" आज पण नाही आला का केशव शाळेत."
" नाही ना. त्याने नविन घर घेतले त्याचीच पूजा आहे घरी."
" अस करुन कसे चालेल. तोंडावर परीक्षा आली आहे. आणि त्याने महत्वाचे धडे शिकायचा राहिला तर त्याचे असे होईल."
" त्याचा देवावर विश्वास आहे खूप. तो दररोज पूजापाठ करतो. सगळे स्त्रोत पाठ आहेत त्याचे. ते सुद्धा संस्कृत भाषेत."
" हि चांगली गोष्ट आहे. देवावर विश्वास हवा. पण म्हणून अभ्यास न करताच त्याला परीक्षेला कसे बसता येईल. कर्म केल्यानंतर उत्तम फळ मिळतेच. पण जर कर्म केलेच नाही. तर आपोआप गोष्टी घडणार आहेत का."
" संकेत या प्रश्नाचे उत्तर तू सोडवले का? "
" हो गुरुजी सोडवले आहे."
" हे उत्तर बरोबर नाही. अमोल तू या प्रश्नाचे उत्तर फळ्यावर सोडवून दाखव."
" सर मला एवढेच जमले."
" सर आत येवू का मी."
" केशव ये ना. उशीर कसा झाला तुला."
" रस्त्यात येताना ट्रॅफिक लागले खूप सर. रस्त्याचे काम जागोजागी सुरु आहे. त्यामुळे एकाच रस्ता वापरुन येणाऱ्या आणि जाणा-या गाड्या जात आहे."
" उद्यापासून घरातून लवकर निघत जा."
" हो सर. "
" निरंजन तू सोडव फळ्यावरचे गणित."
" सर मी सोडवू का? "
" केशव तू. पण त्या दिवशी तू तर गैरहजर होता. तरीही तुला हा प्रश्न सोडवावा लागतो छान."
" सर झाले सोडवून."
" अगदी बरोबर. केशव हुशार आहेस तू. गैरहजर राहून देखील तुला या प्रश्नाचे उत्तर सोडवता आले."
" काय रे, तुला कस काय सोडवता आले. कि आता देखील तुझा देव धावून आला का."
" अस काय बोलतोय संकेत तू. तो आहे म्हणून तर आपण प्रत्येक काम यशस्वी पणे करत आहोत."
" काही नको सांगू मला. माझा नाही विश्वास या सगळ्यावर. अंधश्रद्धा आहे."
" नाही ना विश्वास मग तुला समजवण्यात काही अर्थच राहत नाही."
" काय झाले तुला असे नाराज व्हायला."
" बघ ना संकेत मला नेहमी चिडवत असतो. बोलतो सारखा देव देव करतो म्हणूनच ह्याला सगळे येते."
" असू दे की मग. चांगलच आहे."
" तस नाही आई. तो देवांना मानत नाही. देवांना पण काही बाही बोलत असतो. भक्ती बरोबर मी आई अभ्यास देखील करत असतो."
" तू तस समजव ना संकेतला. की अभ्यास करणे. तेवढेच आवश्यक आहे."
" त्याला फक्त मला मागे खेचायचे आहे. स्वत:ला काहीच करायचे नाही."
" तू तुझे काम करत राहत. त्याच्याकडे दुर्लक्ष करत जा."
संकेत केशवला असाच चिडवत राहिल का? गुरुंजी जवळ ह्या गोष्टी जातील का? यावर गुरुजी कोणता सल्ला केशवला देतील. पाहुया पुढच्या भागात.
क्रमशः
विषय : पिंडी ते ब्रम्हांडी
जलद लेखन फेब्रुवारी.
जलद लेखन फेब्रुवारी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा