तूच माझी राधा
भाग २५
मागील भागात आपण पाहिले की नंदन आणि राधा एकमेकांसमोर स्थळ म्हणून आले. दोघे नंदनच्या खोलीत एकत्र येऊन बोलतायत. नंदन मुद्दाम तिला उचकावायचे काम करत होता. पण काही वेळानेच तो शांत होऊन लग्नाला होकार द्यायचा का नाही या गोष्टीवर बोलायला सुरू करतात.
आता पुढे
नंदन म्हणाला, " बोल ,तुला काय वाटतं ? "
नंदन म्हणाला, " बोल ,तुला काय वाटतं ? "
" मला आता लग्न नाही करायचे. मला वकिल व्हायचय. मी त्याची तयारी करतीय. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. त्यामुळे तुम्ही नकार द्या . "
" मग तूच दे की नकार ?"
" मी द्यायला मला काही कारणचं सुचूत नाहीये.."
" होकार का नकार ते आपण नंतर ठरवू . आधी तू मला सांग , वकिलीचा अभ्यास तुला गावात राहून करता येईल ?"
" नाही. मला कोणत्यातरी शहरात यावे लागेल. "
" एकटी राहशील. अनोळखी शहरात ?"
" नाही माहित. "
" वकिलीचा अभ्यास किती वर्षे आहेत ?"
" मी आता शेवटच्या वर्षाला आहे. म्हणजे अजून ३ वर्ष "
" अच्छा, म्हणजे ३ वर्षानंतर लग्न करणार ?"
ती ओघा ओघात ' हो ' म्हणून गेली. जेव्हा लक्षात आले तेव्हा म्हणाली, " म्हणजे अजून नक्की नाही. "
" अच्छा. म्हणजे करणारे नंतर मग आता का नको ?"
" का नको ते नाही माहित पण नको. "
" मी , साधा,सरळ, दिसायला बरा आहे , माझी आई, प्रिया पण छान बोलल्या तुझ्याशी तरी नाही वाटतं योग्य"
" नाही असं काही नाहीये . "
" म्हणजे मी तुला योग्य वाटतो. "
" मी असं कधी म्हणाले "
" आताच तर म्हणाली. "
इतक्यावेळ शांततेत चाललेली चर्चा परत भांडणावर यायाला लागली. म्हणून नंदनेचं माघार घेऊन म्हणाला, " बरं बाई तू तसं नाही म्हणाली. मी च म्हणालो. बास . आता माझं म्हणणं ऐक , तूला शिकायला गाव तर सोडावे लागेल. मग इकडेतिकडे जाण्यापेक्षा ..."
ती त्याच्याकडे मोठे डोळे करून बघायला लागली.
अग बाई माझं पूर्ण म्हणं ऐक मग तू ठरवं.
" मी तूला थोडाफार ओळखतो. तुझ्या स्वभावानुसार तुला झेलणाराच बाबांना शोधावा लागेल आणि त्यात तू वकिल होणार म्हणजे......"
ती फक्त डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होती.
आता जर तू मला नकार दिला तर बाबा दुसरा कोणीतरी शोधणारचं. तो शहरातील नसला तुमच्या गावातीलच असला आणि त्याने शिकायला संमती नाही दिली तर....
त्यापेक्षा मी तूला शिकायला संमंती देतो. तू या शहरात राहू शकशील आणि लग्न केलं म्हणजे तूला एकटीला नाही राहावे लागणार यांने आई बाबांना पण काळजी नाही राहणार.
तुझ्या जोडीला प्रिया असणार म्हणजे तुम्ही दोघी मैत्रिणींप्रमाणे राहू शकता. तुला कसल दडपण येणार नाही. आई तर तुझी काळजीपण घेईन.
या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करं" असं म्हणून तो तीला खोलीत एकटाच विचार करायला सोडून सगळे बसले होते तिथे आला.
आई म्हणाली, " काय झालं ? राधा कुठेय ?"
अमोघ म्हणाला, " परत भांडलात का ?"
" नाही भांडलो. ती येतीय . मला रोहनशी थोडं बोलायचे आहे तर मी अमोघ आणि रोहन बाहेर जाऊन येऊ का ?"
" अरे पण झालं काय ?"
" काही नाही झालं. माझा निर्णय मी जरा विचार करून देईन. त्या आधी फक्त आम्ही जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही तिच्याशी बोलून जेवणाची तयारी कराच तोपर्यंत आलोच आम्ही.
चलं अमोघ. रोहन येतोयस ना ?"
रोहन आई,बाबांकडे बघू लागला. बाबांनी डोळ्यानींच होकार दर्शविला. तसा रोहन म्हणाला, " येतो ना ."
नंदन सगळ्यांकडे बघून म्हणाला, " काळजी करू नका. काही चुकीचे घडलेले नाही. ती आत मध्ये विचार करत बसलीय. तुम्ही आत जाऊन तिच्याशी शांतपणे बोला. आम्ही आलोच जाऊन. "
नंदन रोहनला घेऊन त्याचं आँफिस दाखवायला आला . नंदन म्हणाला, " रोहन, ये. हे आमचं दोघांच आँफिस. आम्ही दोघे बरोबरीने काम करतो. एकमेकांना कायम साथ असते. हा माझा जीवलग मित्र अमोघ. तू ओळखतोस तरी पण.... "
रोहन आँफिसच बारकाईने निरीक्षण करत होता. रोहन म्हणाला, " चांगलय आँफिस . किती वर्ष झाले हे आँफिस होऊन?"
" झाली पाच वर्ष. "
" पुढील आयुष्यात महत्त्वाचे ध्येय ?"
" आई, बहिण आणि होणारी बायको यांना सांभाळून हे आँफिस मोठं करायचे आहे त्याचबरोबर मी आश्रम चालवतो जो गरजू महिला पुरूष यांना योग्य मार्गाने पायावर उभ राहिला मदत करते. हे कार्य मला मोठं करायचे आहे. "
" अच्छा. म्हणजे तुम्हाला यात साथ देणारी बायको हवी. पण जर ती बायको तिच्या क्षेत्रात मोठं व्हायचे स्वप्न बघत असेल तर.... "
" मला काही हरकत नाही कारण यात मला अमोघ आणि माझी आईंची साथ आहे. त्यामुळे तीला तिच्या क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करता येईल. हे करायला तीला माझी साथ नक्की आहे. "
अमोघ म्हणाला ," रोहन , तूला राधासाठी नंदन योग्य वाटतो का?"
" वाटतो पण तिचे स्वप्न पूर्ण झाल्यावर तिचे लग्न व्हावे असे माझे मत आहे. "
नंदन म्हणाला, " मी राधा शी बोललोय. पण काही गोष्टी मला तुझ्याशी बोलायचे आहेत आणि आँफिस पण दाखवता येईल असं मला वाटलं. म्हणून मी तुला घेऊन आलो.
कसयं आपण एका पिढीतील आहोत तर तुझे माझे विचार जरा जमू शकतात. तर आधी तुझे मत घ्यावे मग घराच्यांशी सविस्तर बोलावे .
बोलायच्या आधी थोडी काँफी घेऊ. चालेल ना?" अमोद आणि रोहनने दोघांनी माना हालवल्या. काँफी येईपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या.
इकडे राधा नंदन काय बोलून गेला याचा विचार करत होती. आई, बाबा तिच्या जवळ आले तर आजी नंदनच्या आई आणि मावशीची बोलत त्यांची चौकशी करत होती.
बाबा म्हणाले, " राधा , बाळ काय झालं?"
" काहीच नाही. "
" हे बघ तू लगेच निर्णय सांगितले पाहिजे असं काही नाही. त्यामुळे आता बिनधास्त राहा. सगळ्यांशी नीट बोल. आपण घरी गेल्यावर ठरवू मग आपला निर्णय सांगू. " बाबा असे म्हणाल्यावर तीला जरा बरं वाटले. ती लगेच चेहऱ्यावर हसू आणून आई कडे बघू लागली. आईने पण डोळ्यांनी त्याची संमंती दिली.
आई म्हणाली, " आपण बाहेर जाऊ. त्यांना स्वयंपाकात मदत केली पाहिजे. चल ग राधा. "
सगळे बाहेर आले तर राधाला रोहन आणि नंदन दोघही दिसले नाही. ती आईला विचारणार तेव्हा प्रिया राधाला म्हणाली, " बरं झालं तू बाहेर आली. चल मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. "
प्रिया राधाला ओडतचं बागेत घेऊन गेली. दोघी काँलेजच्या, मित्रमैत्रिणी बद्दल खूप गप्पा मारत होत्या. बोलता बोलता प्रिया नंदन बद्दल पण सांगत होती. त्यावेळी फक्त राधा शांत होऊन ऐकत होती.
नंदनच्या आई म्हणाली, अहो, मला तर तुमणी राधा तर फार आवडली. मी तिला अगदी माझ्या मुलीप्रमाणेच सांभाळेन हो पण आधी दोन मुलांचे ठरू दे. तुम्ही तिच्यावर दडपण आणू नको. तिला नीट विचार करू दे.
शेवटी बाप्पाच्या मनात असेल तर नक्की जुळेल हो तोपर्यंत आपण छान मैत्रिणींसारख्या गप्पा मारू या. "
राधा ची आई ने फक्त मानेनेच होकार दर्शविला.
बघूया पुढच्या भागात रोहन आणि नंदन चे काय बोलणं होतोय ते
क्रमशः
©®सौ. चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा