Login

तूच माझी राधा भाग १२

तिचे आणि त्याची कथा
तूच माझी राधा

भाग १२

" आई, मी आधीच आवरून ठेवलाय बरं.  तुला ना फक्त दादाची काळजी माझी काही नाहीच. "

" आता मी त्याची काय काळजी घेतली?  आणि पसारा बघून दादा तुझ्यावरच ओरडेल म्हणून सांगितले तर माझ्यावरच . "

" अग माते, तूच माझी काळजी घेतेस . आता मग जरा आतलं आवरकी गं पसारा. "

" व्वा आधी मला चिडायला लावायचं. मग माझी बाजू घ्यायची अन् मलाच कामाला जुंपायचं व्वा काय न्याय आहे. आता तर मी काहीच करणार नाही. आता आवर तुझं तू. " असं म्हणून आई स्वयंपाक करायला निघून गेली.

आता पुढे

आता आई आपलं काही आवरणार हे लक्षात घेऊन प्रियाने गुपचुप सगळा पसारा आवरला.

स्वयंपाक घरातूनच आई ने आवाज दिला, " पसारा आवरून झाला असेल तर या जेवायला. "

आईचा पारा अजून चिडलेला आहे बघून प्रियाने येऊन जेवणाची तयारी घेऊन  आईला ताट वाढून दिलं. आईने तिच्याकडे बघून फक्त ताटावर जाऊन बसली.

प्रियानेच बोलायला सुरुवात केली, " आई भाजी वाढू का ?" आई गप्पपणे खात होती. परत प्रिया च म्हणाली, " आई, पोळी .."

यावर आई काहीच बोलली नाही. असं बरेच वेळ प्रिया काँलेजबद्दल, अजून वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत होती पण आई काहीच बोलत नव्हती.

शेवटी प्रियाने आईचा आवडता विषय काढला. " आई, अगं उद्या दादा येईल मग जोशी गुरूजींनी आणलेले स्थळाचा बघण्याचा कार्यक्रम करणारेस का ?"

आई पटकन म्हणाली, " हो करणारे ना. दादाशी एकदा बोलून मग फोन करते गुरूजींना. . त्या मुलीच्या घरचांशी बोललेत का ते विचारते. मग त्यांच्याकडून आणि नंदन कडून होकार आला की पुढे जाऊ."   हे बोलून झाल्यावर आईच्याया लक्षात आले की आपण हिच्यावर चिडलो होतो ना अन् ती प्रियाकडे बघू लागली.

प्रिया हसत तिच्याकडे बघत बघत चालत आली अन् म्हणाली, " काय आहे ना ही माझी लाडकी (गाल ओढत) माय , माझ्यावर कधी रागवतच नाही. असं म्हणत प्रिया आईच्या गळ्यात पडली. आई पण राग विसरून तिला उराशी घेतले.

" बरं . फार झाली लाडीगोडी. जेवण झालं की सगळं आवरून घे."

" आई, अगं....." प्रिया पाय आपटत आवरू लागली.
तोपर्यंत आईने दादाला फोन लावून त्याच्याशी बोलत होती.

" हँलो, नंदन , उद्या निघताय ना? किती पर्यंत येणार?सगळे बरे आहेत ना ? काही उद्योग नाही ना केला तुम्ही एकत्र आल्यावर लक्षच नसतं तुमचं.."

" अगं आई, मला बोलू तर दे. "

" बोल ऐकतीय"

" हो आम्ही उद्या निघतोय सकाळी ७ पर्यंत. जवळ आलो की फोन करतो . आम्ही सगळे व्यवस्थित आहे. आता दिली बरं का सगळ्या प्रश्नांची उत्तरे. आता तू सांग तूम्ही कश्या आहात ?"

" आम्ही मस्त . सगळं व्यवस्थित आहे. " तेवढ्यात प्रिया ओरडत म्हणाली," दादा तूला आलं की मस्त सरप्राईज  ...." आईने लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला.

" आई, काय म्हणतीय प्रिया?"

" अरे काही नाही.  उद्या आल्यावर बोलेल ती.  जा आता
झोप निवांत. परत आलास की तूला आँफिसच्या कामात वेळ मिळतं नाही तूला विश्रांती घ्यायला. झोप. ठेवते फोन. सावकाश या. "  एवढं बोलून आईने पटकन फोन ठेवून दिला. परत त्याने चार प्रश्न विचारायला नको.

ठेवलेल्या फोनकडे नंदन बघतच राहिला. " या दोघींच काय चालू असतं कळतचं नाही. आता बघूया उद्या गेल्यावर काय आहे ते. " तो मनातच म्हणतं झोपायला निघून गेला.

****

आजी राधाला हाक मारतच ओसरीवर येऊन बसली, " राधा, जरा पाणी आण बरं मला. "

" हो आणते आजी." राधा पाणी देऊन तिच्या शेजारी बसते.

" काय ग राधा, रोहन आणि बाबा आले नाहीत अजून?"

" अग नऊ वाजेपर्यंत येतील दोघही. "

"अजून दहा मिनिटे लागतील. बरं असू दे मी इथेच बसते. त्या प्रवासींची जेवण झाली का?"

" हो झाली, दादा तेच घेऊन गेलाय. आणि आई मी आतला पसारा आवरतोय तर मी जाऊ का आईच्या मदतीला. "

" हो जा जा. " आजी मनातच म्हणाली," गुणाचं लेकरू आहे. ज्या घरी जाईल तिथे सुखाने नांदेल फक्त काही...."

रोहन आत येत आजीला म्हणाला, " काय आजीबाई, एवढी कसला विचार करताय?"

" अरे तू लग्न करून पणतु कधी देशील ह्याचा."

" चलं चलं उगाच काहीतरी. सकाळ पासून कोणी मिळाले नाही का जे माझ्या मागे लागलीय."

" नाही ना"

" मग तू राधाच्या मागे लाग. काहीना काही उद्योग करत राहते."

" का आता काय केले?" तेवढ्यात राधा दादाचा आवाज ऐकून बाहेर आली. दोघांच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली, " काय चाललय दोघांच?"

आजी म्हणाली, " राधा, अग मी काय म्हणते तूझं शेवटचं वर्ष ना मग तू काय करणार ?"

रोहन आजीच्या कानात हळूच म्हणाला, " लग्न."

" दादा, काय म्हणाला तू ?"

" अगं मी कुठे काय ? विचार आजीला मी काही म्हणालो तरी का ?"  आजीने नाही अशी मान हालवली. " तू सांग की आजीच्या प्रश्नाचं उत्तर. "

" मी ना आजी , आधी जाँब शोधणार. त्या जाँबमधून पैसे मिळतील ना त्यातून पुढचं शिक्षण करणार म्हणजे बाबांना पुढच्या शिक्षणासाठी त्रास नाही होणार. मग शिक्षण झाल्यावर बघू" हे तिचे बोलणं बाबा बाहेरून ऐकत होते. त्यामुळे ते मनोमन खूश झाले.

" गुणी माझं बाळं पण ना योग्य वेळेत सगळं घडू दे."

तेवढ्यात बाबा आले. सगळ्यांकडे बघून म्हणाले, " काय आजी नातवंडांच्या गप्पा चालेल्यात वाटतं. "

आजी म्हणाली, " हो, माझी गुणी बाळं आहेत." असं म्हणून आजीने दोघांना जवळ घेतले.

" व्वा आज नातवंडांवर खूप प्रेम येतेय ."

" अरे तसं नाही. माझं प्रेम कायम आहेच की. बरं ते जाऊदे जा दमला असशील ना ? आवरून घे जा. "

" हो दमलो तर आहे पण तुमचा हो गोंधळ बघून छान वाटलं. किती दिवसांनी सगळे एकत्र. "

तो पर्यंत आई बाबांचा आवाज ऐकून पाणी घेऊन आली आणि म्हणाली, " हो ना छान वाटतयं आज. "

आजी म्हणाली, " असू दे नजर नका लावू. जा आवरा. आणि तूम्ही दोघी पान घ्या. "

असं आजीने म्हटल्यावर सगळे आपापल्या वाटेला गेले.

बघूया पुढच्या भागात नंदनला काय सरप्राईज मिळतेय ते.