तूच माझी राधा
भाग १०
मागील भागात आपण पाहिले की नंदन भजनाचा आवाज ऐकून मंदिरात गेलाय. त्या मुलीला पाहण्याची इच्छा होते. पण त्याला ती काही बघायला मिळत नाही.
आता पुढे
ती देवदर्शन घेऊन मागे वळते तर समोर नंदनला पाहते . दोघ एकमेकांनाकडे डोळे मोठे करून बघते काही क्षण.
भानावर येऊन ती बोलते, " काय हो तुम्ही ,मला काल हरवल ना आता कश्यासाठी पाठलाग करताय ? "
" मी कशाला पाठलाग करू. मी माझं माझं देवदर्शन करतोय. तुम्ही इथे उभे आहात याकडे माझे लक्ष सुध्दा नव्हते. मी तुम्हाला हारवलयं म्हणून तुम्हीच माझ्या माझ्या मागे करताय ."
" ओ मी तुमचा पाठलाग नाही करत. आम्ही हार मान्य करतो. तुमच्या सारखी चिटिंग नाही करत कळलं का !"
येणारे जाणारे त्यांच्याकडे बघत होते पण यांचे लक्षच नव्हते . ते आपल्या तंद्रीतच भांडत होते. तेवढ्यात तिथले गुरूजी आले अन् तिच्याकडे बघून म्हणाले, " राधा, ऐ राधा. "
ती आवाज ऐकून शांत झाल्यावर गुरूंजीकडे बघू लागली." राधा बाळ, काय झालं? का भांडतीयस?"
" काही नाही गुरूजी. मी जाते घरी. " असं म्हणून राधा निघून गेली.
तो पण गुरूजींकडे बघून नुसता हासला आणि निघून गेला. त्याची चिडचिड होत होती पण काही क्षणातच त्याला तीचे गुबगुबीत गाल आठवले अन् गुरूजींनी 'राधा'
म्हटलेले पण आठवलं.
म्हटलेले पण आठवलं.
त्याने एक दोनदा मनातच 'राधा' म्हटले. हे म्हटल्यावर त्याला काय झालं काय माहित पण मनाला शांतता मिळाली आणि तो जेवढा चिडला होता तेवढाच पटकन शांत पण झाला.
त्याचं त्यालाच नवलं वाटलं हे काय झालं. पण तो याकडे दुर्लक्ष करून समुद्रावर जायला लागला.
तो समुद्रावर पोचला अन् नुकताच सुर्योदय होत होता. ते बघत थांबला होता.
राधा घरी आली ती चिडचिड करतच. तिची चिडचिड पाहून आईला वाटले काहीतरी कांड करूनच आलेली दिसतीय. म्हणून आईने एकदा तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले अन् कामं करू लागली.
आईने दुर्लक्ष केले म्हणून तिला अजून राग आला . ती राग बाहेर काढण्यासाठी आढळ आपट करत कामं करू लागली. वातावरण गरम असल्याने दादा तिची खोडी न काढता निघून गेला. कारण त्याला नंदन आणि बाकींच्यांना चहा नाष्टा द्यायचा होता.
हे सगळे चहा नाष्टा करत होते तोपर्यंत नंदन तिथे आला. त्याला बघून अमोद म्हणाला, " काय झाला का सुर्योदय पाहून?"
" हो. खूप छान वाटत होतं. तोंडातल्या तोंड पुटपुटला फक्तं देवळात बया भेटली नसती तर.... "
" ये तोंडातल्या तोंडात काय पुटपुटतोय. मोठ्यांनी बोलं की "
श्रीकांत म्हणाला, " नक्की सुर्योदय पाहायला गेला होता की कालच्या सारखं गोट्या खेळायला. " यावर सगळे हसायला लागले.
नंदन विषय बदलत म्हणाला, " आवरा , आपण आज आरे वारे बीच आणि किल्ला बघायला जाऊ.
रोहन कडे बघून म्हणाला, " आम्ही दुपारचं बाहेरच खाऊ. फक्त संध्याकाळी मोदकांचे जेवण दे."
" हो चालेल. या तुम्ही जाऊन. " रोहन निघून गेले अन् बाकीचे सगळे आवरायला गेले.
साधारण एक तासाभरात आवरून सगळे फिरायला बाहेर पडले.
पहिल्यांदा ते गणपतीपुळे वरून रत्नागिरी ला जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या आरे वारे बीच ला गेले.
****
प्रिया आणि आई अमोदच्या घरी आल्या. अमोदच्या आईला म्हणजे अनघाला त्यांना बघून खूप आनंद झाला. ती म्हणाली, " काय ग दोघीजणी किती दिवसांनी आलात ?"
प्रिया आणि आई अमोदच्या घरी आल्या. अमोदच्या आईला म्हणजे अनघाला त्यांना बघून खूप आनंद झाला. ती म्हणाली, " काय ग दोघीजणी किती दिवसांनी आलात ?"
नंदनची आई म्हणजे सरिता म्हणाली, " अग हो ना. दिवसभर घर कामातच जातो कळतच नाही म्हणून मी यावर एक उपाय शोधलाय."
" कोणता उपाय ? किटी पार्टी जाँईन करते की काय?"
" अग मी किटी पार्टी शक्यच नाही. मला नाही आवडत हे "
" मग ?"
प्रिया म्हणाली, " काकू , आईने दादाचं लग्न करायचं ठरवलय."
" खरचं . किती छान. मी पण लागलीय अमोदच्या मागे पण तो ऐकतच नाही. " यावर प्रिया डोळे मोठे करून बघू लागली. अमोदचं लग्न या विचारात ती इतकी गुंगली की तीला ह्या काय बोलताय ते कळलं सुध्दा नाही.
या दोघींच्या हासण्याच्या आवाजाने भानावर आली आणि म्हणाली, " काकू, आपल्या तिघींसाठी चहा करून आणते . तोपर्यंत तुम्ही मनोसक्त गप्पा मारा. "
" हो चालेले. रँकच्या वरच्या कप्प्यात चहा साखरेचे डबे आहेत आणि तिथेच नमकीन चा डबा आहे ते पण घेऊन ये. "
" हो काकू आणते. " असं म्हणून ती आत गेली अन् या दोघी गप्पा मारत बसल्या.
****
राधा नुकतीच देवळातून घरी आली. येता येता तोंडातल्या तोंडात बडबडतच येत होती.
दादा ते बघून म्हणाला, " आल्या महाराणी अजून एक उद्योग करून. "
असं म्हटल्यावर ती अजूनची चिडून म्हणाली, " ऐ दादा, गप्प बसं हा. मी काही उद्योग केला नाहीये. मी आपली भजन म्हणतं होते तर ते कालचचं माकड माझ्या वाटे गेलं. "
" माकड, कोणतं माकडं? अगं माकड आली की काय गावात. बागेवर लक्ष ठेवायला पाहिजे नाहीतर बागेचं नुकसान करायचं. "
याचं काय चाललयं अन् मी काय सांगतीय असे हावभाव करून ती त्याच्याकडे बघू लागली.
" मी काय केलयं?"
" अरे ,ती माकडं नाही"
" मग कोणती माकडं?"
" अरे तो नाही काल माझ्याशी वाद घालत होता तो मुलगा. "
" अच्छा. तो मुलगा. मग तो माकडा सारखा दिसतो का?"
" अरे नाही. तो तर खूप हँडसम दिसतो. " आपण काय बोललो हे लक्षात आल्यावर शांतच झाली.
" ओ ओ ते माकड हँडसम आहे तर ... मग तर त्या माकडाला बघायलाच पाहिजे. " हसत हसत म्हणाला, " हँडसम माकड" अजून जारोत हसू लागला.
तो हासतोय बघून ती त्याला मारायला लागली. मग काय यांची पुन्हा पकडापकडी चालू.
बराच वेळ त्यांची पकडापकडी चालू होती. आईने आतून एकदा आवाज दिला पण यांना काही फरक पडला नाही.
तेवढ्यात राधा म्हणून हाक ऐकू आली.
बघुया पुढच्या भागात हाक कोणी मारली?
तुम्हाला कोण वाटते कोणी हाक मारली असेल ?
मला कमेंटस् करून नक्की सांगा कशी वाटतीय कथा ते
क्रमशः
©® सौ. चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा