Login

तूच माझी राधा भाग 1८

प्रेमकथा
तूच माझी राधा

भाग १८

आई नंदनशी बोलायला जाणार तेव्हढ्यात आईची मैत्रिण स्मिता आली आणि म्हणाली, "काय ग आज किती दिवसांनी ? "

" अग हो ना . आत येत जाईन रोज. मग आपण गप्पा मारू. "

स्मिता म्हणाली, " अगं हा नंदन ना खूप वर्षांनी भेटला. कसा आहेस बाळा ?"

" काकू मी छान . मस्त. तूम्ही काय म्हणताय ?"

" मी छान आहे. मला जरा गडबड आहे. मी निघते नंतर बोलू. ये घरी एकदा " असं म्हणून ती दोघांना बाय करून गेली.

नंदन आईला म्हणाला, " आई, चलं आपण पण निघूया. "

" अरे बसं जरावेळ. आपण निवांत गप्पा मारूया. तू किती दिवसांनी निवांत भेटला आहेस. हल्ली तूला वेळच नसतोस. "

" हो ना. बरं बसूया थोडावेळ. "

आता पुढे

थोडावेळ दोघही शांत बसून होते. शांतता तोडत आई म्हणाली, " काय रे काय चाललय मनात ? आज आपणहून सुट्टी घेतली. "

" काही नाही. अग निवांत म्हणून ...."

" हे बघ नंदन , मी तुझी आई आहे . आणि कसय ना बाळा, आईला आपल्या मुलांच्या मनातलं सगळं कळत . मला सांग तूला लग्न या विषयावर बोलायचे आहे ना  "

तो आश्चर्याने डोळे मोठे करून आईकडे बघतच राहिला.

परत आईच म्हणाली, " अरे बघू नकोस असा. आता बोल .... "

" आई, तूला माझ्या लग्नाची घाई का आहे. ? अजून काही वर्ष  थांबलो तर . म्हणजे बघ ना मी अजून थोडा सेटल होईल आणि प्रियाचे पण मार्गी लागेल. तिचे शिक्षण, लग्न सगळचं . "

" हे बघ बाळा, एकतर काही गोष्टी वेळेवर झालेल्या चांगल्या असतात. आणि दुसरं म्हणजे तूला माहितीय तूझे बाबा गेल्यावर मी हिंमतीने उभी राहिले. हे सगळं करताना आपल्याला एका साथीची गरज असते. पण ती साथ आतापासूनच मिळाली तर तूला सगळ्या गोष्टी पार पाडण्यासाठी एक भक्कम पाठिंबा मिळतो. "

" अग पण आई . अजून तिची जबाबदारी वाढणार. तिच्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की वाद ,भांडण. त्यात तूमच्या दोघींकडे दुर्लक्ष. त्यापेक्षा नकोच. "

" कसय ना बाळा, जबाबदारी अंगावर पडली की माणूस धडपडतो, नवीन मार्ग शोधतो, आपण आनंदी कसे राहू याचा विचाराने योग्य मार्गावर राहतो. नाहीतर चुकून एखादी गोष्ट चुकूची झाली तर आयुष्य वाया जायची शक्यता असते. तसेच तूझी एखादी चूक झाली तर साथीदार आपल्याला ती दाखवून योग्य मार्गावर आणतो. "

" अग पण आई .... "

" एकमेकांच्या साथीने सुख दु:खात साथ देऊन आयुष्य आनंदी बनवता येतं. अन् माणूस आयुष्यात येणाऱ्या क्षणांना जगायला लागतो."

" तुझं म्हणणं बरोबर आहे. मला पटतय. पण ही जबाबदारी जमेल मला?"

" अरे का नाही जमणार. मी आहेच की कायम. मी काय चित्रपटात जशी ललिता पवार सारख्या सासूसारखी नाही वागणार. मग तर झालं."

" अग आई तू कधी अशी वागूच शकत नाही पण कधी ना कधी तो अवतार घेतलास तर माझं काही खरं नाही. "

" समजा मी जर असा अवतार घेतलाच तरी कायम तुझ्या बायकोचीच साथ द्यायची. "

" बघा हां तस केलं ना मी तर परत माझ्या नावाने ओरडायची नाही. "

" मी काही ओरडणार नाही . पण मी माझ्याकडून अशी वेळ येऊच देणार नाही. त्यामुळे तू निश्चिंत रहा. "

" हे तुझ्या बाबतीत झालं पण येणाऱ्या मुलीचे काय करणार. ती तशी नाही वागली तर .... "

" हे बघ तुझं बरोबर आहे पण आपण जसं वागू तशीच प्रतिक्रिया समोरून येत असते. आपण चांगलचं वागायचं पुढचं देवाच्या हातात. "

" ठिक आहे करतो विचार . "

" विचार वगैरे काही नाही . घरी गेले की मुलींचे फोटो दाखवतो. तू बघ मग सांग. "

" लगेच जरा थांब की . "

" थांब वगेरे काही नाही. चांगल्या गोष्टींना उगीच उशीर कसाला करायचा.  चलं आता घरी. "

" थांब. आपण आज बाहेरच जेऊनच जाऊ. मी प्रियाला फोन करून बोलवून घेतो. " असं म्हणून नंदन प्रियाला फोन करू लागला तर आई तिथेच बसून देवाला नमस्कार करून म्हणाली, " माझ्या लेकरांची काळजी घे . त्यांचे सगळं चांगलं होऊ दे. "

दोघही हाँटेल कडे निघाले. गाडी चालवत असताना पण नंदन विचारच करत होता. विचारात हाँटेल कधी आलं त्याला कळलचं नाही.

प्रियाच्या काँलेज जवळचच हाँटेल ठरविल्यामुळे प्रिया अधीच येऊन थांबली होती. नंदनने फोन करून अमोदला पण बोलवले होतो. तो पण आला होता.

सगळ्यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या.  या गप्पांमध्ये अमोद अन् प्रियाच्या खाणाखुणा चालू होत्या. त्यांना वाटले यांचे लक्ष नाहीये पण अमोदच्या अन् प्रियाच्या खाणाखुणा आईच्या लक्षात आल्या होत्या पण आई काही बोलली नाही. 

साधारण चार वाजता सगळे घरी आले. अमोद पण त्यांच्याबरोबर आला होता. नंदन आणि प्रिया त्यांच आवरायला म्हणून आत गेले. आता हाँलमध्ये अमोद आणि आईच बसली होती.

आई म्हणाली, " काय रे अमोद, कसं चालूय आँफिस? "

"काकू , छान चालूय. काकू तुम्हाला माहितीय आम्हाला ना एका नवीन कंपनीचे अकाऊंटचे काम मिळतेय. त्याची उद्या मिटिंग आहे. "

" अरे व्वा. किती छान. या कामाबरोबरच तुला अजून एक माझे काम करायचे आहे. "

" मी कोणते काम करु तुमचे ?"

" सांगते थांब. "  असं म्हणून आई नंदनच्या खोलीकडे बघायला लागली. तो अजून आलेला दिसला नाही तशी आईने बोलायला सुरुवात केली .

" हे बघ मी आता नंदनशी लग्न या विषयावर बोलली. तो तूझ्याशी यावर नक्की बोलेल तर तू त्याच्या मनाची तयारी करं. म्हणजे आपल्याला मुलगी बघायला जाता येईल. मी एक मुलगी बघून ठेवली आहे. "

अमोद जोरात ओरडत म्हणाला, " अरे व्वा. "

" अरे हळू बोल. तो ऐकेल ना. आणि माझं हे.काम केलं ना तर तुझपण मार्गी लावेन. "

" माझं काय मार्गी लावणार. मला वेळ आहे अजून."

" त्यावेळीच मी मार्गी लावेन असं म्हटलं ." त्यावर तो विचार करत राहिला नक्की कश्याबद्दल बोलताय ते.

" अरे नको एवढा विचार करू. मी वेळ आली की सांगेन. तू आता फक्त माझं काम करं. "

तेव्हढ्यात नंदन आवरून आला.  अमोद कडे बघत म्हणाला, " काय चर्चा चालू आहे. "

" अरे काकू ट्रिप बद्दल विचारात होते. काय काय केलं ते सांगत होता. "

" अच्छा. आई मस्त एक कप चहा . "

" अरे व्वा. मला पण काकू . "

" हो सगळ्यांसाठी करते. प्रियाला पण लागले. "

" आई मला काय लागेल?" असं म्हणत  प्रिया हाँल मध्ये आली.

" अग कडक चहा "

" हो मला पाहिजे. "

" बसा सगळे गप्पा मारत मी आणते चहा करून असं म्हणत आई आत गेली.

अमोद म्हणाला, " नंदन उद्या पासून आँफिस सुरू होतोय . लक्षात आहे ना. "

" हो आहे की. तू असं का विचारतोयस?"

" अरे जो मनुष्य सदानकदा आँफिसबद्दलच बोलतो तो आज चक्क दिवसभर घरी. "

" असं काही नाही. आज आईसाठी घरी होतो. "

" नक्की ना ? "

बघुया पुढच्या भागात नंदन काय उत्तर देतोय ते