Login

तुच माझ्या सुखाची परिभाषा

Love Poem
कवितेचे नाव -: तुच माझ्या सुखाची परिभाषा

विषय -: सुखाची परिभाषा

राज्यस्तरीय कविता स्पर्धा फेरी-2

कधी-कधी हिरवळही वसंताची मज वाळवंटच भासून जाते,
आणि कळतनकळत अश्रूंची गर्द राई डोळ्यांत साठवून देते
हळूच पुन्हा दूर मागे आठवांच्या झुल्यावर मला घेऊन जाते.
आणि मग त्या आठवांतूनही माझ्या सुखाची परिभाषा तुच रेखाटते.

सोबतीने आठवांच्या मग क्षितीज ते माझे पुन्हा नव्याने बहरते,
आठवणीत तुझिया ग सखे ओठांवर हास्य कळी हळूच उमलते
त्या हास्याच्या पल्याडही माझ्या सुखाची परिभाषा तुच रेखाटते.

येते ती थंडगार झुळूक वाऱ्याची उनाडक्या करत कानी कुजबुजत राहते,
कुजबुजतांना ही अलगद चाहूल मज तव अलवार स्पर्शाची देऊन जाते.
त्या स्पर्शाच्या शहाऱ्यातूनही माझ्या सुखाची परिभाषा तुच रेखाटते.

पुन्हा मनाची तार छेडून जाते आणि क्षणभर सोबतीत तुझिया रमावेसे वाटते,
प्रवाहात या भास-आभासांच्या बेभानपणे वाहवत मला घेऊन जाते,
त्या स्पंदनांच्या प्रवाहातही माझ्या सुखाची परिभाषा तुच रेखाटते.

न उरावे तू तुझे, न रहावे मी माझे, कोडे हे दूर अंतरीचे व्हावे आता संपते,
इंद्रधनूच्या सप्तरंगासम व्हावे आता रंगीत स्वप्न ही आपले मिळतेजुळते.
त्या इंद्रधनूच्या रंगातही माझ्या सुखाची परिभाषा तुच रेखाटते.

गणेश फापाळे.. ©®✍?
टिम -: अहमदनगर