Login

तूच माझी राधा भाग १

सामान्य घरातील ती आणि तो. यांची संसाराची कथा
तूच माझी राधा

भाग १

' दादा, नको ना , ऐ दादा थांब बरं का ?' असं म्हणून ती नारळाच्या बागेत पळत होती आणि तिच्या मागे दादा पाण्याचा पाईप घेऊन पळत होता.

किती वेळ त्यांची पकडा पकडी चालली होती. अन् हे तिचे आई बाबा बघत होते. शेवटी बाबाच म्हणाले ," रोहन ,बास आता चला घरात."

रोहन म्हणाला, " आज मी हिला भिजवल्या शिवाय थांबणारच नाही. "
बाबा म्हणाले,." अरे पण..."

आई म्हणाली, "असू द्या. ती पण काही कमी नाही. तीने आधी खोडी काढली असणार त्यामुळेच तो असा मागे लागलाय तिच्या आणि तसपण आता काही दिवसांनी अशी यांची गडबड बघायला नाहीच मिळणार ."

बाबा म्हणाले, " हो खरयं आता ती २४ वर्षाची झाली . तिच्यासाठी स्थळ बघायला पाहिजेत ."
" हो ना  , म्हणूनच मी म्हणतीय. करू दे थोडावेळ त्यांना अशी मस्ती. चला आपण चहा घेऊया . " असं म्हणून आई बाबा घरात जातात. या दोघा बहिण भावांची मस्ती चालूच असते.

*****

" आई ग आई मला नाष्टा देना. खूप भूक लागलीय. आई sss " तो म्हणाला

"आले रे बाबा किती ओरडतो. स्वतः उशीरा पर्यंत लोळत राहायचं आणि मला घाई करत राहायचं ." आई म्हणाली

" अगं आई काम करत होता ना रात्री म्हणून उशीर झाला झोपायला.  बरं ते जाऊ दे आम्ही सगळे मित्र दोन दिवसांनी कोकणात फिरायला चाललो आहोत. मी येईपर्यंत तुला आँफिसला जायचय रोज. " तो गालात हसत म्हणाला .

" मी नाही जाणार. तुला माहितीय मला नाही आवडत. कंटाळवाणा कार्यक्रम आहे. बरं मला तिथे काम पण करू देत नाही. मग तर अजूनच कंटाळा येतो. " आई म्हणाली.

यावर तो म्हणाला,"  माझे माते, तुला फक्त लक्ष ठेवायलाच जा असं सांगतोय. मी अमोद ला सांगेन तुला काम द्यायला. "

" म्हणजे अमोद नाही येणार. तो का नाही येणार ? त्याला काय झालाय. ? थांब मी अमोद ला फोन करून विचारते. "
"मला काय विचाराताय काकू. मी तुमच्या समोरच आलोय आता विचारा" अमोद म्हणाला.

लगेच तो म्हणाला, " तू इथे काय करतोय. आपली मिटिंग होती ना आँफिस मध्ये ? "  यावर अमोद ऐकून पण न ऐकल्यासारखं करून  काकूंना म्हणाला, " काकू आज नाष्ट्याला काय केलयं आणि तुम्हाला मला काय विचारायचं होतं ?"

" अरे अमोद ये .बसं आधी गरम गरम इडली सांबार खा. मग आपण बोलू."  असं आई म्हटल्याबरोबर अमोद लगेच खूर्चीवर येऊन बसला. त्याने एकदाही त्याचेकडे पहिलं नाही.

आईने वाढून दिल्यावर म्हणाली, " सांग रे आता तू ट्रिपला का नाही जाणारेस ? "

"आहो काकू, हा तुमचा मुलगा आहे ना तो मला येऊ नको म्हणाला " हे अमोदच्या तोंडून ऐकल्यावर त्याच्या तोंडातील इडलीच बाहेर आली आणि मी कधी म्हणालो असे भाव घेऊन तो अमोदकडे बघू लागला.

आई आपल्याला काही बोलेल त्याआधीच त्याने ," आई, मी काही बोललो नाहीये. हाच नाही म्हणाला. आम्ही सगळे त्याला म्हणतं होतो चलं म्हणून. तुझ्यासमोर भोळेपणाचा भाव आणतोय. "

" का रे , माझ्या मुलाचं नाव खराब करतो व्वा sss असं म्हणून आईने अमोदला फटका मारला.  जाऊ दे चला खाऊन घ्या . आँफिसला जायला उशीर होतोय ना. आवरा. "

" काकू तुमची लाडूबाई नाही दिसत. गेली का काँलेजला."

"ये लाडूबाई कोणाला म्हणतो . माझं नाव प्रिया आहे कळलं का ? आला मोठा शहाणा . तू कोण रे मला लाडूबाई म्हणणारा. " असं बोलतचं प्रिया डायनिंग टेबला जवळ येऊन उभी राहिली.

" लाडूबाई नाही तर काय काकूबाई म्हणायचं का ? " अमोद म्हणाला.

आता यांची भांडण लवकर थांबायची नाही असा विचार करून तो म्हणाला, " अमोद, चल उठ आता, आपल्याला आँफिसला उशीर होतोय."

" अरे मला खाऊ तर दे. "

" बाकिचे आँफिसच्या कँन्टीन मध्ये खा. उठं " अमोद प्रियाकडे बघून तोंड वाकड करून निघून गेला. तिने पण त्याच्याकडे बघून तोंड वाकडं केले.

प्रिया म्हणाली, " आई ,मला दे ग . मला पण जायचय काँलेजला. " असं म्हणायला अन् प्रियाच्या समोर  इडली सांबाराची डिश यायला एकच वेळ.

इकडे दोघं गाडीत बसल्या बसल्या तो म्हणाला, " काय रे मी कधी नाही म्हणालो. तुलाच यायाचे नव्हते. ."

अमोद म्हणाला, " अरे तसं नाही, तुझी थोडीशी गम्मत.  बरं ते जाऊदे. आज सकाळी ९ वाजता कुलकर्णी आपल्याला भेटायला येणार आहेत. त्यांच रिर्टन फाईल चं काम आपल्याला द्यायचय. "

त्यांच्या आँफिसच्या गप्पा मारत ते कधी आँफिसला पोचले कळलं च नाही.

***
  रोहन आणि ती ची पळापळी थांबायचं नाव काही घेईना म्हणून आईने त्यांना जोरात आवाज दिला, " बास आता दोघेही पहिले आत या. " आईचा आवाज ऐकून दोघंही पाचव्या मिनिटाला घरात.  येताना पण एकमेकांना खुन्नस देणं चालू होतं.

बाबा म्हणाले, " अरे रोहन दोन दिवसांनी पुण्यावरून येणाऱ्यांच बुकिंग आहे ना आपल्या फार्महाऊस ला ? ते  नक्की येणार आहेत ना?  नाहीतर एकदा फोन करून बघं. "

" हो करतो बाबा. आज मी आणि ही आज दुपारी जाऊन फार्महाऊसवर बघून येतो  काही व्यवस्था करावी लागेल का ते ? चालेल ना ग तुला , का कुठे जायचयं ?"  रोहन म्हणाला

"नाही मला नाही कुठे जायचं. आपण दुपारी जाऊ. " ती म्हणाली.

तुम्हाला वाटतं असेल ना  ती आहे  तरी कोण?  तर आपल्या कथेची नायिका ' राधा ' ती काँलेजच्या शेवटच्या वर्षाला. आई रमा , बाबा राजेंद्र अन् भाऊ रोहन. असं त्यांच छोटसं कुटुंब.

कोकणातील गणपतीपुळे या गावी यांचा छोटासा वाडा. समुद्राजवळ त्यांनी छोटसं फार्महाऊस बांधलेले. तिथे प्रवासी लोकांच्या राहण्याची सर्व व्यवस्था करतं . हे करत असताना तिचे बाबा गणपती मंदिरात पण पुजारी म्हणून काम करतं.

राधा अंगाने नाजूक पण चुणचुणीत. नाकीडोळी तिला साजेशी. सावळी पण तिचा आवाजात गोडवा.  रोज सकाळी भक्तीगीत गाण्याचा तिचा छंद. स्वभाव??
होईल पुढे हळूहळू ओळखं

भाऊ शांत, अबोल पण या दोघांच एकमेकांशिवाय अजिबात चालत नाही.

बघुया पुढच्या भागात तो कोण आहे ते ?