Login

तूच माझी राधा भाग २६

त्याची तिला आयुष्यात आणण्यासाठी चाललेली धडपड
तूच माझी राधा

भाग २६

मागील भागात आपण पाहिले की राधा ला नंदन ने काही गोष्टींचा विचार करायला सांगितला . तर नंदन रोहन ला घेऊन आँफिसला आला होता.

रोहन काँफी पिता पिता म्हणाला, " नंदनराव तुम्हाला काहीतरी सांगत होतात ना ?"

" पहिले मला नंदनराव म्हणून फार लांब नको करू. मी तुझ्याच वयाचा आहे तर मला फक्त नंदन म्हणं. आपण पहिले मित्र मग बाकीचे. " रोहनने मानेनेच होकार दर्शविला.

नंदन पुढे म्हणाला, " रोहन, आम्ही मागच्या आठवड्यात जेव्हा तुमच्याकडे आलो होता ना तेव्हा एके दिवशी मी सकाळी सहज फिरायला बाहेर पडलो तर तुमच्या घराच्या जवळच एका देवळात राधा सुमधूर आवाजात भजन गात होती.

तो आवाज ऐकून मी त्या देवळात प्रवेश केला. मी तिच्या आवाजात मंत्रमुग्ध झालो. गाणं संपल्यावर मी तिला पहिले . तिला पाहून थोडा आनंदी आणि थोडा दुखी झालो म्हणून मी तिचा विषय सोडून माझे फिरणे , सहलीची मज्जा घेत राहिलो .

घरी आल्यावर दोन दिवसात आई ने लगेच बघायचे कार्यक्रम ठरवलं आणि आज तीच माझ्या समोर आहे .

मला नक्की काय करायचे हे सुचत नव्हतं पण आता तिच्याशी बोल्यावर मला काही गोष्टी जाणवल्या .... "

रोहन म्हणाला , " कोणत्या गोष्टी ? राधा काही बोलली का ? "

" राधा  काही नाही बोलली .    मी शांत, गरज तिथेच बोलणारा , फार लोकांच्यात मिसळत नाही. .... "

तेवढ्यात अमोघ  म्हणाला, "  राधा अगदी ह्याच्या विरोधी आहे . तेवढीच  मनाने प्रेमळ आहे . आमच्या या मित्राला माणसात आणायला, हसायला , बोलायला शिकवायचे असेल तर राधा बरोबर शिकवेल . " नंदन अमोघ कडे डोळे मोठे करून बघायला लागला . 

अमोघ नंदन कडे दुर्लक्ष करून पुढे म्हणाला , " मला असे वाटते कि या दोघांचे लग्न व्हायला हवे . म्हणजे हा ठोंब्या माणसात येईल . " असं म्हणून अमोघ हसू लागला . रोहन पण गालातल्या गालात हसायला लागला .

इतका वेळ तणावात चालणारे बोलणं यामुळे थोडं तरी वातावरण हलके झाले .

नंदन  म्हणाला , " याच्या कडे लक्ष देऊ नकोस . मी काय म्हणतोय  ते ऐक ."

रोहन आणि अमोघ लक्ष देऊन ऐकू लागले.  नंदन पुढे म्हणाला , "    राधा ला वकिल व्हायचंय . हे पुणे आहे त्यामुळे तिला इथे  हवा त्या काँलेजला प्रवेश घेता येईल .  ती इथे लग्न करून राहिली तर तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही. मी हेच तिला पण सांगितलंय . ती त्यावर विचार करतीय. आणि मुख्य गोष्ट म्हणजे  .... " असं  म्हणून नंदन शांत बसला . तो मनातल्या  मनात शब्दांची जुळवा जुळव करू लागला.

रोहन नंदन बोलत का नाही याचा विचार करत त्याच्याकडे बघतच बसला .  आणि अमोघ नंदन च्या चेहऱ्याचे निरीक्षण  करत त्याच्या मनात काय आहे याचा अंदाज घेत होता .

१५ मिनिटांनी अमोघ च म्हणाला , नंदन काय झालय ?"

त्याने काही नाही मानेने सांगत पुढे म्हणाला , " मला तिचा आवाज त्याच दिवशी आवडला होता.   मला तिच्यावर प्रेम आहे कि नाही  ते आता नाही सांगता येणार  पण ती मला माझी जीवनसाथी हवीय . " असं म्हणून तो गप्प बसलां. तर हे दोघे त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागले.

अमोघ गालातल्या गालात हसू लागला  आणि म्हणाला , " नंदन शेवटी तू लग्नाला तयार झालास तर पण मी तुझ्यावर रागावलोय तू मला हे काही बोलला का नाहीस . "

" आपण हे नंतर बोलू आधी मला रोहनचे मत ऐकायचे आहे . रोहन बोला ना काय  झालं ? तुला काही विचारायचय  का ? "

" तू मला या साठी इथे  घेउन आलाय का ? "

" हो "

" का, राधा काही बोलली का ? "

"  तिला आता लग्न करायचे नाही असं म्हणत होती ."

" मग तुमचं काय  मत आहे यावर ?"

" हे बघ , मला तिच्या इच्छेविरुद्ध काही करायचं नाहीये . आपण तिला हळूहळू तयार करू या लग्नाला . तिला सगळं  हळूहळू पटवून देऊ. पण हे सगळं करायला  मला तुझी मदत हवी आहे पण हे करताना तुला आणि तुमच्या घरचांना मी राधा साठी योग्य वाटत असेल तर ... ... . "  यावर रोहन विचार करू लागला .

नंदन पुढे म्हणाला , " तू घरच्यांशी चर्चा कर आणि मला सांग . आता घरी गेल्यावर तू साधं च बोल. मग तुम्ही मावशी कडे जाल तेंव्हा बोल . "

रोहन हो म्हणाला .

अमोघ म्हणाला , " तुम्ही उद्या लगेच जाणार आहे का ?"

" नाही . आम्ही उद्या पुणे फिरणार आहे . "

" मग भारीच कि आपण एकत्रच फिरू . म्हणजे तुम्हाला नंदन आणि परिवार कसा आहे ते कळेल . "

" चालेल . आपण घरी गेल्यावर ठरवू . निघूया का ? बराच वेळ झालाय ."

" हो चला नाहीतर काकू आपल्याला ओरडेल . "

सगळे घरी निघून आले.घरी आले तर सगळे जण छान गप्पा मारत बसलेले होते .  सगळे त्यांच्याकडे बघू लागले. नंदन ची आई म्हणाली, " काय रे कुठे गेला होतात ?"

" अगं आई , रोहन ला आमचे ऑफिस दाखयवायला गेलो होतो. "

" बरं . चला जेवायला बसूया . जा आवरून या. रोहन जा तू पण . चला  ग ताई आणि  प्रिया आपण ताटं घेऊयात .

"  हो चाल . "

" काकू , मी पण येते . "

" अगं  राहूदे . "

राधाने काही ऐकले नाही . ती त्यांच्या मदतीला गेलीच . ती टेबलावर सगळं आणून ठेवत होती . तेवढ्यात नंदन त्याच्या खोलीतून बाहेर आला. आता कुठे त्याने तिला शांतपणे पहिले होते तेंव्हा त्याच्या लक्षात आले की तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. ती त्याच्यात खूप सुंदर दिसत होती  तो तिच्याच कडे बघत बसला.

मगाशी दोघे एकदम एकमेकांसमोर आल्यामुळे त्यांच्यात भांडणे झालीच. त्यात पण नंदन ने च नमतं घेतले होते.  त्यामुळे तो तिला न्याहळत होता.

टेबलावर  ठेवता ठेवता  तिचे पण नंदन कडे लक्ष गेले. तो आपल्याकडे बघतोय. हे बघून ती लगेच आत निघून गेली .

ती आता गेलेली बघून तो पण भानावर आला आणि सगळे बसले होता तिथे गेला .

काका त्याची बारीक सारीक गोष्टी विचारून घेत होते.  रोहन शेजारी येऊन बसल्यावर बाबांनी विचारले , " अरे रोहन तुम्ही कुठे गेला होतात ?"

" अहो बाबा, नंदन चे ऑफिस पहिला गेलो होतो . "

" अच्छा "

बाबानी हळूच त्याच्या कानात विचारलं ," काय म्हणाले का ?"

" आपण घरी गेल्यावर बोलू . "

तेवढ्यात जेवणासाठी आवाज आल्यामुळे सगळे जेवायला बसले.

बघूया पुढच्या भागात पुणे फिरण्याच ठरतय का ते ?

राधा काय उत्तर देतीय