Login

तूच माझी राधा भाग २२

ती आणि त्याची कथा
तूच माझी राधा

भाग २२

मागील भागात

दुपारी सगळे जेवायला बसे होते तेंव्हा आजी म्हणाली , राजेंद्र , काय विचार केलास ? "

" अग  आई , मला तर काही सुचतच नाहीय . त्यांच्या घरी राहायचे , मग कसे वाटते ? "

" तुझे बरोबर आहे पण असा  विचार करून बघ की  , जर आपण त्यांच्या कडे गेलो तर आपल्याला अजून त्यांची चैकशी करता येईल. त्यांचा स्वभाव लक्ष्यात येईल . आजूबाजूचा  अंदाज लावता येईल. कळतेय ना मी काय म्हणताय ते ? "

आता पुढे

" अग तुझे बरोबर आहे पण असे परक्याच्या घरी राहिला जायचे म्हणजे ?"

" बाबा , आपण असे करूया एका हॉटेल मध्ये जाऊन राहूया . सकाळी त्यांच्याकडे जाऊया . म्हणजे आपली पण छोटीशी ट्रिप होईल . कार्यक्रम झाल्यावर तिथे फिरून दुसऱ्या दिवशी येऊया . काय वाटे तुम्हाला ?" असं रोहन म्हणाला.

" अरे इथले ? "

" बाबा काळजी नका करू हा आठवडा कोणीच नाहीय . आता तुमचं आणि राधाचाच ???"

" मला काही नाहीये ."

राधाला तर जायचेच नव्हते , तर हे नवीनच काहीतरी  आपण आता नाही म्हणालो तर सगळेच नाराज होतील. अशी सहल पण आमची कधी झाली नाही. यांच्या आनंदासाठी आपण हो म्हणूया . असा  विचार करून तिने पण होकार काळवला .

"चला बाबा लगेच त्यांना फोन करून टाका . " 

आजी म्हणाली , " जेव तर आधी किती ती घाई . "

****

नंदन , आई, मावशी, आणि प्रिया सगळे जेवण करून गप्पा मारत होते .
नंदन म्हणाला , " काय मावशी बाई आज इकडे कश्या काय ? आज बरेच दिवसांनी आमची आठवण झाली ."

" अरे तुझ्या  लग्नाची बातमी .... " असे म्हणताच आईने चिमटा काढला  अन् नंदन डोळे मोठे करून एकदा आई कडे एकदा मावशी कडे बघत होता . " अरे , म्हणजे तू मुलगी बघायला तयार झाले हे कळलं म्हणून लगेच आले . "

" अग एवढी उत्साही नको होऊ. मी अजून लग्नाला होकार नाही दिलाय. "

आई म्हणाली , " ते जाऊदे . मी काय सांगतेय ते एका . राधा कडचे सगळे रविवारी येणार आहेत आपल्याकडे . "  राधा शब्द एकूणच नंदन ट्रिप मधल्या मुलीच्या आवाजात हरवला.. इकडे आई काय सांगतोय ते ऐकायला जागेवरच नव्हता .

आई बोलतच होती , " तर मी त्यांना म्हणाले  कि तुम्ही शनिवारीच या . आणि मावशी कडे थांबा . काय रे नंदन बरोबर ना ? नंदन चे लक्षच नव्हते . शेवटी प्रिया ओरडली त्याच्या कानात , " दादा , ते बघ राधा आली "

" कुठेय कुठेय ?"

सगळ्याजणी हसायला लागल्या . ते हसतायत  म्हटल्यावर नंदाच्या लक्ष्यात आले आपण काय केले ते ?"

" हसायला काय झाले ? आई तू काहीतरी बोलत होतीस ना ? "

मधेच प्रिया म्हणाली , " ती ना म्हणत होती कि राधा रविवारी येणार आहे आपल्याकडे . "

तो जोरात ओरडत म्हणाला , " काय ? कशाला ?"

" अरे असे काय करतो दादा , तुला राधाला भेटता यावे म्हणून आई ने बोलावले आहे . "

" ए मला नाही भेटायचे कोणाला ?"

आई म्हणाली , " प्रिया थांब . नंदन तूच म्हणाला ना मी मुलगी बघायला तयार आहे . म्हणून तर मी त्यांना रविवारी बोलावले आहे. " तेंव्हा कुठे नंदीची ट्यूब पेटली .  हो मी म्हणालो होतो पण लगेच ?"

मावशी म्हणाली  , " हे बघ नंदन , अरे नुसते भेटायचे आहे. तुला लगेच बोहल्यावर नाही चढवत आहे .  आता आई काय म्हणतोय ते नीट एक ."

आई म्हणाली , " ते रविवारी आपल्याकडे येतील. तर मी त्यांना शनिवारी मावशी कडे राहा असे सांगितले आहे . ते अजून हो म्हणाले नाहीयेत . "

" पण त्यांना मावशीकडे कशाला ? ते राहतील कि हॉटेल किंवा बाहेर कुठे तरी ?"

" त्यांचे कोणी नातेवाईक नाहीयेत आणि त्यामुळे आपल्याला माणसे कशी आहेत ते कळेल . "

" तुला पाहिजे ते कर . "अस म्हणून तो खोलीत निघून गेला .आई च्या फोनची रिंग वाजली .

प्रिया म्हणाली , " आई , एवढ्या रात्री कोणाचा  फोन आहे ? "  थांब बघते .

हा बघ त्यांचा च फोन आहे . " नमस्कार "

" नमस्कार . मी जरा खूप उशिरा फोन केला क्षमस्व . "

" अहो असे काही नाही बोला "

" मी दुपारीच फोन करणार होतो . पण जमलंच नाही . क्षमस्व . "

" अहो असू दे आता केलात ना . बोला काय म्हणताय ?"

"आम्ही येऊ शनिवारी पण  एका हॉटेल मध्ये थांबतो. आणि सकाळी तुमच्याकडे १० वाजेपर्यंत येतो. "

" हॉटेल मध्ये कशाला . तुम्ही खरंच माझ्या बहिणी कडे थांबा . ती आमच्या घराच्या जवळ राहते . "

" त्याचे काही नाही पण  आमची दोन तीन कामे पण आहेत तर ती पण करूंन आम्ही सोमवारी  मग येऊ इकडे तर उगाच त्यांना त्रास. म्हणून आम्ही ..... "

" तुम्ही माझे एका एकदिवस आमच्या कडे रहा . मग रविवारीच ठरवा तुम्ही . "

" बर ठीक आहे. शनिवारी येतो . जवळ आले कि एकदा फोन करतो . "

" हो चालेल . "

फोन ठेऊन  आई मावशीला म्हणाली , " ते शनिवारी तुझ्या कडे येतील . आपण हे दोघे उद्या गेले कि तयारी करू, "

" ए मी पण तुमच्यातच आहे. मला सोडून काही करायचे नाही. मावशी मी शनिवारी तुमच्याकडे येईन राहिला . "

" बरं उद्या ठरवूया .. चला झोपायला "

****

बाबा फोन ठेऊन सगळ्यांकडे बघून म्हणाले , " त्यांनी बहिणेकडेच थांबायला सांगितलय . रविवारी आपण दुसरी कडे जाऊ . "

" उद्या सगळी तयारी करावी लागेल . "

हे ऐकून राधा आपल्या खोलीत आली  गादीवर पडल्या पडल्या विचार करू लागली , " हे लग्न ठरले तर माझे काय ? मी खरच  वकील होईल ना की माझे स्वप्न अधुरं राहील. ? मुलगा कसा असेल ? त्यांचा होकार आला तर   ...... ते शिकायला नाही म्हणाले तर .....  "
या विचारात तिला कधी झोप लागली कळलेच नाही .

इकडे नंदन ची पण तीच अवस्था होती , " आपण आई ला तर म्हणालोय कि  मी मुलगी बघायला तयार आहे पण ..... तिचा अपेक्षा काय असतील . ती आईला आणि प्रियाला सोडून नवीन संसार थाट म्हंटली तर  ...... तिचे शिक्षण पूर्ण करू शकेल......  अश्या अनेक विचारांनी तो नुसताच या कुशीवरून त्या कुशीवर होत होता.

कसे असते ना लग्न म्हटलं की दोघांचही आयुष्य बदलं जातं. दोघांचे स्वभाव वेगळेवेगळे पण जोपर्यंत मन जुळूत नाही तोपर्यंत संसार होत नाही.

बघुया पुढच्या भागात दोन ध्रुव समोरासमोर आल्यावर काय होते ते ?

क्रमशः

©®सौ. चित्रा अ. महाराव

कथा कशी वाटतीय ती नक्की कमेंट्स करून सांगा


🎭 Series Post

View all