Login

तूच माझी आई भाग तीन विषय दाटून कंठ येतो

सायली ची पाऊले जड झाली



तूच माझी आई भाग तीन विषय दाटून कंठ येतो


आता मात्र सायली ला प्रश्न पडला ईशान बदल बाबांना कसं सांगू त्यांना तर पारस पसंत आहे . वर ईशान आपल्या जातीचा नाही हे कळलै तर बाबा मुळीच तयार होणार नाहीत.
तिचा उतरलेला चेहरा पाहून सीमा म्हणाली” अहो तिला विचार तर करु द्या, लगेच हो म्हणायची घाई करू नका.”


मग सीमा ने सुनील घरी नसताना एकट्या मधे विचारले?तेव्हा तिनेईशान व तिचे प्रेम असल्या ची कबुली दिली. व ईशान बरोबरच तिला लग्न करायचं आहे असं सांगितलं पण तो आपल्या जातीचा नाही.
तू किती वर्षांपासून ओळखते? त्याच्या घरी माहीत आहे? एकदा त्याला सहजच घरी घेऊन ये मला भेटायला.
सीमा ने ईशान ला पाहिलं ,त्याच्याशी बोलली, एकदम मोकळा स्वभाव वाटला .नाही म्हणण्या सारखें काहीच वाटलं नाही.

मग ती सुनील जवळ ईशान बद्दल बोलली.

सुनील नी प्रश्नांची झड च लावली’ कोण आहे ?आपल्या जातीचा आहे ना?’

‘नाही ,सायली ने चाचरत उत्तर दिले.’

मग प्रश्न च नाही . मी तुझ्या साठी पारस ला पसंत केले आहे आपल्या जातीचा आहे माझ्या पहाण्यात ला आहे,’ बाबांनी त्यांच्या निर्णय सांगितला.
हे ऐकून सायली च्या डोळ्यात पाणी आले व ती आपल्या खोलीत निघून गेली.

सायली चा उदास चेहरा सीमाच्याने पहात नव्हता .

सायलीला काहीच सुचेच ना
.
रात्री सीमा आई व बाबांचं बोलणं सायली च्या कानावर पडल ,मी पाहिले आहे त्याला छान आहे मुलगा. तिच्या मनाविरुद्ध तिच्या वर जबरदस्ती नका करु, कोणालाही त्यातून सूख लाभणार नाही तुम्ही एकदा पहा,भेटा.”
आपण एकदा त्यांच्या घरी जाऊन येऊ व कसे लोक आहेत हे पाहून मग ठरवू

आई बाबा पण ईशान च्या घरी जाऊन पाहून आले

पण लग्न करायच्या आधी स्वतः च्या पाया वर उभी रहा,
एक दोन वर्षे एकमेकांना समजून घ्या सीमा ने सुचवले.



मग पुढचं सगळं सोपं झालं .बाबाही मग तयार झाले सायली व ईशान चे लग्न ठरले

लग्न ठरले, त्यांच्या चालीरीती आणि देणंघेणं ठरवायला आईबाबा जाऊन आले,

रात्री झोपण्यापूर्वी सायली सीमा च्या खोलीत आली.

‘आई मला तुझ्याशी बोलायचे आहे ‘
अग मग बोल ना,”आई म्हणतेस ?
सायली सीमा च्या कुशीत शिरली,आई मी खूप वाईट वागले ग तुझ्याशी .लहान पणी सावत्र आई म्हणजे वाईट असेच मला वाटायचे मी तुला आई ची जागा द्यायला तयार नव्हते,

‘असु दे तू लहान होती,सीमा म्हणाली .
बोलू दे ग मला, मी जरी तुझा तिरस्कार करायचे तरी तू राग न मानता मला प्रेमाने आपलसं केलं. आई ची कर्तव्य करण्यात तू एक पाऊल पुढे च होती.आतामी लग्न होऊन सासरी जाताना मला तुझ्या प्रेमाची किंमत कळली , सोनू तर तुझाच मुलगा आहे असे वाटेल इतक तू त्यालाही आपलसं केलं.
सायली च बोलणं ऐकून सीमा चे ही डोळे भरून वहायला लागले..
तेवढ्यात सुनील आत आले व म्हणाले” अरे आत्ताच अश्रूंचा कोटा संपवून टाकणार काय?”पाठवणी च्या वेळेसाठी राहू द्या.
त्यांनी असं म्हणताच” काय हो बाबा” म्हणत सायली सुनील घ्या गळ्यात पडली.

लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. साड्या, दागिने, रूखवत कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नाही दिली सीमा ने . सायली चा एकेक दिवस कमी होत होता तशी तिच्या जिवाची हुरहूर वाढत होती.

लग्न घटिका जवळ जवळ येत होती, सायली गौरीहर पुजायला बसली . बाहेर वरात दाराशी येऊन उभी होती, मुलाकडचे बॅंड च्या गाण्यावर जोरात नाचत होते .मुली कडील पैसे ओवाळून ते वाजवणार्याना देत होते, मुलं नव्या गाण्यांची फरमाईश करत होते .

आता ईशान दारात उभा राहिला ,त्याला ओवाळून मंडपात आणले, सायली ला ही आणले नी मंगलाष्टक सुरू होत विवाह झाला, बाकी सर्व विधी ही पार पडले जेवण झाल्यावर पाठवणी ची तयारी सुरू झाली.

रेकॉर्ड वर” दाटून कंठ येतो ओठांत येई गाणे जा लाडके सुखाने जा आपल्या घरी” हे गीत वाजताच हाॅल मधले वातावरण विरह वेदनेने भरून गेले



मुलाकडचे वरात घेऊन निघाले .

.सायलीचे पावले जड झाली. बाबा सोनू सगळ्यांना तिने हसून निरोप दिला,
सीमा आई च्या समोर येताच सायली चे मन भरून आले.
"आई "म्हणून सायली धावत तिच्या कुशीत शिरली, खूप रडली.सीमा चा ही “कंठ दाटून आला”.
इतके दिवस आई साठी परकेपणाचे जो भाव मनात ठेवला होता तो या मिठीत विरघळून गेला.
+---------------------------------------