Login

तूच माझी राधा भाग १३

छोटीशी प्रेमकथा
तूच माझी राधा

भाग १३

मागील भागात

"गुणी माझं बाळं पण ना योग्य वेळेत सगळं घडू दे."

तेवढ्यात बाबा आले. सगळ्यांकडे बघून म्हणाले, " काय आजी नातवंडांच्या गप्पा चालेल्यात वाटतं. "

आजी म्हणाली, " हो, माझी गुणी बाळं आहेत." असं म्हणून आजीने दोघांना जवळ घेतले.

" व्वा आज नातवंडांवर खूप प्रेम येतेय ."

" अरे तसं नाही. माझं प्रेम कायम आहेच की. बरं ते जाऊदे जा दमला असशील ना ? आवरून घे जा. "

" हो दमलो तर आहे पण तुमचा हो गोंधळ बघून छान वाटलं. किती दिवसांनी सगळे एकत्र. "

तो पर्यंत आई बाबांचा आवाज ऐकून पाणी घेऊन आली आणि म्हणाली, " हो ना छान वाटतयं आज. "

आजी म्हणाली, " असू दे नजर नका लावू. जा आवरा. आणि तूम्ही दोघी पानं घ्या. "

आता पुढे,

आजी असं म्हटल्यावर सगळे आवरून ताटांवर येऊन बसले. आरामात जेवण चालली होतीच की आजी म्हणाली, " मी काय म्हणते, राधाला बघायला सुरुवात केली पाहिजे "

बाबा म्हणाले.," हो सांगितले आहे गुरूजींना. पण तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्नाची घाई करायची नाहीये हे पण सांगितले आहे . त्यादृष्टीने स्थळ बघा. त्यांचा दुपारी फोन आला होता. ते उद्या येतो म्हणालेत मग बघूया. "

राधा शांत पणे ऐकत होती. तेवढ्यात आई म्हणाली, " बरं झालं उद्या येताय ते.  नाहीतर गडबड झाली असती आणि आई पण  आहेत  इथे. म्हणजे सगळं नीट निरखून बघतील. "

रोहन म्हणाला, " बाबा , काही ठरवताना आधी तिचे शिक्षण महत्त्वाचे हे लक्षात असू दे. "

" अरे हो मी त्याशिवाय पुढे जाणारचं नाही.  बरं जेवा आता पटपट. "  सगळे शांतपणे जेवत होते.

जेवण झाल्यावर बाबा आणि रोहन पर्यटकांचा हिशोब करत होते तर राधा आणि आई आवरत होते. आजी अंगणात फेऱ्या मारत होती.

साधारण दहा वाजता सगळे झोपायला गेले. राधाला उद्या गुरूजी येणार या विचाराने खूप वेळ झोपचं येत नव्हती. सारखी चुळबूळ चालली होती. मनाची चलबिचल वाढतं चालली होती. शेजारी झोपलेल्या आजीला तिची चलबिचल कळतं होती. पण प्रवासाने दमल्यामुळे तिला तिच्याशी बोलायचं सुधारत नव्हतं. आजीने मनात विचार केला. उद्या आपण तिच्याशी बोलूया.

इकडे आईला पण झोप येत नव्हती. पण बाबा म्हणाले की , "ती काही लग्न करून उद्याच चालली नाहीये . नको विचार करू जास्त  झोप आता. "

*****

जेवण झाल्यावर सगळ्यांनी आपल्या बँगा भरायला घेतल्या. उद्या सकाळी निघताना धावपळ नको म्हणून. नंदन बँग भरून बाहेर अंगणात फेऱ्या मारत विचार करत होता, " प्रिया कसलं सरप्राईज देणार ? तिने काही उद्योग नसेल ना केला. ....

अचानक त्याला आठवलं की आई लग्नाबद्दल बोलत होती. तर तीने कोणती मुलगी बघितली असेल का ? तसं असेल तर आता ......."

तेवढ्यात मागून अमोद ने येऊन नंदनच्या पाठीवर चढला आणि म्हणाला, "  काय साहेब, संपली सुट्टी. आता उद्यापासून तेच तेच चालू. कंटाळवाण जीवन"

नंदन ने त्यावर फक्त ' ह्म्म ' केले. अमोद त्याच्याकडे बघत राहिला तर नंदन आपल्याच विचारात होता. अमोद ने त्याला परत धक्का दिला आणि डोळ्यांनी काय म्हणून विचारले.  त्याने काही नाही असं मानेनेच सांगितले

बराच वेळ ते बाहेर फिरत होते. शेवटी अमोद म्हणाला, " बोल ना मनातलं. मनात ठेवून प्रश्न सुटणारे का ? "

" अरे काही नाही. पण घरी गेल्यावर आई कोणतीतरी मुलगी नक्की दाखवणार. आपण नव्हतो ना तोपर्यंत तीने काहीतरी हालचाल केलीच असणार. "

" मग काय झालं... "

" अरे माझी अजून तयारी नाहीये. मन तयारच होतातं नाही. मला भिती वाटते ...."

" हे बघं मुलगी बघून बाकी सगळं ठरवेस्तोवर वेळ जाणारच. मन का तयार नाहीये कारण तू अजून वडिल तूम्हाला सोडून गेलेत तिथेच आडकलाय. अरे असं काही नसतं की बाबा मध्ये सोडून गेले म्हणजे तूझ्याही आयुष्यात असचं होईल आणि बाबा गेल्यानंतर आईने तुमच्या दोघांचा सांभाळ करत असताना तीचा आनंद बाजूला ठेवून ती सगळं करत होती . तीचा आनंद जर तुमच्या दोघांच्या सुखी संसार पाहाण्यात आहे तर तू द्याला पाहिजे. "

" अरे हे सगळं खरयं पण जर येणाऱ्या मुलीमुळे आईला अजून दु:ख झालं तर..... "

" असं नाही होत काही आणि थोडेफार वाद हे चालतातच आणि तू प्रेमाने दोघांना समजून घेतलस ना तर बघ हे आयुष्य खूप सुंदर आहे. "

" बघूया "

"बघूया नाही. तूला आयुष्यभर साथ देणारी कोणीतरी हवी ना जी सुख दु:खात साथ देईल. असा चांगला विचार करून मनाची तयारी करं. बघ खूप चांगली साथ लाभेल.."

" करतो विचार ....."

" यात मी कायम तुझ्या बरोबर आहे. चलं झोपूया ..."

" हो चलं. उद्या लवकर निघायचयं."

दुसऱ्या दिवशी सकाळी सातलाच सगळे बाहेर पडले. त्यांना लवकरात लवकर घरी पोचायचे होते.  जाताना परत धमाल मस्ती करत त्यांनी घरचा रस्ता धरला.

ही सगळी मंडळी गेल्यावर रोहन आणि त्याच्या आईने मिळून सगळ घरं आवरलं. आजी आणि राधा घरी स्वयंपाकाचे बघत होत्या. राधाला स्वयंपाक करून काँलेजला जायचे होते. तिची घाई बघून आजी म्हणाली, " लवकर उठून आवरायचे नाही मग घाई करत राहायचे. सासरी गेलीस की असचं करत राहणारेस का ?"

" सासरच नंतर बघू आता तु पोळ्या भाज पटापटा. मला काँलेजला जायला उशीर होतोय. "

" तुझं काही होऊ शकत नाही. बिचारी आईच तुझ्या मागेमागे करत राहते. थांब तीला येऊ दे आता असा दम देताना की सगळी काम तिने तुलाच करायला सांगितले पाहिजे. "

" आजी मी तुला सुखात आहे ते बघवत नाही का? आणि करतीय की कामं अजून किती करू. थांब आता. तू मला त्रास देते ना मी बाबांना सांगून तूला गावीच पाठवून देते. "

" मी तर जायला पाहिजे. तूझं लग्न करूनच जाणार मी कळलं का ?"

" माझं लग्न नंतर लाव आधी पोळी बघं जळायला लागली. परत तुझाच मुलगा तूला ओरडेल. "

" मला कोण नाही ओरडतं . जा आता तूझं आवरून काँलेजला मी बघते पुढचं "

"छान माझं बाळ आता तुला गावाला नाही पाठवणार हाँ.... "असं म्हणून ती आजीचे गाल ओढते. यावर आजी तीला लाटण दाखवते. ते लाटण बघून ती हसत पळत सुटते. इकडे पण आजी हासत उरलेल्या पोळ्या करते.

बघुया पुढच्या भागात नंदनच्या घरी काय घडतय ते ?