तूच माझी राधा
भाग १९
मागील भागात
अमोद म्हणाला, " नंदन उद्या पासून आँफिस सुरू होतोय . लक्षात आहे ना. "
" हो आहे की. तू असं का विचारतोयस?"
" अरे जो मनुष्य सदानकदा आँफिसबद्दलच बोलतो तो आज चक्क दिवसभर घरी. "
" आज आईसाठी घरी होतो. "
" नक्की ना ? "
आता पुढे
" हो रे बाबा, उगाच तू काही शंका काढू नकोस. "
तेव्हढ्यात प्रिया म्हणाली, " दादा , आईने सरप्राईज दिलं का ?"
अमोद म्हणाला, " कसलं सरप्राईज?"
" ऐ तूझं काय आहे मध्ये मध्ये ? "
" तू गप्प पढं. मी दादाशी बोलतीय. "
आई चहा घेऊन आली . यांची भांडण बघूनच म्हणाली, " अरे कश्यावरून भांडताय ?"
प्रिया म्हणाली, " ते काय नेहमीचंच. ते जाऊदे . आई, तू दादाला तूझं सरप्राईज नाही दिलं अजून "
" नाही, आता देणारच आहे. तूमच्यासमोर. "
आई जाऊन मुलींचे फोटो आणि माहिती घेऊन आली. ते नंदनच्या हातात देत म्हणाली, " हे बघ ह्यात काही मुलींचे फोटो आणि माहिती आहे. तूला कोणती योग्य वाटतीय ती सांग . म्हणजे मी तिच्या घरच्यांशी बोलते. "
नंदन ने बघायच्याच आधी अमोद ने ते काकूंच्या हातून हिसकावून घेतले. लगेच प्रियापण त्याच्या बाजूला बसून बघू लागली.
प्रिया म्हणाली, " अमोद ही बघ छान वाटतीय ना. "
" बघू बघू. "
" हो खूपच छान आहे. या दोघांची जोडी पण छान वाटेल ना " हे शेवटचं वाक्य तो एकदा नंदन कडे बघून आईला फोटो देत म्हणाला.
" अरे हो हीच मला आवडली होती. अरे नंदन बघ तरी. घे "
नंदन तिची माहिती घेऊन वाचायला लागतो. ते वाचता वाचता म्हणाला, " आई अगं ही तर शिकतीय अजून. मग ..."
नंदन तिची माहिती घेऊन वाचायला लागतो. ते वाचता वाचता म्हणाला, " आई अगं ही तर शिकतीय अजून. मग ..."
" अरे शिकू दे की, आपण तीला अजून शिकवू. असही तिने पुढे शिकायचं आहे. अस नमूद केलय. आणि प्रिया शिकतीयच की ? "
" हो तुझं बरोबरच आहे पण ती लहान असणार. म्हणजे प्रिया सारखा अल्लड पणा करणार. "
मध्येच प्रिया म्हणाली, " मी कुठे अल्लडपणा करते. उडाच काहीही. " या विषयावरून अमोद, नंदन अन् प्रियाची चांगलीच जुंफली.
इकडे आई विचार करू लागली, "नंदनच्या मनात काय चालू आहे. हा नक्की कोणत्या बाजूने विचार करतोय काय माहित. परत एकदा बोलावं लागेल त्याच्याशी. "
चिडचिड करत पाय आपटत. जोरात ओरडून प्रिया आपल्या खोलीत जाऊ लागली. त्या आवाजाने आई भानावर आली आणि विचारले काय झाले?
" विशेष काही नाही. चला मी निघतो " अस म्हणतं अमोद निघून गेला.
आई पण खोलीत आराम करायला गेली तर नंदन आँफिसच काम करायला गेला.
******
इकडे दुसऱ्या दिवशी रोहनने आपल्या मित्रांच्या ओळखीने नंदनची चौकशी करायला सुरूवात केली तर बाबांनी पण चौकशी करायचा प्रयत्न केला. दिवसभर दोघे प्रयत्न करणार होते
आजी दुपारी राधाच्या खोलीत गेली. राधा अभ्यास करत होती.
आजी म्हणाली, " येऊ का ग राधा ?"
" अग ये ग तू कधीपासून मला विचारू लागली. "
" अगं तस नाही पण अभ्यास करतीयस तर व्यत्यय नको.."
" असू दे ये. काय म्हणतीयस ?"
" अग काही नाही बाळा. मला सांग पुढं तूला शिकून काय बनणार ग तू?"
" अग मला ना वकिल व्हायचय. "
" म्हणजे तू भांडण लावणार कि सोडवणार ?" असं म्हणून आजी असायला लागली.
" आजी ss"
" अग थोडीशी गम्मत. बरं ते जाऊदे असही तू काय भांडायला सारखी तयारच असते त्यामुळे तूला वकिल होणं सोप्पं तर आहे. "
" आजी. तू गावालाच जा. मी आज पाठवते तूला. "
" ते बघ लागली भांडायला. "
" मी भांडत नाहीये. मी तर तुझी .... "
" गम्मत करतीय. पण बाळा असं उगाच सगळ्यांच्याशी वाद घालणं बाईच्या जातीला योग्य नाही. बाईने कसं सगळ्यांना सामावून, समजून घेतलं पाहिजे. "
" मग मी कायम दुसऱ्यांनाच समजून घ्यायचं का ? मग मला कोण समजून घेणार?"
" तुला समजून घेणारा, कायम तुझ्या पाठिशी उभा राहणारा असा जोडीदार पाहिजे ना. त्यासाठी लग्न केल तर.. "
" त्यासाठी जोडीदाराची काय गरज , दादा आहे, बाबा आहेत की ?"
" तुझं अगदी बरोबर पण दादाला बायको आली की तो तिच्या बाजूने असेल. ते पण बरोबर आहेच. त्यावेळी ही तो तुझ्याबरोबर राहणार ह्यात शंका नाही पण कायम तुझा म्हणणारा असा व्यक्ती पाहिजे की नाही. "
" तुझं बरोबर आहे . अग आजी मी लग्नाला नाही म्हणतच नाहीये पण आता नको एवढसं. "
" हे बघ बाळा तुझं शिक्षण होईपर्यंत दोन वर्ष जातील. या काळात तुझं लग्न झाला तर तूला त्याला आणि त्याला तूला समजून घ्यायला खूप वेळ मिळेल. या दोन वर्षात तूमचं नात घट्ट होईल. मग तुमचा सुखाने संसार चालू होईल. मन जुळली तरच संसार चांगला होता. "
" आजी तुझं बरोबर आहे मनच जुळली पाहिजे. तू तर आताच म्हणत होतीस ना की मी भांडखोर आहे मग आमच्यात वाद झाला तर अभ्यास राहिला बाजूला आणि माझं स्वप्नही. "
" तू आता भांडखोर आहे . पण आपल्या हक्काच्या माणसाबरोबर राहिला लागलीस ना की तुझा हा स्वभाव बदलेल. हेच तर असताना मन जुळण्याचं कारण. स्वभाव कधी बदलतो माणसांचा कळत सुध्दा नाही.
हे बघ बाळा , सगळ्या गोष्टी वेळात झालेल्या चांगल्या असतात. "
" सगळ्या गोष्टी म्हणजे मूलबाळच ना "
" अग फक्त तेच नाही. आपल्या वयाबरोबर शारीरिक बदल पण होत असतात. त्या त्यावेळी शारीरिक गरजा पूर्ण होणं गरजेचं असत . नाहीतर आता सारखं ह्याला काय कँन्सर च झाला. तीच काय वजन च कमी होत नाही अशी कारण चालू होतात. "
" अग आजी पण मानसिक तयार होत नाही. तू कशी ग आजोबांबरोबर लग्न करायला तयार झाली. त्यांना आधी पाहिल पण नव्हतंस ?"
" अग पाहिलं नव्हतं पण घरच्यांनी बघून दिलाय म्हणजे चांगलाच असणार अशी धारणा. "
" पण ओळखत नसताना कसा संसार केला?"
" कसय ना बाळा, ओळखत नाही म्हणून लग्नच करायचं नाही असा होत नाही. ओळख नसताना उलट चांगला संसार होतो माहितीय का ?"
" तो कसा बुवा ?" राधा डोळे मोठे करत म्हणाली.
" डोळे काय मोठे करते. ऐक मी काय सांगते ते. "
आजीच्या पायापाशी येऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून बसली. आजी ने पण मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवत होती.
बाहेर उभ राहून रोहन हे सगळं बघत होता . त्याला पण आजीच्या मांडीवर डोकं ठेवायची इच्छा झाली म्हणून तो आत येऊन आजीच्या दुसऱ्या पायापाशी बसून त्याने पण मांडीवर डोके ठेवले.
आजीने नातवाच्या डोक्यावर पण हात फिरवू लागली. आजी म्हणाली, " काय रे तू कधी आला ?"
" आजी नातीच्या गप्पा चालू होत्या ना तेव्हा . आजघ नात एकत्र असल्यावर नातवाची कशाला आठवण होतीय . आम्ही पामर गरीब बिचारे.... "
राधा लगेच म्हणाली, " आजी हा बघ कसा गरीब, बिचारा आहे . तू ना ह्याचच लग्न लाव माझ्या पेक्षा. म्हणजे गरीबाचं दुःख दूर होईल. "
" ऐ तू गप्प. आजी तू काय सांगत होती ते सांग. "
बघूया पुढच्या भागात आजी काय सांगतीय ते ?
क्रमशः
©®सौ. चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा