Login

तूच माझी राधा भाग २९

तिच्यासाठी चालेला विचार
तूच माझी राधा

भाग २९

मागील भागात आपण पहिले कि राधाच्या  घरचे नंदन विषयी चर्चा करत होते . त्याचप्रमाणे नंदन च्या घरी पण तोच विषय चालू होता . बोलता बोलता नंदनने प्रियाला माझे एक काम करशील का विचारले ?

" बोल काय काम करायचे आहे रे दादा ? "

" प्रिया अगं ........ " 

" थांब थांब " प्रिया ओरडत म्हणाली

आता काय ह्या अश्या  चेहऱ्याने नंदन तिच्याकडे बघू लागला .

" अरे मला आधी खरं खरं सांग तुला राधा पसंत आहे ना ?"

" हो "

" ऐ स्स्स स्स्स्स स्स्स्स "

" अगं बाई ओरडू नकोस .  माझे ऐक आधी ."

" दादा मी खुश आहे आज तू जे बोलशील ते मी सगळं करेन "

" काही विशेष करू नको फक्त आपण उद्या फिरायला जाऊ ना तेंव्हा तिला पटवून दे कि तुझे शिक्षण इथे चांगले होईल. आणि तू तिच्याबरोबर कायम मैत्रिणी सारखी राहशील हे  तिला पटवून दे . "

" एवढंच ना  चुटकी सरशी होईल . अजून काय ?"

" काहीच नाही . मला एक सांग तुझे आणि अमोघ चे काय चालूय ग ?"

" आमचं कुठे काय  ?"

" आता नको सांगू . मी शोधून काढेन . "

" आमचं काही नाहीच आहे तर तू काय शोधणार ? "

" मी कुठे काय म्हणालो तुमच्यात काही आहे . मी फक्त तुम्ही दोघे काही  ठरवताय का असे विचारात होतो . जाऊदे जा तुला आईकडे मदतीला जायचाय  ना  . "

" हो हो . मी जाते . "  असं म्हणून प्रिया तिथून सटकली . ती मनातच विचार करत होती ,'  आपण उगाच इथे थांबलो अन  दादाने  अजून काही विचारले तर ..... '

ती गेल्यावर नंदन खोलीत आला . सकाळपासून घडलेल्या गोष्टींचा विचार करत बसला . " आपण तिचा विचार करतो काय ? तीच समोर येते काय ? आपण रोहनला सांगतो काय कि मला तिच्याशीच लग्न  करायचे आहे ?  परत ती तयार होईल यासाठी प्रयत्न करतो काय ? काय आहे हे सगळं ? माझाच माझ्या वागण्यावर विश्वास बसत नाहीय .

दहा दिवसापूर्वी लग्न या गोष्टीचे खूप टेन्शन आले होते . काय होईल पुढे . आपण हे सगळं सांभाळू शकू का ? म्हणून मी तयार होत नव्हतो आणि अचानक आज तयार पण झालो . 

खरोखरच एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यावर ती कायम जवळ असावी असे वाटते .तिच्या मुळे आयुष्यात चांगले वाईट बद्दल करायला आपण तयार होतो त्यामुळे आयुष्य बद्द्लत जातं .

मनात कुठे तरी ती व्यक्ती घर करून बसते . हे आपोआप जाणवायला लागलंय . आई म्हणते तेच खरयं. जोडीदाराची ओळख मनातूनच होते तेव्हाच सूर जुळतात.

पण ती तयार होईल का? तिच्या डोक्यात काही वेगळा विचार असेल तर किंवा तिला दुसरं कोणी आवडत असेल तर....
तिला रोहनने सांगितलं असेल का ? तिच्या घरी काय चर्चा चालू असेल .

या सगळ्या विचारात तो किती वेळ झाला बसला असेल त्याच त्यालाच कळले नाही .  तेवढ्यात अमोघ कॉफी घेऊन आला .

" काय रे कसला एवढा विचार करतोय ?" 

" अरे कशालाच नाही . तू बोल ना काय म्हणतोयस ?"

" अरे  विशेष काही नाही . मी घरी गेलो थोडसं आईच काम करून परत तूला भेटायला आलो."

" अच्छा. "

" काय रे तू कसला.एवढा विचार करत होता. "

"अरे.काही नाही. "
 
" काय नाही कसं . मला सगळं कळत . तुझ्या मनात असेल तसेच होईल . आपण कायम चांगला विचार करायचा . पण तो विचार करताना फक्त आपलंच चांगलं होईल असा विचार नाही करायचा . आता तुला वाटतंय तिने तुझ्याबरोबर असावं पण तिचा वेगळा विचार असेल तर त्याचा आदर करता आलं पाहिजे . "

" हो रे मी तिचा निर्णयाचा आदर करेन .  बास का ? तू नको काळजी करू . "

" मी नाही काळजी करत . "

" नंदन खरं सांगशील तिची तुझी पहिली भेट कशी झाली ? आणि तुम्ही भांडलात ? "

" अरे भांडण असं नाही पण थोडी बाचाबाची झाली . मी तुला काय झालं ते सांगतो . आपण सगळे मित्र फिरायला गेलो होतो तर हि तिथे मुलांना गोट्या मध्ये चीटिंग करून हरवत होती . मी ते पहिले . आणि काय झालं माहित पण ते खेळतायत बघून मला पण खेळायची इच्छा झाली . मग मी तिच्या विरुद्ध खेळायला लागलो . त्यामध्ये आमचे थोडे खटके उडायचे  . तिथे पहिली भेट झाली . बाकी काही नाही . "

" अच्छा . . " 

" अमोघ, काय रे तूला काय वाटतं तिचं काय मत असेल ?"

" काय माहित, उद्या फिरायला गेल्यावर कळेल. चला आपल्याला मावशी कडे जायचय. आता रात्रीचा विचार करं. मग पुढचं... "

" हो आता असलेला क्षण जगून घेऊ. "

बघूता पुढच्या भागात काय होतय ते