तूच दुर्गा.. तूच काली..

गरज आहे आता स्त्री शक्तीची..
हातात नको आता लाली लिपस्टिक..
तलवार काढ म्यानातली.
रणचंडिका जागी.. होऊदे आता तुझ्यातली.

मोकाट सुटलेत नराधम,आता काढ त्यांना ठेचून..
जाई जुई नको शोधू...चमकती कट्यार काढ वेचून.

धारदार शस्त्राने चिरून टाक गळा..
प्रत्येक बापाने लावलेला असतो रे नराधमा..त्यांच्या लेकिंना लळा.

फाशी नको, आता हातपाय तोडून करा चौरंगा..
महाराजांच्या महाराष्ट्रातली लेक तू..
फाडुन काढ नराधमाच्या प्रत्येक अंगा.

कलयुग म्हणतात याला, माणुसकी आता मेली..
स्वतःच्या आयाबहिनी राखून ठेवत, दुसऱ्याची पोरगी नेली.

कधी कधी विचार येतो मनात.. खरचं नसतात का यांना आया बहिणी
इवल्याश्या पोरींचे लचके तोडताना..जीवाची होत नाही का यांच्या काहीली?

बास्स कर आता, कारण कोणी कृष्ण येणार नाही..
टाकलाच कोणी हात अब्रुवर, तर हात तोडण्यात येई.
सांग ठणकावून स्वतःला.. तूच दुर्गा तूच काली.
एक घाव दोन तुकडे..आता वार जाऊ देऊ नको खाली.

हिऱ्यांच्या अंगठ्या घालून फिरू नको..
कारण खरी गरज आता वाघ नख्यांची
भीड तू त्यांना.. भिड तू त्यांना..
आणि दाखवून दे औकात..साल्या भडव्यांची

©® श्रावणी लोखंडे..