Login

तूच माझी आई (भाग एक )विषय दाटून कंठ येतो

खूप वाईट प्रसंगातून गेली आहे ती
तूच माझी आई*


तूच माझी आई भाग एक

सायलीला जाग आली, बाबा आणि आजी बोलत होते, आजी बाबांना परत परत म्हणत होती "अरे सुनील एकदा पाहून भेटून तर घे काय हरकत आहे पाहायला? ?
मलाही आता झेपत नाही रे --सोनू किती लहान आहे' आणि सायली अशी अडणेड्या वयाची.
" अगं पण आई …सुनील म्हणाला”मी दोन मुलांचा बाप, तिला ही जबाबदारी —”

"नको इतका विचार करू, मी भेटले तिला खूप समंजस आहे. ती तुझ्यासारखी पोळलेली आहे.
"चार वर्षांपूर्वी एक्सीडेंट मध्ये तिचा नवरा गेला, आणि त्या धक्क्याने पोटातलं बाळ ही, खूप वाईट प्रसंगातून गेली आहे रे "समजून घेईल तुला. समदुःखी आहे.
बघतो, भेटतो उद्या, ठीक.?

सायलीला आजी नेमके काय दाखवणार आहे बाबांना,कळत नव्हते .ती म्हणजे कोण?

दोन-चार दिवसांनी ती-- घरी आली! ये सीमा, आजीने खूपच कौतुक केले तिचे. सायलीने दुरूनच पाहिलं.
" ही सायली, आजीने ओळख करून दिली, आणि हा सोनू"!
सोनू रडत होता , तिने उचलून घेतले तशी तो चुप झाला. पण सायलीला हे नाही आवडले.
कोण कुठली ती, आपल्या सोनूला का बर आजीने दिले तिच्याजवळ? आणि सोनू ही?
सायलीने सोनूला ‘ये आपण खेळू ‘म्हणत जवळजवळ तिच्याकडून ओढूनच घेतले. व रागारागाने आतल्या खोलीत निघून गेली.

आजीने तिला पूर्ण घर दाखवले, चहा पाजला बराच वेळ ती घरात होती. सायली ला आवडल नाही, ती उठून बाहेर गॅलरीत येऊन उभी राहिली..
ती थोड्या वेळाने गेली ,जाताना सायली कडे पाहून हसली पण सायली ने लक्ष नाही असे दाखवले त्यानंतरच सायली घरात आली..

रात्री बाबांनी तिला विचारले" आज ज्या आपल्या घरी आल्या होत्या त्या कशा होत्या?"
मला नाही आवडलं त्यांनी सोनूला घेतलेलं मग मी काढून घेतलं त्यांच्याजवळून"
बाबा काहीच बोलले नाही ,आजीने इशाऱ्याने बाबांना मी पाहते असे म्हटले.

दोन दिवसांनी रविवारी सकाळी सकाळी सायली झोपून उठली तर घरात गडबड दिसत होती .बाबा जरा छान कपडे घालून बसले होते .
"आपण कुठे जाणार आहोत का बाहेर?
' नाही बाबा जात आहे, आज सीमाला घेऊन येतिल आजीने सांगितले.
बाबा घरी परत आले तोपर्यंत आजीने स्वयंपाकिण काकूंना काहीतरी गोड म्हणून शिरा करा म्हणून सांगितले.

बाबा दोन तासाने आले त्यांच्याबरोबर ती पण होती .
आजीने दोघांना ओवाळले, तिने आजीला नमस्कार केला, आजीने तिला आशिर्वाद देत ये म्हणून घरात घेतले.
" काकू ही सीमा म्हणून तिची ओळख स्वयंपाक करणार्या काकूंना करून दिली.
" छान आहे तुझी नवी आई हो ---स्वयंपाकिण काकू सायली लाम्हणाल्या, तशी सायली हिरमुसली आणि धावत आपल्या खोलीत गेली व आईच्या फोटोला घट्ट धरून बसून राहिली.तिच्या डोळ्यांतून पाणी येत होते माझी तूच आई आहे मला कां सोडून गेली,? नको मला ही आई म्हणत रडता रडता झोपली.
.
थोड्यावेळाने आजी आत आली तोपर्यंत सायली फोटो छातीशी धरून झोपून गेली होती . गालांवर ओघळले ले अश्रू दिसत होते.
तिच्या हातातला फोटो हळूच बाजूला ठेवत आजीने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला तशी सायलीला जाग आली ,"आजी मला माझीच मम्मा हवी आहे ही नकोय "म्हणत सायली उठून बसली.
"अगं न जेवता झोपत का कोणी? चल बरं म्हणत आजीने प्रेमाने तिला जेवण भरवलं तशी मग सायली च मन थोड शांत झालं.
आता रोजचतिची नवी आई तिला डोळ्यासमोर दिसत होती, पण सायली ला तिची आई छान आठवत होती.

तिचे खूप खूप लाड करायची सायू-- सायू म्हणताना तिच्या चेहरा कौतुकाने भरलेला असायचा, काही वर्षांत सोनू झाला, आणि सर्व बिघडलं.
सोनू झाल्यापासून तिला आई कमीच मिळत असे,आईला सारखा खोकला यायचा वताप भरायचा, बरेचदा दवाखान्यात जावे लागे,
माझ्यापासून दूर रहात जा म्हणायची .
नेमक तिला काय होत होते कळत नव्हते , सतत थकलेली दिसायची. एक दिवस आईला दवाखान्यात नेलं आणि मग ती कधीच परत घरी आली नाही.
सायली ला आजी आपल्या जवळ झोपवायची पण आई गेल्यानंतर सोनू आजी जवळ व सायली एकटी झोपू लागली. सोनू ही रात्री रडायचा.कधीआजी कधी बाबा सोनू ला बाटलीने दूध पाजायचे.
सकाळी शाळेत जाताना आजी वेणी घालून देत असे कधी कधी सोनू खूप त्रास द्यायला लागला कि मग सायली केस कसेतरी बांधून घेत असे.
बाबा ही आजीला मदत करे पण कधीकधी तो बाहेर गावी गेल्यावर आजीला खूप त्रास होई.

सायली– तिचा आवाज ऐकून सायली भानावर आली…
क्रमशः