Login

तूच माझी राधा भाग २१

एक प्रेमकथा
तूच माझी राधा

भाग २१

मागील भागात

आईंचा आणि गुरूजींचा फोन झाल्यावर आई नंदनला म्हणाली, " नंदन, तूला मुलीला भेटण्याची संधी आलीय. तू सांग आता कधी भेटूयात ?"

" आई , अगं लगेच ?"

" अरे बाळा नुसतं भेटूया. पुढचं पुढे बघू ?"

" हो दादा आई बरोबर बोलतीय. नुसत भेटायला काय हरकत आहे. आम्ही आहोतच की तुझ्याबरोबर . "

" हे बघ नंदन, आपण अमोदला पण बोलवूया. मग तूला तर काही प्रश्न नाही येणार . "

आता काही आई ऐकणार नाही त्यामुळे त्याने मानेनेच होकार दर्शविला.

आई उत्साहात म्हणाली, " रविवारीच बोलवते त्यांना म्हणजे तूला आँफिस मध्ये सुट्टी नको घ्यायला. "

असं म्हणून आई गुरूजींना फोन करायला गेली तर नंदन आँफिसला निघून गेला.

आता पुढे

आई गुरूजीं फोन लावते. " नमस्कार गुरुजी. मी नंदन ची आई बोलतीय ."

"  हां बोला ना. काय म्हणताय ? "

" अहो आनंदाची गोष्ट आहे . माझा मुलगा राधा ला पाहिला तयार झाला आहे . तर तुम्ही तिच्या घरच्यांशी बोलून कळवा . शक्यतो रविवारचा दिवस ठरवा. नाहीतर एक मिनिट मीच  त्यांच्या घरी फोन करते . चालेल का ? "

" अहो ताई जरा शांत  व्हा . मी आधी त्यांच्याशी बोलतो मग तुम्ही फोन करा . चालेल ना ? "

" सॉरी  हां जरा उत्साहात गडबडच झाली. तुम्ही बोला आधी.  मग मी उदया फोन करते . " असे बोलून आईने फोन ठेवला. अन् ती उठायला लागली तर समोर प्रिया उभी. तिला पाहून म्हणाली, " काय गं अशी काय बघतेस माझ्याकडे?"

"तुझी चाललेली धडपड . आई ग दादाने मुलगी बघायला होकार दिलाय लग्नाला नाही. ए गप्प. लग्नाला पण देईल होकार.

चल तुझ्याशी कुठे गप्पा मारत बसू. सगळी तयारी करावी लागेल. मावशीला फोन करून तिला पण बोलवावे लागेल. "

" अग एव्हढी काय घाई . आधी तिच्या घरी तर  बोल . मग बघू .  तोपर्यंत कोणालाही बोलू नको. "

" अरे हे लक्षातच नाही आले. मी नाही कळवत कोणाला. जा तू कॉलेजला . "

" हो जाते. काही गडबड करू नको . मी आल्यावर बघू . " असे  म्हणून प्रिया निघून गेली. . आई परत विचार करत बसली.

*****  

गुरुजी नंदनचा आईचा फोन आला म्हणून लगेच राधाच्या घरी निघाले. रस्त्यात विचार करत होते . राधा तयार आहे पण पुढे काय.........  पोरींचे चांगले होउदे रे बाप्पा. विचारात राधाच्या घरी कधी आले कळलंच नाही.  

" रोहन आहे का रे ? "

" या या गुरुजी . सगळे आहेत घरात . " असे आराम खुर्चीत बसलेली आजी म्हणाली व आवाज देऊ लागली ," रोहन , राधा, राधाची आई कुठे गेले सगळे. बघा तरी कोण आलेत ?"

आजीचा आवाज ऐकून सगळे बाहेर आले. रोहन म्हणत आला , " कोण आलाय ग आजी ? " समोर गुरुजींना बघून म्हणाला ," अरे गुरुजी . ."

तेव्हढ्यात बाबा म्हणाले , "  आज सकाळी सकाळी इकडे ? काय म्हणताय ? "

" अरे आनंदाची बातमी आहे . ते मुलाकडचे रविवारी बघायचा कार्यक्रम करू या असे म्हणतायत . "

बाबा म्हणाले ," लगेच . घाई होईल. आमची काहीच तयारी नाहीय. "

" अहो तयारी काय करायचंय. आपण च तिकडे जाऊया . थांबा मी त्यांना फोन करतो . " असे म्हणून गुरुजींनी फोन लावला पण .

" नमस्कार , मी जोशी गुरुजी  बोलतोय . "

" नमस्कार , बोला गुरुजी . बोललात का राधाच्या घरी ? "

" हो. मी त्यांच्याच घरी आहे. घ्या तिच्या वडिलांशी बोला . " असं  म्हणून त्यांनी बाबांकडे फोन दिला .

" नमस्कार , मी राजेंद्र  कुलकर्णी म्हणजे राधाचे वडील. " त्यानां  पुढे काय बोलावे ते सुचलेच नाही. त्यामुळे ते २ मिनिटे थांबूनच राहिले .

" नमस्कार , मी श्रीमती . मीरा रत्नपारखी . मला तुमचे स्थळ आवडले. माझी नक्की खात्री आहे तीच माझी सून होणार . "

हे ऐकून  बाबांना दडपण च आले. ते म्हणाले , " ताई , तुम्ही पुढचा विचार करतायत . पण आधी मुलांची पसंती तर होऊ दे . "

" हो . तुमचं बरोबर आहे . तर  मी काय म्हणते, तुम्ही रविवारी आमच्या घरी या . म्हणजे तुम्हाला घर बघणे होईल. "

" हो चालेल . आम्हीच येतो. पण आम्हाला इथून येई पर्यंत थोडा उशीर होईल .इथून पुण्यात यायचे म्हणजे.... "

" तुम्ही एक काम करा . माझ्या बहिणीच्या घरी आदल्यादिवशी या. मी तुमची सगळी तिथे व्यवस्था करते. "

" अहो , पण त्यांच्या घरी कसे? "

" काळजी करू नका . त्या एकट्याच असतात . "

" बरं . मी घरच्यांशी बोलतो रात्री कळवतो."?

फोन ठेउन बाबा म्हणाले ," ताईंचे म्हणणे आहे की , आपण शनिवारी रात्री त्यांच्या बहिणीकडे राहावे. मग रविवारी सकाळी कार्यक्रम करावा . "

आई म्हणाली , " अहो , त्यांच्या बहिणी कडे कसे ? "

" आपल्याला जायला उशीर होईल . त्या घरी एकट्याच असतात तर तिथे सोय करते म्हणाल्या. "

गुरुजींकडे बघून म्हणाले , " तुमचं काय म्हणणे आहे गुरुजी ? हे योग्य आहे का ? " 

" अजून दोन दिवस आहेत तर  आपण आज विचार करून उद्या त्यांना सांगूया . आता पासून दडपण नको घ्यायला . मी एकदा घरी जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करतो . तो पर्यंत तुम्ही पण विचार करा . "  बाबांनी यावर फक्त मान हालवली .

गुरुजी निघून गेले. सगळे आपापल्या कामाला गेले. आजी खुर्चीत बसून विचार करत होती सगळ्या गोष्टींचा .


*****

इकडे मीरा ने लगेच आपल्या बहिणीला म्हणजे उमा ला फोन लावला. तिला उचले पर्यंत सुध्दा दम  नव्हता . उमाने फोन उचल्यावर लगेच मीरा म्हणाली , " काय ग काय करत होतीस ? इतका वेळ लागतो का फोन उचलायला . "

" सकाळी सकाळी काय भूकंप झालाय का ? एवढी कसली ग घाई तूला ताई ? "

" भूकंप नाही झालाय . चांगली बातमी आहे . "

" काय झाले? "

" ऐक तर , अग नंदन मुलगी बघायला तयार झालाय . "

" अरे व्वा, काय सांगतेस?  सांग पटापट कोण कुठे .... "

" अग हो . ऐक  ,  गणपतीपुळे ला राहते . तिचे नाव राधा आहे. आपण रविवारी बघण्याचा कार्यक्रम करणार आहोत . "

" किती छान . मी दुपारीच येते तुझ्याकडे मग बोलू . "

" चालेल. ये नक्की . मी वाट बघतीय . ठेवते . ये बर का नक्की "

****

दुपारी सगळे जेवायला बसे होते तेंव्हा आजी म्हणाली , राजेंद्र , काय विचार केलास ? "

" अग  आई , मला तर काही सुचतच नाहीय . त्यांच्या घरी राहायचे , मग कसे वाटते ? "

" तुझे बरोबर आहे पण असा  विचार करून बघ की  , जर आपण त्यांच्या कडे गेलो तर आपल्याला अजून त्यांची चैकशी करता येईल. त्यांचा स्वभाव लक्ष्यात येईल . आजूबाजूचा  अंदाज लावता येईल. कळतेय ना मी काय म्हणताय ते ? "

बघुया पुढच्या भागात राधाचे कुटूंब जायला तयार होते का ते ?