दुसऱ्या दिवशी सकाळी आई ऑफिसच्या कामानिमित्त घरातून निघून गेली. तरीही आईच सारं लक्ष श्रावणीकडे होत. खरं तर त्यांना एकमेकांना दुसरं जवळच असं कुणीच नव्हत.
आज श्रावणी सकाळी ऑटोने कॉलेजला गेली. दुपारपर्यंत कॉलेज संपले तिने तिच्या मैत्रिणीला म्हंटले की आज ती सोबत येते का मात्र तिला काही काम असल्यामुळे तिने श्रावणी सोबत यायला नकार दिला आणि मग ती एकटीच ऑटोने घरी यायला निघाली.
ती ऑटो मध्ये बसली आणि निघाली. बरोबर चौकात आली आणि ऑटो मधून खाली उतरली. चौकात उतरल्यावर नेहमीची ती मुले तिच्यामागे आली तिघांनी घाण बोलायला सुरुवात केली.
आधी श्रावणी घाबरली मात्र तिला आईचे शब्द आठवले की ,तू ठरवले तर काहीही करू शकते. ती मुलं मागे मागे येत होती.
श्रावणीने हिम्मत केली आणि ती एकदम वळली,
"काय..? काय.. ??काय तुमचं रोज रोज माझ्या मागे येत आहात, अशी मुस्काटात देईल ना की पाणी मागायच्या लायक नाही राहणार."
त्यातला एक जण म्हणाला,
"जानेमन इसी बहाणे छू तो लोगी हमे."
आता मात्र श्रावणी चिडली आणि ती पुढे आली आणि त्याच्या कानशिलात लगावली. एवढा मोठा आवाज होता की सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेलं. सगळी लोक त्यांच्या दिशेने धाव घेत आहे असे दिसताच त्या मुलांनी पळ करायला सुरुवात केली पण तिथल्या लोकांनी त्यांना पकडलं.
पोलिस काही मिनिटातच तिथे आली आणि त्यांना पकडलं.
ती धावतच घरात आली. तिने बघितलं आपण तर लॉक उघडले नाही, मग दरवाजा कसा उघडला. तिने परत बाहेर वाकून बघितले तर आई अंगणात उभी होती. ती आईजवळ गेली आणि तिला गट्ट मिठी मारली.
"आई तू इथे कशी?"
"बाळा...अगं लेकराला संकटात टाकून कोणती आई बाहेर गावी जाईल मग ते कितीही अर्जट काम असो."
"पण तुझे बॉस?"
"हे काय बाळा मी इथेच आहे,पोलिसांना मीच फोन केला.
"पण आई..."
"बाळा श्रावणी अगं मी सरांना सगळं सांगितलं मग त्यांनी माझ्या ऐवजी दुसऱ्या कुणाला तरी पाठवलं आणि मला घेवून इथे आले."
"थँक्यू सो मच सर, खरचं तुमचे आभार कसे मानू हे कळत नाही मला."
"यात आभार कसले? बरं निघतो मी आता."
सर ऑफिसला निघून गेले. आणि दोघी घरात निघून आल्या.
"आई अगं खरचं आज मला अजिबात भीती वाटली नाही .त्या मुलांना बघितलं तेव्हा मला तुझे शब्द आठवले की तू दुर्वा तू भवानी, आपण आपलं रक्षण नाही करणार तर कोण करेल आणि हो मला एक लक्षात आले की, समोरची व्यक्ती कितीही बलवान असली तरीही आपण जर हिंमत दाखवली, आपण घाबरलो नाही तर आपण काहीही करू शकतो."
"बाळा यापुढे ही लक्षात ठेव आपण कुणाच्या वाटेला जायचं नाही पण कुणी आपल्या मध्ये आलना, आपल्याला त्रास दिला ना तर त्याला कधीच सोडायच नाही."
"अगदी बरोबर आई. आता मी कधीच कुणालाही घाबरणार नाही आणि वेळ आली तर तू सांगितल्याप्रमाणे नक्कीच दुर्गेच रूप घेईल आणि अश्या लोकांना चांगलाच धडा शिकवेल."
"चल आवर जरा आणि बॅग मधून कपडे काढ, मी फ्रेश होते जरा. बाहेर जावू मग दोघी आपण."
" जो हुकूम मेरे आका...आई अगं खरचं मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखी आई मिळाली. तसं तर माझ्या मैत्रिणी नेहमी म्हणतात पण आज मी खरच स्वतःला फार नशीबवान समजते."
"असं काही नाही रे बाळा."
"अगं हो आई, तुझ्या ठिकाणी दुसरी आई असती तर म्हटली असती की, तुझी चूक आहे, तू कशाला जाते त्या रस्त्याने, तूच त्यांना चान्स दिला असेल म्हणून तर ते येतात तुझ्या मागे... वैगरे वैगरे म्हटली असती.
पण तू माझ्यावर विश्वास दाखवला की माझी काही चूक नाही यामध्ये तेच खूप मोठं आहे गं माझ्यासाठी आणि म्हणून माझ्या पंखात बळ आले की मी स्वतः त्या मुलांना धडा शिकवला."
पण तू माझ्यावर विश्वास दाखवला की माझी काही चूक नाही यामध्ये तेच खूप मोठं आहे गं माझ्यासाठी आणि म्हणून माझ्या पंखात बळ आले की मी स्वतः त्या मुलांना धडा शिकवला."
आई फक्त हसली आणि श्रावणीला मिठी मारली.
आपण आपल्या मुलांवर भरवसा दाखवायला हवा,ते कधी अडचणीत नाही ना याची खात्री करायला हवी एक मित्र म्हणून.आपण त्यांना विश्वासात घेतले तर नक्की ते आपल्याशी मन मोकळं बोलतील.
श्रावणी सारखं आपण ही वागायला पाहिजे, आपल्या मदतीला कुणी धावून येणार नाही असा विचार करून स्वतःची मदत स्वतः केली पाहिजे कधी दुर्गा बनून तर कधी भवानी होऊन नाही का?....
समाप्त...
कथा कशी वाटली ते नक्की सांगा.
©® कल्पना सावळे
समाप्त...
कथा कशी वाटली ते नक्की सांगा.
©® कल्पना सावळे