Login

तूच माझी राधा भाग २०

ती ची आणि त्याची कथा
तूच माझी राधा

भाग २०

मागील भागात

आजीने नातवाच्या डोक्यावर पण हात फिरवू लागली. आजी म्हणाली, " काय रे तू कधी आला ?"

" आजी नातीच्या गप्पा चालू होत्या ना तेव्हा . आजी नात एकत्र असल्यावर नातवाची कशाला आठवण होतीय . आम्ही पामर गरीब बिचारे.... "

राधा लगेच म्हणाली, " आजी हा बघ कसा गरीब, बिचारा आहे . तू ना ह्याचच लग्न लाव माझ्या पेक्षा. म्हणजे गरीबाचं दुःख दूर होईल. "

" ऐ तू गप्प. आजी तू काय सांगत होती ते सांग. "

आता पुढे

" अरे बाळा, लग्नाबद्दल सांगत होते. तू पण ऐक. म्हणजे तूझ्यावेळी वेगळं नको सांगायला.

कसय ना जेव्हा आपण अनोळखी मुलाशी लग्न करत असतो. त्यावेळी आपण पण त्यासाठी अनोळखी असतो ना .

एक उदाहरण देते ते ऐक . तेल आणि पाणी हे  एकमेकांच्यात कधी एकत्र होऊ शकत नाही. त्यांचे दोघांचे गुणधर्म वेगळे वेगळे त्यामुळे ते एकत्र येत नाही. पण जेंव्हा आपण उपमा करायला जातो तेंव्हा पाण्याला फोडणी देउन त्यात रवा टाकून उपमा तयार करतो .

म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या गोष्टी  नवीन गोष्टी बनवताना आपापल्या  गुणधर्मांची तडजोड करून नवीन पदार्थ बनवतात. तसचं  आपल्या नात्याचे असते .

आता तुम्ही दोघेही एकमेकांना अनोळखी . म्हणजे तुमचे स्वभाव वेगवेगळे . एक रागीट तर एक शांत असू शकतो. मी अंदाज लावतोय. आपण प्रत्यक्ष भेटल्यावर कळेल.
की ....

बरं  ते जाऊदे हां  तर मी काय सांगत होते कि , तुमचे स्वभाव वेगळे वेगळे . पण जेंव्हा एकमेकांना समजून घेऊन राहतात तेंव्हा आपोआप आपल्या स्वभावात बद्दल होतो आणि आपण मनाने एकरूप होऊन जातो. एकदा का मानाने एकरूप झालो ना कि संसार आनंदाने पार पडतो. त्यात येणारे चढउतार एकत्र पार पडता येतात.. असं  असते पोरी ."
  
" आजी तुझे म्हणणे बरोबर आहे पण समोरच्या माणसाने असं काही केलच नाही म्हणजे त्याचा स्वभावात बद्दल केलाच नाही तर ? "

रोहन पण म्हणाला , " आजी , बरोबर म्हणतीय राधा ? मग काय करायचे ग ? " 

" अरे बाळांनो , मला सांगा . तुम्हाला एखादे गणित सुटूत नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते सोडवायचा प्रयत्न करतात की नाही. पण ते सुटत पर्यंत थांबत नाही. तसच असते ग , आपल्याला तो माणूस आवडायला लागला ना कि आपण पण त्याला  समजून पण घेतो आणि त्याचा एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्याकडून हळूच करून पण  घेतो. हे सगळे सहवासाने घडत .  तू रोहन मला सांग कि राधा ने तुला कितीही त्रास दिला तरी तीला काही लागले तर तू तिला बघत नाहीस का ? "

" बघतो कि. तू बघतीयस ना मी घेतो कि काळजी ."

" म्हणजे तू तिला आपले मानले आहेस म्हणून तिचा सगळ्याबाजूने विचार करतोस ना तसच  आपण ज्याच्याशी लग्न करणार त्याला आपलं मानलं ना कि सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. आणि बाळांनो तुम्ही जसा विचार करता तसाच समोरचा पण आता विचार करत असेल ना. दोघांची सारखीच मनस्थिती असेल त्यामुळे हळूहळू नात्यांचा गुंता सोडवला तर......."

आजी एवढं बोलून सगळे शांत राहीले. राधा आणि रोहन आजीच्या बोलण्याचा विचार करू लागले.

***

इकडे नंदन आपल्या खोलीत आला होता. विचार करत होताच कि आई आली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली , " काय झाले बाळा ? "

"  विचार करत होतो , आपल्याला हे जमेल का ? " त्यात ती शिकणारी, मग आमचं जमेल का ? तिच्या अपेक्षा पूर्णे  करू शकेल का ? "

" कसय  ना बाळा , तुला जसा विचार येतोय तिला पण येत असेलच ना ? यावर एकाच उपाय , तुम्ही दोघे भेटणे, बोलणे हे महत्वाचे आहे ना ? आपण एकदा भेटूया ? काय चालेल ना ? " असे म्हणत आई त्याच्या कडे बघू लागली .

जरा वेळ गेला . तो खिडकीतून बाहेर बघत होता.   आईला वाटले कि त्याला या सगळ्या गोष्टींसाठी वेळ द्यावा म्हणून ती बाहेर आली.

अमोद ने लगेच विचारले ,"काय झाले ? "

आई म्हणाली "तो विचार करतोय बघुया. पण मला वाटतय तो मुलगी बघायला नक्की तयार होईल. "

सगळे चहा नाष्टा करत होते. एकीकडे आईचे विचार चालूच होतील. " काही गोष्टी आपण समजवण्यापेक्षा त्याला समजणं गरजेचे आहे. म्हणून तर मी त्याला बोलणं भेटणे महत्त्वाचे आहे हे सांगितले आहे. बघूया पुढे... "

या सगळ्यात दोन दिवस कधी गेले कळलेच नाही.  सकाळी सगळे नाष्टा बसले असताना जोशी गुरूजींचा फोन आला. आई फोनवर बोलत होती.

" नमस्कार जोशी गुरूजी. बोला काय म्हणताय ?"

" अहो , आनंदाची बातमी द्यायला फोन केलाय. ?"
ते मी स्थळ सांगितले होते ना राधा म्हणून ते मुलगा बघायला तयार आहेत. "

उत्साहात आई म्हणाली, " अरे वा. ते पसंद आहे का ?"

" अहो मी नंदन चा फोटो त्यांना दिला नाहीये तर त्यांना फक्त माहिती वरून  योग्य वाटतय. तर मी त्यांना म्हणालो तर प्रत्यक्ष मुलगाच बघा. "

" अरे व्वा हे छान केलेचं. मी मुलाशी बोलून तुम्हाला वेळ कळवते. "

" हो चालेल ना. ठेवतो फोन. धन्यवाद"

" धन्यवाद "

*****

भूतकाळ

जेव्हा आजीने दोघांना समजवले त्याच रात्री जेवताना परत विषय झाला तर बाबा म्हणाले, " रोहन ,मी मुलाशी चौकशी केलीय. मला त्यात वावगे काही आढळले नाही. तूझं काय ?"

" हो बाबा ,मी पण चौकशी केलीय. मला पण काही खोट काढण्यासारखे काही आढळले नाही. त्याच्या आईचा स्वभाव पण मनमिळाऊ आहे. त्या राधाला समजून घेतील. तीची पुढे शिकण्याची इच्छा पण पूर्ण होईल. असं मला वाटतय. "

मध्येच आजी म्हणाली, " या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष भेटल्यावर समजून येतील . तर आपण बघण्याचा कार्यक्रम करूया. "

आई म्हणाली, " हो काही गोष्टी समोरासमोर लक्षात येतात.  आपण त्यांच्याच घरी जाऊया. म्हणजे घर पण बघता येईल. सगळं समजेल. "

बाबा म्हणाले, " हे बरोबर आहे. राधा बाळा तूझं काय मत ?"

" बाबा, तुम्ही म्हणालं तसं. ती मनात म्हणाली मुलगा नाही आवडला तर नकार देता येईलच की. "

" चला मी गुरूजींना कळवतो तसं. "

असं म्हणून त्यांनी गुरूजींना फोन करून तयार आहे मुलगा बघायला असं सांगितले. लगेच गुरूजींनी नंदनच्या आईला फोन करून हे कळवलं होतं.

आईंचा आणि गुरूजींचा फोन झाल्यावर आई नंदनला म्हणाली, " नंदन, तूला मुलीला भेटण्याची संधी आलीय. तू सांग आता कधी भेटूयात ?"

" आई , अगं लगेच ?"

" अरे बाळा नुसतं भेटूया. पुढचं पुढे बघू ?"

" हो दादा आई बरोबर बोलतीय. नुसत भेटायला काय हरकत आहे. आम्ही आहोतच की तुझ्याबरोबर . "

" हे बघ नंदन, आपण अमोदला पण बोलवूया. मग तूला तर काही प्रश्न नाही येणार . "

आता काही आई ऐकणार नाही त्यामुळे त्याने मानेनेच होकार दर्शविला.

आई उत्साहात म्हणाली, " रविवारीच बोलवते त्यांना म्हणजे तूला आँफिस मध्ये सुट्टी नको घ्यायला. "

असं म्हणून आई गुरूजींना फोन करायला गेली तर नंदन आँफिसला निघून गेला.

बघुया पुढच्या भागात यांची भेट कशी होतीय ते.