Login

तूच माझी राधा भागं १६

Ek Premkatha
तूच माझी राधा

भाग १६

मागील भागात

रोहनने आपल्या खोलीत जाताना तिला पाहिले तर ती येरझाऱ्या घालताना दिसली. म्हणून त्याने राधा आवाज दिला . पण राधा आपल्याच तंद्रीत होती. शेवटी रोहनने येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला तर तीने घाबरून मागे सरकली.

रोहनने तीला जवळ घेऊन म्हणाला, " राधा, बाळा मी आहे एवढी काय घाबरतेयस ?"

" दादा ,तू..."

" हो मीच. बस इथे. शांत हो आधी .धर पाणी पी. "

ती पाणी पिऊन जरा शांत झाल्यावर रोहनने परत विचारले, " काय झालं ? का घाबरलीस ?"

आता पुढे

राधा म्हणाली, " काही नाही. "

" खरं सांग. काय झालाय? "

" अरे दादा .... ते..... "

" अगं अशी अडखळत का  बोलतीय ? काय आहे ते स्पष्ट बोलं. "

" दादा अरे मगाशी झालेल्या चर्चेचा विचार करत होते. "

" त्यात विचार  काय करायचाय. आधी शिक्षण . मग ते सगळं. मी आहे ते सांभाळायला तू नको काळजी करू. आता परीक्षेकडे लक्ष दे. आपलं लक्ष काय आहे वकिल होण्याचं त्याचकडे लक्ष दे. बाकी माझ्यावर सोड. "

राधाने भावूक होऊन दादाला मीठी मारली त्याने पण आनंदाने त्याला आपल्या मिठीत घेऊन मी तुझ्या बाजूने असण्याची ग्वाही दिली.

शेवटी दादाच म्हणाला, " चला झोपा. "

राधाने फक्त हम्म केलं. दादा डोक्यावर थोपटून निघून गेला.  राधा पण झोपायला गेली.

इकडे आई - बाबा खोलीत आल्यावर आई बाबांना म्हणाली, " अहो, सगळ्या स्थळांची नीट चौकशी करा. "

" अगं हो नक्की. मी सगळ्या बाजूने चौकशी करतो. यात पंधरा दिवस गेले तरी चालतील. " असं म्हणतं बाबा आई शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन म्हणाले, " मी तुझी माफी मागतो. तुझी शिकायची इच्छा पूर्ण नाही करू शकलो. मला खरचं माफ करं. "

" अहो, माफी नका मागू. त्यावेळे प्रमाणे दोघांनाही शक्य नाही झालं पण .... "

" अग पण. माफी तर मागायलाच पाहिजे. तुझ्या स्वप्नांचा .... "

" अहो आता माझं स्वप्न आहे की आपल्या राधाला तीच्या पायावर नक्की उभं करा. त्यासाठी काय करावे लागेल त्याला माझी पूर्ण साथ असेल. "

तेवढ्यात रोहन पण आत आला. तो झोपायला निघाला होता पण बाबांशी एकदा बोलावे असा विचार करून त्यांच्या खोलीत आला होता पण त्या दोघांचे बोलणे ऐकून तिथेच थांबला. आई हे बोलली अन् तो आत आला . आणि म्हणाला, " हो माझी पण राधाला तिच्या पायावर उभं करण्यासाठी पूर्ण साथ आहे."

असं म्हणून रोहनने आई बाबांच्या हातावर हात ठेवला. वातावरण खूप भाऊक झालय बघून रोहन म्हणाला, " चला मी जातो झोपायला. तुम्ही दोघंपण जास्त विचार करू नका. "

" हो जा. तू पण विचार नको करू. उद्याची तयारी करावी लागेल. उद्या पर्यटक येणार आहेत ना. " असं बाबा म्हणाले.

रोहन मानेनेच होकार दर्शवत निघून गेला तर आई बाबांनी पण झोपायची तयारी करू लागले.

****

नंदन आवारायला खोलीत आला. तो विचार करू लागला," आई ने खरचं स्थळ बघितली असतील का ? आई का एवढी मागे लागलीय लग्नाला? तिला एकदा शांत बसून विचारले पाहिजे. असही मी उद्या आँफिसला जाणारच नाहीये तर प्रिया गेली की बोलतो. "

असं मनात ठरवून तो आवरू लागला. तेवढ्यात आई ने आवाज दिला म्हणून तो पटापट आवरायला लागला.

आई जेवणाची तयारी करत होती तेवढ्यात प्रिया आली आणि म्हणाली, " आई काय करायचे ते सांग ? तू बसं इथे मी करते. "

" अगं आतून पाणी आणि भात, भाजी राहिलय आणायची तेवढी आणं. "

" बरं आणते. " असं म्हणून प्रिया आणायला गेली . आई नंदनची वाट बघत तिथेच बसली.

नंदन आवाज देत आला, " आई, खूप भूक लागलीय. वाढ लवकर. "

" अरे आधी येऊन तर बसं  मग वाढते. का खोलीत आणून देऊ. "

" अगं खोलीत नको.  हा काय मी बसलो . आता वाढ. "

प्रिया आतून येतच म्हणाली, " अरे किती ती घाई? वाढतीय ना ?"

" ऐ तू गप्प. मी चार दिवस आईच्या हातचं खाललं नाही. त्यामुळे कधी खातोय असं झालाय. "

" हा तस काही तिकडे तू काय उपाशीच होतास नाही का ?"

" ऐ गप्प. आईच्या हातची चव तूला काय कळणार "

" हो बरोबरचं आहे मला कशी कळणार . मी तर घरं सोडून कुठे जातच नाही ना.. " असं म्हणून प्रिया एकदम गप्प झाली.

आई म्हणाली, " बास आता. वाढलयं . शांतपणे जेवा आता. "

जेवता जेवता नंदन विचार करू लागला ," खरच तर आहे प्रियाला आपण तिला कुठेच पाठवत नाही.  त्या गावात गेलो तरी मुली किती आनंदाने फिरत होत्या. आणि ती तर  चार लोकांना पुरेल अशी मुलगी. ज्याच्याशी लग्न होईल त्याच अवघडच आहे. प्रिया पण अशी झाली पाहिजे. "

" काय रे दादा कसला विचार करतोय.  मी सहजच बोलून गेले तू नको एवढा विचार करू . मला माहितीय तुझ्या मनात माझ्या बद्दल काय आहे ते. नको मनाला लावून घेऊ. "

" अगं विशेष काही नाही. तू बोल कसं चालूय काँलेज ?नवीन काय ?"

" अरे दादा, माझा प्रोजेक्ट सगळ्यांना आवडला. बहुतेक त्याला पहिला नंबर मिळेल. दादा खरचं तुझ्या मदतीने शक्य झालं. "

" पण प्रिया, दरवेळी मी मदत करणं योग्य नाही ना तू हे एकटी करायला पाहिजे. असं मला वाटते. "

" हो मी नक्की प्रयत्न करेन. दादा ते... ते... "

" अग अशी अडखळत का बोलतीयस ? काय झालं ? "

" दादा ते आमच्या काँलेजची ट्रिप जाणारे तर मी जाऊ का ?"घाबरत घाबरत च म्हणाली,

" कुठे जाणारे ?"

" अलिबाग ला "

" कधी "

" पुढच्या महिन्यात २५ तारखेला "

" किती जण आहेत "

" माहित नाही. आजच सांगितले आहे. पुढच्या आठवड्या पर्यंत पैसे भरायचेत. "

" बरं ठिक आहे. बघू मी ठरवतो.."

आई मध्येच म्हणाली, " काही गरज नाहीये ट्रिपला जायची. "

प्रियाने एकदा आई कडे बघून दादाकडे बघितले. नंदनला प्रियाकडे बघून वाईट वाटले. पण त्याने डोळ्यांनीच तिला मी आहे ना असं सांगितले. म्हणून प्रिया शांत बसली.

सगळे शांत पणे जेवू लागले. नंदन प्रियाच्या ट्रिप बद्दल  विचार करू लागला तर प्रिया आई नाही का म्हणाली याचा विचार करू लागली. तर आई नंदनशी लग्नाबद्दल कसे बोलायचे याचा विचार करत होती.

आपापल्या विचारात जेवण कधी झाली त्यांना कळलेच नाही.

जेवून सगळे सोफ्यावर येऊन बसले. मग प्रियानेच बोलायला सुरुवात केली ," दादा ट्रिप कशी झाली रे ?"

" एकदम मस्त. खूप छान वाटलं. मन फ्रेश झाल. आता उत्साहाने कामाला सुरुवात केरेन. "

" अरे व्वा .  खरचं असं जाऊन आल्यामुळे मन उत्साहित होतं. आपण एकदा आईला पण घेऊन जाऊया. आई बरेच वर्षे  झाली गेली नाहीये  कुठे. हो खरचं जाऊन येऊ.."

तेवढ्यात आई आली आणि त्यांच ऐकून म्हणाली, " कुठे जायचयंच ?"

प्रिया म्हणाली, "  अगं तुला घेऊन फिरायला. "

" मी कुठेही फिरायला येणार नाही. आधी माझ्या नंदन च लग्न मग बघू. "

" बऱ.बाई. दादाचं लग्न आधी मग फिरणे. किती छान ना मग वहिनीला घेऊन जाता येईल. "

नंदन मनातच म्हणाला, " आली गाडी मूळ पदावर. निघा इथून. नाहीतर काही खरं नाही.. "

उघडपणे म्हणाला, " चला मी जातो झोपायला. " असं म्हणतच तो खोलीत निघून पण गेला.

बघूया पुढे नंदन तयार होतोय का ते?