तूच माझी राधा
भाग १४
मागील भागात
" आजी मी तुला सुखात आहे ते बघवत नाही का? आणि करतीय की कामं अजून किती करू. थांब आता. तू मला त्रास देते ना मी बाबांना सांगून तूला गावीच पाठवून देते. "
" मी तर जायला पाहिजे. तूझं लग्न करूनच जाणार मी कळलं का ?"
" माझं लग्न नंतर लाव आधी पोळी बघं जळायला लागली. परत तुझाच मुलगा तूला ओरडेल. "
" मला कोण नाही ओरडतं . जा आता तूझं आवरून काँलेजला. मी बघते पुढचं "
"छान माझं बाळ आता तुला गावाला नाही पाठवणार हाँ.... "असं म्हणून ती आजीचे गाल ओढते. यावर आजी तीला लाटण दाखवते. ते लाटण बघून ती हसत पळत सुटते. इकडे पण आजी हासत उरलेल्या पोळ्या करते.
आता पुढे
राधा तिचं आवरून काँलेजला गेली. तेव्हढ्यात आई आणि रोहन पण आला होता. काय चाललं होत हो आई तुमचं ?
" अगं काही नाही उगाच आपली नातीची मज्जा. बरं ते जाऊदे . पोळ्या आणि आमटी करुन ठेवलीय. बाकीचे तू बघं. मी आता जरा पडते. "
" बरं बघते. राधा गेली का काँलेजला ?"
" हो गेली. रोहन आणि राधा च्या बाबांना वेळ आहे तोपर्यंत मी जरा माझं रोजचं देवाचं करते आहे आणि आराम करतीय . काही वाटलं तर आवाज दे. "
आई सगळं आवरुन जेवायला सगळ्यांची वाट बघत होती. काय करावं सूचत नव्हतं म्हणून ती आईंच्या खोलीत गेली अन् आवाज दिला ," आई, येऊ का ?"
" अगं ये विचारतीयस काय ? काय झालं? काही काम ?"
"अहो आई विशेष काही नाही. पण आता आपण राधाचं लग्न करायचं म्हणतोय पण ....."
" अग नको काळजी करू. आपली पोरं हुशार आहे. थोडी खोडकर आहे पण जबाबदारी पडली की होईल शांत. "
" हो आई बरोबर आहे तुमचं पणं ती आता जाणार ना त्यामुळे .... "
" अगं हो ग पण ही जगाची रीत. त्याला कोणी चुकलं नाही ना. आपण आताच तिच्यासमोर असे राहिलो तर तीचे मन विचलित होईल . मग ती त्रास करून घेणार. त्यापेक्षा तीला चार गोष्टी शिकवं पुढे जाऊन तिला त्रास नको व्हायला. "
" हो आई, तुम्ही म्हणताय तसचं करते. चला हे येतील तर ताटं घेते."
*******
नंदन यांची गँग दुपारी जेवायला एका हाँटेल मध्ये थांबली. तिथे एक मुलींचा ग्रुप आला होता. नंदन सोडून सगळे त्यांच्याकडे बघत होते.
मध्येच त्या मुलींनी गाणी म्हणायला सुरूवात केली. बराच वेळ त्यांचा हा कार्यक्रम चालू होता. इकडे हे सगळे जेवत यांच्या गाण्याच आस्वाद घेत होते. यांची जेवण झाली आणि निघत असताना एका मुलीनी गाणं म्हणायला सुरुवात केली अन् तो आवाज ऐकून नंदनला मंदिरातील मुलीचा आवाज आठवला. अन् त्याला वाटले ती इथेच आली की काय?
तो तिकडे जाणार होताच पण त्याला तिचा चेहरा आठवला....
नाईलाजास्तव तो अमोद याच्या जवळ गेला. अमोद ने त्याचा चेहरा बघून विचारले ," काय झाले ? " त्याने मान हलवूनच काही नाही असं सांगितले.
त्या गाण्याचे धून आठवून त्यांचा प्रवास सुरू झाला थोड्याच वेळात यांच्या भेंड्या सुरू झाल्या त्यांना कळलेच नाही.
******
दुपारी आजी , बाबा, आई, अन् रोहन एकत्र बसून जेवत होते. . जेवणाताना परत विषय लग्न यावर येऊन थांबला. शेवटी रोहन वैतागून म्हणाला, " मी सांगितले ना तीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न होईल. का सारखं तेच तेच ."
आजी म्हणाली, " तू गप्प बसं. वेळेत होतयं लग्न अजून तू नाक आडवा येऊ नाहीतर मी तूझचं लग्न लावून देईन. कळलं का ?" यावर रोहन गप्प बसला..
*****
मजल दरमजल करत संध्याकाळी ७ वाजता घरी पोचले. ते जसे घराजवळ आले तसे त्यांनी एकत्र येऊन दरवर्षी पाच दिवस तरी एकत्र बाहेर जायच असा निश्चय करून सगळे एकमेकांना अच्छा करुन घरी निघाले.
नंदन घरी आला. दारातच असताना प्रिया ओरडत आली , " दादा, दादाsssss s " असं म्हणत त्याच्या गळ्यात पडली.
" अगं हो. मला घरात तर येऊ दे. आई कुठेय?"
" आई ऐ आई, दादा आलाय ग "
" आले आले. हे घे पाणी नंदन. कशी झाली ट्रिप?"
" मस्त. आता खूप छान वाटतय. असं वाटतय हे दिवस कधीच संपू नये पण....."
" सगळे व्यवस्थित आहेत ना . कोणाला काही त्रास ?"
" नाही. आई कोणालाच काही त्रास नाही. सगळे मस्त."
" बरं झालं. जा आवरून ये. मग जेवायला बसू. "
" दादा, मला काय आणलय?"
" तूला काही नाही आणलं. मी फक्त आईला आणलयं. तू काय इथे सारखीच खरेदी करत असतेस की "
" दादा, जा आता तूझ्याशी बोलणारच नाही. " असं म्हणून ती खोलीत जाऊ लागली.
" नको बोलूस . आई, उद्या कोमल येणार आहे ना तर ते प्रियासाठीचे आणलेले गिफ्ट तीला दे. "
पळत येऊन प्रिया म्हणाली, " नाही. ते माझं आहे. कोणालाही द्यायचे नाही." असं म्हणून दादाच्या हातातील गिफ्ट ओढून घेतले.
हे बघून दादा आणि आई जोरात हासायला. प्रिया दादाच्या गळ्यात जाऊन पडली.
" का रे दादा सारखा त्रास देत असतोस. थांब आता वहिनी येऊ दे मग बघ तूला कसा त्रास देतो ते. "
" हा. बघू बघू. मी लग्नाला तयार झालो तर वहिनी येईल ना. "
आई ने धोक्याची घंटी ओळखून दोघांना ओरडली व नंदन ला आवरायला पाठवले. असं म्हटल्यावर नंदन निघून गेला तर प्रिया तिथेच गिफ्ट बघत बसली. नंदन गेल्यावर आईने प्रियाला म्हणाली, " तूला गप्प नव्हता बसता येत का उगीच लग्नाचा विषय काढला."
" अगं माझ्या लक्षातच नाही आलं. साँरी. "
" असू दे जा आवरायला. "
****
संध्याकाळी सगळे घरात एकत्र बसून गप्पा मारत होते आणि तेवढ्यात राधा म्हणत गुरूजी घरात आले. आजी म्हणाली, " या या गुरूजी, तुमचीच वाट बघत होतो. "
" आजी, नमस्कार. बरं झालं तुम्हीही इथे आहात. मी आपल्या राधासाठी छान स्थळ आणलय."
" अहो. गुरूजी आधी बसा तर खरं. चहा नाष्टा घ्या . मग निवांत बोलूया. " आजी राधाकडे बघून म्हणाली, " जा बाळा चहा नाष्टा आणं. " हो अशी मान हालवत ती घरात निघून गेली.
तेवढ्यात रोहन आला. बाबा रोहनला बघून म्हणाले, " बरं झालं तू आलास. राधाच्या स्थळाबद्दल चर्चा करायची. तू ये आवरून. राधा पण नाष्ट्याचे आणतीय मग सगळे एकत्र बसून बोलूया. " रोहन बरं म्हणून तो आवरायला गेला.
गुरूजी बाबांना म्हणाले, " काय मग कशी चाललीय गणपतीची सेवा ? "
" छान. गणपतीच्या इच्छेनुसार चालू आहे. तो करवून घेतोय सेवा तोपर्यंत करायची. "
आजी मध्येच म्हणाली, " अहो गुरूजी बुवा, तुम्ही कोणती स्थळ आणलीयेत ती तर सांगा."
" अहो आधी कडक चहा घेतो. मी जरा दमलोय. मग बोलूया चालेल ना?"
" अहो चालेल की. हे बघा राधा चहा घेऊन आलीच. रोहन पण आला. राधाचा हातचा फक्कड चहा घेऊ मग बोलूया. "
सगळ्यांनी होकार दर्शवून चहा आणि नाष्ट्याचा आस्वाद घेत होते.
बघूया पुढच्या भागात कोणती स्थळ आली आहेत ते ?
क्रमशः
©®सौ. चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा