Login

तूच माझी राधा भाग २७

ती ची आणि त्याची गोष्ट
तूच माझी राधा

भाग २७

मागील भागात आपण पहिले की , नंदन रोहन ला घेऊन त्याचे ऑफिस दाखवायला घेऊन  जातो . तो रोहन ला सांगतो , मला राधाशी लग्न करायचीय तर मी योग्य वाटत असेल तर  तिची तयारी करायला  मला तू मदत कर . 


एवढे बोलून ते घरी येतात. सगळे एकत्र जेवायला बसले होते . त्याच्या गप्पा चालू होत्या. राधाचे मध्ये मध्ये नंदन कडे लक्ष होते .  उगाच तिला काहीतरी वाटायचे आणि ती पुन्हा गैरसमज करून घेईल म्हणून नंदन ने अजिबात लक्ष दिले नाही .

अमोघ म्हणाला , " काकू , जुलाबजामून खूप छान . किती दिवसांनी तुझ्या हाताचे खायला मिळाले. "

" हो ना मी पण बरेच दिवस झाले केले नव्हते ."

प्रिया ला या दोघांचा संवाद थांबवायचा होता म्हणून राधा कडे बघून म्हणाली , " राधा , तुला आमचे घर आवडले का ?"  तिने मानेनेच होकार दर्शविला . 

तेवढ्यात अमोघ ने प्रियाला मेसेज करून मी काही म्हणेल त्याला होकार दर्शव असे सांगितले. तिनी मेसेज वाचलाय बघून अमोघ रोहन ला म्हणाला , " रोहन , तुम्ही उद्या लगेच जाणार गणपतीपुळ्याला ? "

हा परत का विचारतोय म्हणून त्याच्याकडे बघू लागला. तर त्याने डोळा मारून खून केली. तेंव्हा याच्या डोक्यात प्रकाश पडला अन म्हणाला , " नाही रे. आम्ही उद्या इथेच फिरणार आहोत . . का रे ?"

नंदनची  आई म्हणाली, " अरे व्वा . छानच . मग तुम्ही आज ताईकडेच  राहा. चालेल ना ताई ?"

" हो चालेल की . उद्या सगळे माझ्याकडे नाष्ट्याला  या. मग नंदन, प्रिया आणि अमोघ ला घेऊन तुम्ही फिरायला जा. ते तुम्हाला सगळं दाखवतील. चालेल ना  ? हे ती राधाच्या आई बाबांकडे बघून म्हणाली.

बाबा म्हणाले , " चालेल की . पण मी काय म्हणतो . आम्ही तुमच्या घरी नाही राहत . "

" आहो असं कशाला? आमच्याच घरी रहा . "

रोहन म्हणाला ," बाबा , त्यांचे बरोबर आहे आपण त्यांच्याच कडे राहू. म्हणजे हे सगळे आपल्याबरोबर येतील. " आईबाबा त्याच्याकडे बघू लागले. त्याने डोळ्यांनीच मी नंतर सांगतो खुणावले. त्यामुळे बाबा लगेच तयार झाले. 

बाबा म्हणले, " मग आम्ही आता जेवण झाल्यावर जरा बाहेर जाऊन ताईंच्या घरी जाऊ चालेल का ? "

" चालेल. रात्रीचे जेवण आपण एकत्र ताई कडे करूयात . "

" चालेल. "

नंदन आणि राधा दोघेही शांत जेवत यांचे काय ठरतेय ते फक्त ऐकत होते. हा दोघांच्या मनात दुसरेच विचार चालू होते. या विचारात जेवण कधी झाले त्यांना कळेलच नाही.

जेवण करून राधाचा परिवार बाहेर गेले. तर प्रिया , आई आणि मावशी गप्पा मारत होते तर नंदन आणि अमोघ त्याच्या खोलीत गेले.

अमोघ फक्त नंदन कडे डोळे राखून बघत त्याच्या बोलण्याची वाट बघत होता.

" असा बघू नकोस माझ्याकडे . सगळं सांगतो. बस इथे . "

" हे बघ . आपण फिरायला गेलो होतो त्या वेळेला तुम्ही एक दिवस उशिरा उठलात म्हणून मी  सकाळी गावात फिरायला गेलो. तर तिथेच एक देवळात राधा गाणं म्हणत होती . मी तो आवाज ऐकून तिकडे गेलो पण तिला पाहून आदल्या दिवशी घडलेल्या गोष्टीमुळे ती परत माझ्या अंगावर भडकली. त्यामुळे शांततेने मी निघून गेलो . चार लोकांसमोर उगाच तमाशा नको म्हणून.

त्यानंतर पण आम्ही जेंव्हा जेंव्हा भेटलो त्यावेळेला आम्ही खुन्नस च दिली . पण आपण जेंव्हा दोघंच समुद्रावर गेलो आणि तू मला लग्न या विषयावर समजावत होतो . तेंव्हा का माहित नाही पण माझ्या डोळ्यासमोर राधा च आली आणि योगायोगाने  तिचेच स्थळ आले.

घरी जेंव्हा लग्नाचा विषय होता तेंव्हा आदी राधाला विचारायचे का असे मनात आले होते पण  ...

तुला माहितीय ना मी विचारायला गेलो तर तिने तिथेच माझ्याशी वाद घातला असता . म्हणून मी आज रोहन ला हे सगळं सांगून तिला तयार करावे  लागेल असं  वाटलं म्हणून मी रोहनला सगळं सांगितले.

ती तयार होणार नाही लवकर मला माहितीय कारण तिचं स्वप्ने आहे वकिलीचं . मग आपण त्याला तिला साथ दिली तर तयार होऊ शकते .

आईला पण तिने फोटो बघितल्या पासून आवडली होती तर पुढे सगळं अवघड होणार नाही. ती पण आईला समजून घेईन असे वाटाय. आता बोल तुझं काय म्हणणं आहे ."

" मी तिला जेंव्हा तुम्ही एकमेकांना टक्कर देऊन गोट्या  खेळत  होताच तेंव्हा च माझ्या मनात आले होते कि हीच तुला माणसात आणेल आणि तुला साथ पण देईल .

म्हणून मी घरी आल्यावर काकू आणि प्रिया बरोबर बोलून सगळं ठरवणार होतोच पण तेवढ्यात हे ....

पण मी आज खुश आहे तू आपणहून लग्नाला तयार झाला. पण तुला वाटतं राधा तयार होईल. ?"

" होईल पण वेळ लागेल . मला गणपतीपुळयाच्या वाऱ्या कराव्या लागतील ." असं म्हणू तो हसायला लागला.

तेवढ्यात प्रिया त्यांना बोलवायला आली पण या दोघांना हसताना पाहून डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघू लागली.  थोड्यावेळाने भानावर येऊन मोठ्यांनी बोलली , " ऐ  थांबा "

तिचा आवाज ऐकून दोघांनी दाराकडे पहिले तर प्रिया डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत होती .

नंदन म्हणाला ," काय झालं प्रिया का ओरडतीयस ?"

" मग काय तुम्ही हाका मारून सुद्धा माझ्याकडे लक्ष देत  नव्हता "

" बरं बोल कशाला हाका मारत होतीस ?"

" तुम्हाला आईने बाहेर बोलावले आहे ."

" चल" असं म्हणून सगळे बाहेर आले . 

बाहेर आल्या आल्या अमोघ म्हणाला, " मी सगळ्यांसाठआईस्क्रीम घेऊन येतो असे म्हणून तो निघून पण गेला.

राधा आणि त्यांचा परिवार  बाहेर पडल्यावर एका चौकात येऊन थांबले होते. तिथून पुढे कुठे जायचे याचा विचार करत ? बाबा म्हणाले , " मी मनोज ला फोन करून बघतो तो असेल तर त्याच्या घरी जाऊ ?"

रोहन म्हणाला , " नको त्यांच्या घरी . आपल्याला काही बोलता नाही येणार .तर आपण इथेच एखादी बाग  असेल तर तिथे जाऊन थांबू ."

" चालेल . पण उन्हात ? आजी ला त्रास होईल ना "

अमोघ ने यांना लांबूनच पहिले होते म्हणून तो त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला , " रोहन काय झालं ? तुम्ही अजून इथेच ? काही समस्या आहे का ?"

" अरे काही नाही जातच होतो . पण बाबांच्या मित्राचा फोने लागत नव्हता ना म्हणून थांबलो होतो . "

" अरे मग माझ्या घरी चला. आजींना कुठे इतका वेळ उन्हात थांबवता . माझ्या घरी मी आणि आईच असतो. तिथे आजी विश्रांती घेतील. "

रोहन सगळ्यांकडे बघू लागतो .

" अरे फार विचार करू नका . मी तुम्हाला सोडून बाहेर कामाला जाणार आहे तर तुम्ही निवांत बोलू शकता . मग संध्याकाळी तुमच्या ओळखीच्या कांकांकडे जा. थांबा इथेच मी गाडी घेउन येतो . " असं म्हणून अमोघ परं नंदनच्या घरी  गेला पण .

गाडी लावून आता ओरडत आला , " नंदन मला तुझ्या गाडीची चावी दे ना ? "

" का ? काय झालं ?"

" काही नाही तू चल बाहेर सांगतो ." असं म्हणून दोघेही बाहेर आले

"   अरे रोहन ला मी माझ्या घरी घेउन जातोय . ते माझ्याकडे विश्रांती घेतील  त्यांच्या ओळखीचे जे आहे त्यांचा फोन लागत नाहीय म्हणून ."

" बर"

" मी त्यांना सोडून परत आईस्क्रीम घेऊन येतो . "

" चालेल. "

बघूया पुढच्या भागात राधा चे काय मत आहे ते .