तूच माझी राधा
भाग २४
मागील भागात
नंदन पण म्हणाला, " समजा आमचं जुळलच तर मी तिचे स्वप्न पूर्ण व्हायला नक्की मदत करेन आणि प्रिया शिकतीच आहे की तिच्या बरोबर हीचेही शिक्षण पूर्ण होईल. "
तेव्हढ्यात राधा बाहेर आली . आल्या आल्या नंदन ला बघून जोरात ओरडली , " तू . तू इथे काय करतोय ? "
नंदन आणि बाबा बोलत असल्यामुळे त्याचे लक्ष नव्हते. तो आवाज ऐकून त्याने तिच्याकडे पहिले अन् तो जोरात ओरडला , " तू ?"
आता पुढे
नंदन ओरडला असला तरी त्याला तिला बघून मनात आनंद झाला. दोघेही एकमेकांवर ओरडले असले तरी एकमेकांकडे टक लावून बघतच बसले होते . राधा साडी मध्ये खूपच छान दिसत होती तर नंदन फाँर्मल मध्ये कडक दिसत होता.
अमोद ला आठवलं आपण हिला कुठे पाहिलंय त्यामुळे तो जोरात ओरडला , " अरे हि तर गोट्या वाली . " अमोद चा आवाज ऐकून दोघंही भानावर आले. राधा च्या लक्षात आलं आपण परत माती खाल्ली म्हणून ती गुपचूप बाबा आणि दादाच्या मध्ये जाऊन उभी राहिली .
नंदन पण अमोद च्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि त्याच्या कानात बोलला , " अरे हळू हिच आहे ती . गाणारी पण हीच आहे "
तर राधाने दादाच्या कानात सांगितले , " दादा, हाच तो माकड आहे "
हे ऐकून दोघेही एकदम जोरात ओरडून म्हणाले , " काय " या आवाजाने सगळे परत या दोघांकडे बघू लागले .
शेवटी प्रिया म्हणाली , " काय झालं तुम्ही दोघेही एवढे काय ओरडतायत ?"
अग प्रिया तुला ट्रिप चा किस्सा नव्हता का सांगितलं कि , " तुझा दादा गोट्या खेळून एका मुलीला हरवून आलाय . ती हीच आहे ?"
" काय ?"
मीरा ताई म्हणाल्या , " आता मला नीट सांगाल हा काय प्रकार आहे ते ? "
" हो काकू सांगतो ." असं म्हणून रोहन म्हणाला , " राधा तू ज्यांना फोनवर बोलली होतीस ते हेच नंदन राव आहेत ?"
हे ऐकून नंदन म्हणाला , " रोहन हि तुझी बहीण आहे . ती माझ्याशी फोनवर बोलत होती . "
तोंडातल्या तोंडात म्हणाला ,' म्हणूनच अशी आहे . कोणाशी कसे बोलवे पण ते कळत नाही आणि हिला वकिल व्हयचय . "
तोंडातल्या तोंडात म्हणाला ,' म्हणूनच अशी आहे . कोणाशी कसे बोलवे पण ते कळत नाही आणि हिला वकिल व्हयचय . "
" हो . "
लगेच अमोद ने रीघ ओढली , " काकू तुम्हाला माहितीय . आम्ही फिरायला गेलो होतो तर हा तुमचा लाडका मुलगा हिच्या बरोबर गोट्या खेळात होता . बेट लावून खेळात होता . आणि ..... "
हे ऐकून रोहन पटकन म्हणाला , " म्हणजे त्या दिवशी ज्या माकडा बद्दल बोलत होते ते हेच ......... "
प्रिया आणि अमोद एकदम डोळे मोठे करून एकदा नंदन कडे आणि एकदा राधा कडे बघत मोठ्याने म्हणाले , " माकड " आणि जोरात हसायला लागले .
नंदन त्यांच्या कडे चिडून बघू लागला . मनात म्हणाला , " थांब तुम्हाला नंतर बघतो . "
वातावरण जरा तापायला लागलंय बघून मीरा ताई म्हणाल्या , " ए गप्प बसा सगळे . मागचे सगळं जाऊदे. आता आपण नव्याने सुरूवात करूया. "
" राधा , बाळा मी मीरा रत्नपारखी नंदन ची आई, ही उमा माझी बहिण आणि ही प्रिया माझी मुलगी. हा अमोद, नंदनचा खास मित्र. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा नंदन. "
अमोदने नंदनला चिमटा काढला पण तो काही मोबाईल मधून डोकं काढायला तयार नाही.
प्रिया म्हणाली, " तूला वकिल व्हायचय ना ? "
" हो का हो ?"
" अगं बाई मला अहो जाहो करू नकोस .मला ऐ प्रियाच म्हणं मी काही एवढी मोठी नाहीये. "
" अहो पण.... "
" पण बीन काही नाही. आपण जर मानपान करत बसलो ना... त्यापेक्षा मैत्रिणी किंवा बहिणी सायखं राहिलो तर.सगळच सोपे होऊन जाईल. "
" मलाही चालेल ."
नंदनचे मोबाईल मध्ये लक्ष असलं असं दाखवत असला तरी डोळ्याच्या कोपऱ्यातून तिला न्याहळण्याचे काम चालू होते.
मनातच म्हणाला, " हिला शांतपणे बोलता येते. कमालच आहे. "
अमोदचे बारीक लक्ष होते नंदनचे काय चाललय त्याकडे म्हणून तो मध्येच बोलला , " काकू, मी काय म्हणतो? या दोघांना लग्न करायचे आहे तर यांना जरा बोलून घेऊ दे ना. काय म्हणताय चालेल ना ?"
" अरे हो, न चालायला काय झाले. उलट त्यांनीच बोलायला पाहिजे . एक काम करा तुम्ही चौघे जण नंदनच्या खोलीत जा. आम्ही इथेच आहोत. "
ते चौघही खोलीत आले खरे पण दोघही दोन दिशेला तोंड करून बसले होते.
राधा खोली न्याहळत होती. खोली त एका बाजूला पुस्तकांचे कपाट होते तर त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या सोकेश मध्ये काही ट्राँफी ठेवलेल्या होत्या. खोलीणा रंग पण क्रिम होता . त्यामुळे ती नंदन सारखीच शांत लाटत होती. खोलीत आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं होतं. समोरून बाहेरच अंगण दिसत होते. ते बघून ती उठून एकदम तिकडे निघून गेली.
ती त्या बाजूला गेलेली बघून तो पण ती काय करतीय हे बघायला तिच्याकडे वळला.
त्याचवेळी प्रिया आणि अमोदने एकमेकांना डोळ्यांनी खुणा करून बाहेर आले अन् हळूच खोलीचे दार ओढून घेतले. नंदनला ते गेलेले कळलेच पण तो काही बोलला नाही.
" छान आहे ना ?"
" काय छान आहे?" असं ओरडतं राधा म्हणाली.
" अहो , चिडताय काय? मी बाग छान आहे .
"अच्छा. मला वाटलं.... "
" काय वाटलं तुमचं कौतुक करतोय की काय . ?"
" मला काही असं वाटलेल नाही आणि तसही तुमच्या कडून मला काही अपेक्षाही नाही. "
त्याला ती शांत बघवत नव्हती म्हणून तो तीला उचकावायचा प्रयत्न करत होता .
" हो मलाही हाऊस नाहीये तुझी स्तुती करायची. "
" बरोबर , तुम्ही आमची का ना स्तुती करणार. तुम्ही तर ...."
" मी काय?" असं म्हणत तो तिच्या दिशेने पावलं टाकत राहिला.
तो आपल्याकडे येतोय म्हणून ती मागे मागे सरकत काही नाही म्हणाली.
हे ऐकल्यावर तो भानावर येऊन जागीच थांबला. दोन मिनिटे एकमेकांच्या डोळ्यात बघत होते पण लगेच नंदन भानावर येऊन म्हणाला, " बरं ते जाऊ दे. आपल्याला ज्या गोष्टी साठी आत पाठवलं आहे ते बोलूयात का ?"
" त्यात काय बोलायचय? सरळ तुम्ही नकार . मी पण नकार देणार. संपला विषय. "
" मी का नकार द्यायचा ? आणि तुम्ही मला ओळखता. माझ्या बद्दल तुम्हाला काय माहिती आहे . "
" काहीच नाही माहित. "
" मग का नकार देणार ?"
" हे बघा. "
"काय बघू" गालात हसतं म्हणाला.
" म्हणजे ऐका "
" हां बोलाना . मी ऐकतोय. " असं म्हणत तो तिच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघू लागला.
तो असं बघतोय बघून ती थोडी घाबरली. मनातल्या मनात शब्दांची जुळवा जुळव करू लागली.
बघूया पुढच्या भागात काय बोलणं होतय ते दोघांमध्ये
क्रमशः
©® सौ. चित्रा अ. महाराव
भाग कसा वाटलं ते नक्की कमेंट्स देऊन सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा