Login

तूच माझी राधा भाग १७

प्रेमकथा
तूच माझी राधा

भाग १७

मागील भागात

जेवून सगळे सोफ्यावर येऊन बसले. मग प्रियानेच बोलायला सुरुवात केली ," दादा ट्रिप कशी झाली रे ?"

" एकदम मस्त. खूप छान वाटलं. मन फ्रेश झाल. आता उत्साहाने कामाला सुरुवात केरेन. "

" अरे व्वा .  खरचं असं जाऊन आल्यामुळे मन उत्साहित होतं. आपण एकदा आईला पण घेऊन जाऊया. आई बरेच वर्षे गेली नाही कुठे. हो खरचं जाऊन येऊ.."

तेवढ्यात आई आली आणि त्यांच ऐकून म्हणाली, " कुठे जायचयंच ?"

प्रिया म्हणाली, "  अगं तुला घेऊन फिरायला. "

" मी कुठेही फिरायला येणार नाही. आधी माझ्या नंदन च लग्न मग बघू. "

" बऱ.बाई. दादाचं लग्न आधी मग फिरणे. किती छान ना मग वहिनीला घेऊन जाता येईल. "

नंदन मनातच म्हणाला, " आली गाडी मूळ पदावर. निघा इथून. नाहीतर काही खरं नाही.. "

उघडपणे म्हणाला, " चला मी जातो झोपायला. " असं म्हणतच तो खोलीत निघून पण गेला.

आता पुढे

" अगं आई , तूझं अवघड आहे. हा तुझा लाडका लवकर लग्नाला तयार होईल की नाही शंकाच आहे. "

" गप गं. उगाच काही बोलू नको. मी करणार त्याला तयार. "

" चालेल कर तयार. चल मी जाते झोपायला. "

दुसऱ्या दिवशी आई नेहमीप्रमाणे सकाळी उठून देवाची पूजा करत होती. नंदनपण रोजच्या वेळेला उठून व्यायाम करायला गेला.

व्यायाम करताना आई शी कसं बोलायचेच हेच त्याच्या डोक्यात होते. व्यायामाकडे लक्ष कमी विचारातच लक्ष जास्ती. त्याला काय करावे कळतच नव्हतं.

एकदा मनात विचार आला की अमोदशी बोलावे पण .... अमोद आईच्याच बाजूने आहे लक्षात आलं म्हणून परत शांत बसला.

थोड्यावेळात तो आवरून बाहेर आला. तर आईने तिच्यासाठी केलाला आल्याचा चहा घेत बसली होती. नंदन तिच्याशेजारी येऊन बसला.

नंदन आईकडे बघून म्हणाला, " आई, आज मला पण तुझ्यासारखा चहा घ्यायचय. " यावर आई आश्चर्याने बघू लागली.

" अशी बघू नकोस. मी काय वेगळं काही नाही मागितलय. चहाच तर मागितलाय. "

प्रिया पण आवरून आली होती तर ती आईला म्हणाली " मला पण चहा. चला आज आपण चहा पार्टी करूया. "

नंदनला म्हणाला, " चालेल . आज माझ्या हातचे पोहे पण पार्टीत. "

" व्वा व्वा, आजची पार्टी जोरात . आई तू बसं मी आणि दादा आजची पार्टी णी तयारी करतो. चल रे दादा. "

आई म्हणाली, " एक मिनिटं. आज तुम्हाला तुमची कामं नाहीयेत का ?"

प्रिया म्हणाली, " अग काँलेज आहे की पण एक दिवस उशीरा गेलं तर चालतं. असा दिवस परत कधी येणार पण दादा तुझं आँफिस...... "

" अगं आज माझी सुट्टी आहे. मी निवांत राहणार आहे. "

" अरे व्वा मग मस्तच. चलं रे दादा. आज होऊन जाऊदे पार्टी. " असं म्हणून प्रिया आणि नंदन स्वयंपाक घरात गेले तर आई विचार करू लागली. " आज अचानक नंदन....."

काही वेळातच प्रिया तिच्या हातचा चहा तर नंदन त्यांच्या हातचे पोहे घेऊन डायनिंग टेबल जवळ आला. नंदनने आईला आणि प्रिया ला पोहे वाढले आणि स्वतःला वाढून घेऊन सगळे एकत्र खायला बसले.

प्रिया म्हणाली, " दादा, किती दिवसांनी हा दिवस उजाडला. व्वा आजचा दिवस भारी जाणार. हो ना आई. "

" हो आजचा दिवस खूप छान झालं गोड बातमी मिळणार. माझ्या लेकाने एवढं छान पोहे केलेत . "

" हो तुला लेकाचेच कौतुक. माझ्या चहाचे नाही ना. "

" अगं तुझा चहा पण छान झालाय. आता नवीन पदार्थ पण शिकून घ्या. "

" हो दादा कडून शिकणार आहे. "

" माझं कौतुक झालं असेल तर आवर आणि काँलेजला पळ. "

" हो आवरते. तू काय करणार दिवसभर. "

" अग काही नाही. थोडं काम करेन मग नंतर आराम "

प्रियाने पटपट नाष्टा करायला सुरुवात केली. ते बघून आई म्हणाली," अगं जरा हळू. सावकाश खा. "

प्रियाचे खाऊन झाल्यावर ती म्हणाली, " घ्या सुट्टीची मज्जा. मी चालले. बाय. भेटू संध्याकाळी. दादा रात्रीचा स्पेशल प्लँन करून ठेव. "

" हो मँडम करतो. बाय "

प्रिया काँलेजला गेली. आई आणि नंदन ने राहिलेला नाष्टा करायला लागला.

आई म्हणाली, " काय रे.सगळं बरय ना ? "

" हो छान आहे असं का विचारते?"

" आज तू चक्क सुट्टी घेऊन घरी. "

" अग जरा आराम म्हणून घेतली. तू आवर आपण देवळात जाऊन येऊ. "

कधी नव्हे ते नंदन देवाळात नेतोय म्हटल्यावर आईने काही आढेवेढे नघेता लगेच तयार झाली. तिने विचार केला की , " उगाच अजून प्रश्न विचारले तर तो देवळात न्यायचा नाही. त्यापेक्षा शांत बसते. त्याच्या मनातील वादळ शांत झाल्यावर तो आपल्याशी नक्की बोलेल. "

दोघीही आवरून देवळात गेले. सकाळचीच वेळ असल्याकारणाने देवळात जरा माणसांची गर्दी होतीच पण एकदरं वातावरण खूप उत्साही अन् सकारात्मकता भरलेले होते.

आईने येता येताच बाप्पाच्या आवडीचे लाल फूल आणि दुर्वा घेऊन आली.  फूल व्हाऊन मनोभावे नमस्कार केला. नंदन फार वेळा देवळात येत नसल्याने आई जसं जसं करत होती तसंतसं त्याने करून नमस्कार केला.

बाप्पाला म्हणाला ," बाप्पा तूच योग्य ते मार्गदर्शन करं. आणि आईला सुखात ठेव. "

दोघही बाप्पाला नमस्कार करून नंतर प्रदक्षिणा घालू लागले. आई नेहमीप्रमाणे अकरा प्रदक्षिणा घालणार होती तर नौदन म्हणाला, " आई, तू बसं. मी आज प्रदक्षिणा घालतो. तूझे पाय खूप दुखतील. "

" अरे पण....."

" अगं मी बाप्पाला सांगेन, " आईचे पाय दुखतायत तर मी घालतो प्रदक्षिणा. तू आईची इच्छा पूर्ण कर. "

"अरे ,यात मला काय फळ मिळणार. तू उपासना केलीस तर त्याचं फळ तूला मिळणार. त्यामुळे मी पण प्रदक्षिणा घालणार. तूला माझी काळजी वाटत असेल तर तू पण चलं बरोबर. "

आई आता ऐकणार नाही म्हणून नंदन पण प्रदक्षिणा घालू लागला.

आईने पण आपल्या मनाप्रमाणे नंदनला तयार केलेच.

परत एकदा दर्शन घेऊन नंदन आणि आई बाजूला असलेल्या बागेतील बाकावर  येऊन बसले. दोघांनाही मनातून खूप छान वाटत होते. आजूबाजूचे निरीक्षण करत होते.

तेव्हढ्यात तिथे एक चहा वाला आला . नंदनने दोघांसाठी चहा घेतला. वातावरणाचा अनूभव घेत  दोघही चहाचा आस्वाद घेत होते. आई नंदन चे निरीक्षण करत होती.

आई नंदनशी बोलायला जाणार तेव्हढ्यात आईची मैत्रिण स्मिता आली आणि म्हणाली, "काय ग आज किती दिवसांनी ? "

" अग हो ना . आत येत जाईन रोज. मग आपण गप्पा मारू. "

स्मिता म्हणाली, " अगं हा नंदन ना खूप वर्षांनी भेटला. कसा आहेस बाळा ?"

" काकू मी छान . मस्त. तूम्ही काय म्हणताय ?"

" मी छान आहे. मला जरा गडबड आहे. मी निघते नंतर बोलू. ये घरी एकदा " असं म्हणून ती दोघांना बाय करून गेली.

नंदन आईला म्हणाला, " आई, चलं आपण पण निघूया. "

" अरे बसं जरावेळ. आपण निवांत गप्पा मारूया. तू किती दिवसांनी निवांत भेटला आहेस. हल्ली तूला वेळच नसतोस. "

" हो ना. बरं बसूया थोडावेळ. "

बघूया पुढच्या भागात नंदन आणि आईच्या काय गप्पा रंगतायत ते.