला तुझ्या मनाच करायच आहे अस वाटायला लागल का? पण मी तुला सांगून ठेवतो असा फालतू पणा माझ्या समोर चालणार नाही." ते चिडून बोलले.
" माझ्या मनाच करायला हव हे मला आधी पासून वाटत. पण मी काहीच बोलत नाही. घरची शांती महत्वाची." आसावरी हळूच बोलली.
"म्हणजे मी काहीही झाल तर आकांडतांडव करतो. तुला माझ ऐकाव लागत. अस म्हणायच आहे का तुला?"
"अहो अस काही नाही. तुम्ही छोटी गोष्ट मोठी करता आहात." आसावरी सावकाश बोलली.
"मी मोठी करतो आसावरी? तू पाहिल्या पासून काहीच ऐकत नाहीस. काय करायचं ते करा. माझ कुठे ऐकते तू. पटत नसेल तर रहायच नाही इथे. हे माझ घर आहे. इथे कसही वागता येणार नाही. या घराचे दरवाजे तुला उघडे आहेत निघायच लगेच. " त्यांनी झोपून घेतल.
आसावरी रडत होती. झाल म्हणजे इतक करून हे घर माझ नाही. ती किचन मधे उभी होती.
आराध्य आली . "काय सुरू आहे आई? बाबा बोलले का? हे अति होत चालल आहे. बाबा अति कंट्रोल करतात तुला. तू काहीच का बोलत नाही."
"मला ही नको नको झाल आहे आराध्या. आता हे सहन होत नाही. काय करू मी?"
"तूच हे नीट करू शकते."
"पण कस?"
" थोडे दिवस मावशी कडे जा. मी बोलते बाबांशी. "
" मी गेली यांनी वापस बोलवलं नाही तर." आसावरी घाबरली होती.
"हे शक्य नाही आई. तू किती महत्वाची आहे हे तुला माहिती नाही. स्वतः ची किम्मत कमी करू नकोस. तू थोडा प्रयत्न तर कर. होईल ठीक. "
"ठीक आहे. जे होईल ते. तू मला मदत करशील ना. "
हो.
" मी तुझ्या मावशी कडे जाते मग. तुझे बाबा समजून घेत नाही. वैताग आला आहे. त्यांनी समजूतदार पणा दाखवला तर परत येईल."
ती आज आराध्यच्या खोलीत झोपली. सकाळी पदमा ताईंना भेटली. त्यांना सगळ सांगितल. "काळजी घे बेटा. हे लवकर नीट व्हायला हव."
" आराध्या मला काही सुचत नाही. कस होईल पुढे?" आसावरी निघत होती.
" बरोबर करते आहेस तू आई. काळजी करू नकोस. आपण बाबांना झटका देणार आहोत. "
" अग पण त्यांनी राग धरला तर? " ती काळजीत होती.
" तुझ्या शिवाय या घरात काही होत नाही. त्यांनी राग धरून उपयोग नाही. तुला नीट करायच ना तुझ आयुष्य?"
हो.
" मग माझ एक. "
आसावरी बहिणी कडे निघून गेली. तिकडे गेल्यावर ती बहिणीला सगळं सांगत होती.
" किती विचित्र आहेत मुकेश. तू पण सडेतोड रहा ग. पूर्वी पासून सांगते मी. आपल वय झाल किती वर्ष तू तोच त्रास सहन करणार. काम सुरू कर. एवढी शिकलेले चोवीस तास अवेलेबल असते म्हणून त्यांना तुझी किम्मत नाही. आधी सारख क्लासेस जॉईन कर. छान शिकवते तू."
"आज जावू आपण चौकशी साठी. मला ही आता काम करायच आहे. पण मला जमेल ना? "
" हो सांगू आपण त्यांना तस थोड ट्रेनिंग वगैरे देतील ते तुला." मावशी बोलली.
मुकेश उठले. आज जरा उशीर झाला का उठायला. घरात शांतता होती. कुठे गेले सगळे? आई बाबा रूम मधे होते. आराध्या आवरत होती. "बाबा मी कॉलेजला जाते."
"आसावरी कुठे आहे?"
"आई गेली. तुम्ही म्हणत होते ना पटत नसेल तर जा घरातून. ती गेली." आराध्या सांगत होती.
"काय? कुठे? डोक ठिकाणावर आहे ना तीच. अति फाजील पणा आहे हा. येवू दे तिला मग बघतो." मुकेश नेहमीप्रमाणे चिडले.
"बाबा तुम्ही किती विचित्र वागता आहात. काहीही बोलता आहात. तुम्ही आईला समजून का घेत नाही. ती दुःखी असते बाबा. गेली ती घर सोडून. "
" दुःखी म्हणे खाऊन पिऊन काय होत यांना. काही करायला नको. नेहमी रडगाणं सुरू."
" बाबा मला तुमच्या विचारांची कीव वाटते. तिला घरात किती त्रास होता. बर झाल सुटली ती. बाबा आजी आजोबांच आवरून खाण करून औषध देवून तुम्ही ऑफिसला जा. त्यांच्या दुपारच्या जेवणच काय?"
"तू येते का लवकर? "
"माझ प्रॅक्टीकल आहे. मला संध्याकाळ होईल. मला जमणार नाही."
" मग कस करू या? "
"आजीला काही लागल तर. तुम्ही तिला काम करू देत नाही. तीला सवय नाही. ठीक आहे ठरवा तुमच तुम्ही. तुमचे आई बाबा आहेत. हे रूल्स तुमचे आहेत. मी तिकडे खाईन." ती निघून गेली.
मुकेश रूम मधे आले. आसावरीला फोन केला. तिने उचलला नाही. त्यांनी मेसेज केला. "अर्धा तासात ये नाहीतर आपला संबंध संपला. "
तिने उत्तर दिले नाही. ती आली नाही.
त्यांनी पोहे केले. अतिशय पसारा झाला होता. पदमा ताईंना इतर वेळी ते काम करू देत नव्हते. त्यामुळे आता काय सांगणार. चहा झाला.
ऑफिस मधे फोन करून सांगितल. वर्क फ्रॉम होम आहे. घर आवरल.
दुपारी काय करू? भाज्या नव्हत्या." मी भाजी आणतो." मुकेश मार्केट मधे जावुन आले.
सगळं काम घरी होत. त्यांना कामाला बाई आवडत नव्हती. त्याच्या मते घरात विशेष काम नव्हत. एका दिवसात जड जात होत आसावरी अस काम रोज करत होती.
कसतरी आवरल आता पर्यंत आजी आजोबा शांत होते त्यांनी जेवताना विषय काढला. "आसावरी कुठे आहे? "
" तीच वागण आता हल्ली खूप विचित्र झाल आहे. रागवून ती कुठे तरी गेली आहे. किती दिवस राहील पण येईल बरोबर." मुकेश बोलले.
"काय बोलतो आहेस तू तुला तरी समजत ना मुकेश?" आजोबा ओरडले.
"आसावरी सोबत तुझ वागण आम्हाला अजिबात पटलेल नाही. आमची इतकी काळजी घेतोस मुलगा म्हणून तू उत्तम आहेस. नवरा म्हणून तू नापास झाला मुकेश. मी मागे पण तुला किती वेळा बोलले होते आसावरी सोबत नीट वाग. तुला समजत नाही का. कुठे आहे ती जा तिला घेवून ये." पदमा ताई बोलल्या.
मुकेश विचार करत होते. माझ चुकलं का?
आराध्या आली. तिने चहा केला. ती अभ्यासाला बसली.
" आराध्या आसावरी कुठे आहे? चल आपण तिला घ्यायला जावू. "
" ती येणार नाही बाबा. कंटाळली आहे. राहु द्या तिला मावशी कडे. कोणाला नको आहे ती."
"किती गडबड उडते आहे. "
"हो का? त्या साठी हवी आहे का ती? घरकाम करायला बाई मिळते ती लावा. तुम्हाला बायकोची गरज नाही." आराध्या बोलली.
" जास्त बोलते तू आराध्या. "
" काय चुकलं माझ? तुम्ही कधी तिला प्रेम आधार दिला? सदोदित पाण्यात बघितल. जावू द्या आईला. तस ही तुमच्या मते आई काही करत नव्हती. काय विशेष काम असत घरात. करा ना मग आता तुम्ही. एका दिवसात थकला. पंचवीस वर्षे झाली आई नॉन स्टॉप कामात आहे. शारीरिक ताण मानसिक ताण किती असेल तिला. विचार करा जरा. "
मुकेश रूम मधे निघून गेले.
सकाळी त्यांनी चहा नाश्ता बनवला. भांडी धुतली. आराध्याने बाकीच घर आवरल.
" आईला फोन लाव आराध्या. प्लीज. मी या पुढे नीट वागेन. मला हवी आहे ती. ते मोठ्या कष्टाने बोलले. "
" अस नाही बाबा काही अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. "
चालेल.
"आई समोर बोलायच आता नाही. ती लगेच येणार नाही."
"प्लीज आता बोलाव ना. मी या पुढे शांत राहील." मुकेश बोलले.
" नाही थोडे दिवस जावू द्या. तुम्ही काही लहान नाही आपल आपल काम करा." आराध्या कॉलेजला गेली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा