Login

तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार भाग २

स्वत:हून आवडीने केलेल्या कामात ईश्वरीय आशिर्वाद असतो.
" आज सगळे वेळेत हजर झालात. परीक्षा जवळ आली म्हणून झपाट्याने अभ्यासाला लागलेले दिसतात सर्वजण."

" हो गुरुजी."

" चला‌ तर मग आपण पुढच्या पाठाला सुरवात करु."

" लक्ष कुठे आहे तुझे. कोणत्या विचारात हरवला आहेस. तू तर सर्वांच्या आधीच पुस्तक उघडून तयार असतो. काय झाले तुला. तब्येत बरी आहे ना तुझी."

" आज बहुतेक तो देवाचे स्त्रोत न म्हणताच आला असेल."

" हसताय काय. झाल तरी काय सांगाल का मला. आणि देवाचे स्त्रोत? आपण सर्वजण घराबाहेर निघाताना देवाला नमस्कार करतो. यात हसण्यासारख काय आहे."

" केशव तू सांग काय झाले नक्की."

" तुला नाही बोलायचे काही. राहू दे. तू शाळा सुटल्यावर माझ्या केबिन मधे ये. तेव्हा बोल हवतर. आत्ता आपण हा पाठ पूर्ण करुयात."

" चालेल गुरूजी."

" खबरदार जर माझी तक्रार गुरुजींना सांगितली तर. लाथा, बुक्का खायला तयार रहा. मी माझ्या गल्लीतल्या मित्रांना घेवूनच येईल बघ. "

" नाही सांगणार मी तुझ नाव. पण मला गुरुजींना भेटाव तर लागेल ना."

" एवढा वेळ काय करत होतास. तू माझ नाव सांगितल असणार. खर बोल."

" मला एक गणित अडले होते. तेच गुरुजी मला सांगत होते. त्यांनी मी हेच सांगितले की कितीही वेळा गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तरी सुटत नव्हते."

" तुझ्या सारख्या हुशार मुलाल गणित सुटत नव्हते. ऐकायला नविन वाटत आहे. मग सुटले का आता? की नविन एखादी पूजा गुरुजींनी करायला सांगितली तुला."

" तुला खर सांगितल तरी पटत नाही. आणि तुझा काय राग आहे एवढा देवावर."

" तुला काय करायचे."

" काही नाही. पण मला अस सारख नको टोचून बोलत जावूस."

" गुरुजी आत येवू का मी."

" ये केशव."

" खरतर मला त्या दिवशी ते गणित सोडवता आले होते. पण त्या दिवशी मी तुम्हांला खर कारण सांगू शकलो नव्हतो. पण आज मला तुम्हांला खर काय ते सांगायच आहे."

" मला वाटलेच होते. तू काहीतरी लपवत आहेस ते. न‌ घाबरता सांग काय झाले ते."

" गुरुजी संकेत मला नेहमी चिडवत असतो. माझ्या देवाप्रती असलेल्या श्रद्धेची अवहेलना करतो. सगळ्यांसमोर माझी थट्टा करतो. मी बोलत असणाऱ्या श्लोकांची टर उडवतो. मी देवाच करतो म्हणून मी हुशार आहे. असे म्हणून तो माझी दिशा भूल करतो. ज्यामुळे मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देवून अभ्यासात मागे पडावे."

" अस आहे तर सगळे. सोप आहे केशव. तू मी सांगेल ते ऐकशील का?"

" हो गुरुजी. यातून तुम्हीच मला बाहेर काढू शकाल. नाहीतर मला आता वेड लागेल."

" यात एवढे वेड होण्यासारख काहीच नाही. आपण शांत राहून परीस्थिती हाताळली की मार्ग आपोआप सुचत जातात."

गुरुजी केशवला काय करायला सांगणार आहे. संकेत केशवचे ऐकेल का? संकेतचे डोळे उघडतील का? पाहूया अंतिम भागात.

क्रमशः

विषय : पिंडी ते ब्रम्हांडी
जलद लेखन फेब्रुवारी

🎭 Series Post

View all