"बरं जाते आई मी, तू जा फ्रेश हो."
श्रावणी खाली गेली आणि पार्सल घेवून पळतच घरात आली.
"अरे बापरे!!श्रावणी एवढ्या लवकर गेली आणि आली सुद्धा.चल पटकन गार व्हायच्या आत खावून घेवू. हे बघ श्रावणी मी ना उद्या जरा लवकर निघून जाणार आहे, तू तुझं आवर आणि जा कॉलेजला आणि येतांना पण मला उशीर होईल कळलं का?"
आईचं बोलून झाल्यावर श्रावणी काहीच बोलली नाही मात्र उठली आणि आईच्या गल्यात पडून रडायला लागली.
"अगं काय झालं रडायला? जेवतांना रडायचं नसते अस."
"आई ...आई..."
तिच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नव्हता.
आईला आता मात्र खूप काळजी वाटू लागली त्याच्याबरोबर थोडी भीती सुद्धा.
आता मात्र आईने तिला एक शब्दही विचारलं नाही आणि तिला जेवण वाढलं दोघींनी जेवण केलं आणि बेडरूममध्ये गेल्या.
"आई तू नको ना जाऊ मला सोडून."
"हे बघ श्रावणी काहीतरी नक्कीच घडलं आहे ते खरं खरं सांग मला."
"आई.. अगं कसं सांगू?"
"कसं म्हणजे जे काही घडलं ते सांग एक मैत्रीण मानते ना बाळा मला."
आईने तिला धीर दिला, तिला बरच समजावलं आणि मग कुठे श्रावणीने सांगायला सुरुवात केली.
"आई उद्या आठ दिवस होतील काही मुलं माझ्या मागे घरापर्यंत येतात."
"पण बाळा तू तर ऑटोने येते ना."
"हो आई पण कुठलच ऑटो आता घरापर्यंत सोडत नाही, तो चौफुलीवर सोडतो. तिथून घरी यायला पाच मिनट लागतात गं."
"बरं मग?"
"तू सकाळी मला कॉलेजला सोडते हे देखील माहीत आहे त्यांना. मी लवकर निघाले तरीही ते येतात माझ्या मागे आणि उशिरा निघाले तरीही."
"त्यांना कसं कळलं मी तुला सोडते."
"माहीत नाही गं."
"बरं मग काही चिडवतात, बोलतात की अजून काही करतात."
"आई अगं आधी दोन तीन दिवस फक्त ते मागे आले, मग दोन दिवस घाण बोलायला सुरुवात केली ,पण आज..."
"पण आज काय?"
"अगं आई आज त्यातल्या एकाने मला धक्का दिला आणि मी दुसऱ्या मुलाच्या अंगावर पडणार तोच एकाने मला नको त्या ठिकाणी हाथ लावून मी पडू नये म्हणून मला पकडले."
"मग तू ओरडायच ना, त्या रस्त्यात बरीच माणसं आपल्याला ओळखतात कुणीतरी मदतीला येईलच बाळा."
"आई, अगं दुपारी जरा शांतता असते आणि कुणी काही बोलत नाही. मी बघितली की काही जण बघून न बघिल्यासारखे करतात."
"बरं ती मूलं ओळखीची आहेत का तुझ्या?"
"नाही गं .."
"बरं उद्या मी नाही जात ऑफिसला बॉसला कळवते की, मला उद्या यायला जनमार नाही."
आईने बॉसला कॉल केला,
"हॅलो सर सॉरी मी जरा उशीर कॉल केला."
"बोला काय काम होतं?"
"मला ना ...मला ना...उद्या यायला नाही जमणार."
"का ? काय झाले?"
"जरा फॅमिली इश्यू आहे म्हणजे माझी मुलगी.."
"हे बघा मॅडम तुम्हाला मी खूप सूट दिली आतापर्यंत.यावेळी मात्र नाही अहो कारण तस आहे. अहो तुम्ही नाही आलात तर खूप मोठं नुकसान होईल कंपनीचे. आता मुलगी मोठी झाली तुमची."
तेवढ्यात श्रावणीने फोन कट केला
"आई माझ्यासाठी कुणाचे पाय धरायची गरज नाही."
"मी घराच्या बाहेर नाही पडणार आता.."
"म्हणजे घरातच राहणार आहेस की काय?"
"नाही गं उद्या तरी घरातच राहील मी."
"अगं वेड बीड लागलं का? तुला माहीत आहे तू दोन वर्षाची होती तेव्हा तुझे बाबा आपल्याला सोडून गेले. त्यासाठी मला दोष दिला गेला आणि सासरी हाकलून दिले. तुला घेवून कुठे जावू हा यक्ष प्रश्न होता मात्र घरी काम करणाऱ्या मावशींनी मला राहायला जागा दिली कारण माझ्या माहेरी जवळच असं कुणी नव्हतं."
आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला...
"बाळा तुला काय वाटते मला नाही झाला त्रास या अश्या फालतू लोकांचा."
"बाळा तुला काय वाटते मला नाही झाला त्रास या अश्या फालतू लोकांचा."
आईच्या डोळ्यात पाणी आले, तिने ते पुसलं आणि म्हणाली,
"बाळा अगं आपल्या मदतीला कुणीच येत नाही आयुष्य आपलं आहे आणि जे काही संकट येणार त्याला आपण स्वतः हाती तलवार घेवून लढले पाहिजे. तू स्वतः वर विश्र्वास ठेव तु सगळं नाही करू शकते ,तुला कुणाचीही गरज नाही बाळा. तू खूप कोमल आहे तरीही पाहिजे त्या ठिकाणी, स्वसंरक्षणासाठी तुला दुर्गाच काय तर भवानी होता आलच पाहिजे.
तुला ही लढाई स्वतःसाठी स्वतःने लढली पाहिजे. मी आहे तुझ्या सोबतीला पण किती दिवस, म्हणून तू स्वतः लढ."
"बाळा अगं आपल्या मदतीला कुणीच येत नाही आयुष्य आपलं आहे आणि जे काही संकट येणार त्याला आपण स्वतः हाती तलवार घेवून लढले पाहिजे. तू स्वतः वर विश्र्वास ठेव तु सगळं नाही करू शकते ,तुला कुणाचीही गरज नाही बाळा. तू खूप कोमल आहे तरीही पाहिजे त्या ठिकाणी, स्वसंरक्षणासाठी तुला दुर्गाच काय तर भवानी होता आलच पाहिजे.
तुला ही लढाई स्वतःसाठी स्वतःने लढली पाहिजे. मी आहे तुझ्या सोबतीला पण किती दिवस, म्हणून तू स्वतः लढ."
हे ऐकूण श्रावणीला धीर आला आणि तिने मनाशी चंग बांधला की, काहीही झाले तरीही आपण हार मानायची नाही आयुष्य आपले आहे, कुणाला घाबरून राहायचे नाही आणि नंतर दोघी झोपी गेल्या.
काय होईल उद्या? लढेल का श्रवणी स्वतःसाठी वाचूया पुढच्या भागात
©®कल्पना सावळे