Login

तूच माझी राधा भाग ३१

एका अचानक भेटलेली मुलगी आपल्या आयुष्यात येण्यासाठी काय करतो मुलगा याची कथा.
तूच माझी राधा

भाग ३१


मागच्या भागात आपण पाहिले की जेवणानंतर राधा आणि नंदन बाहेर झोपाळ्यावर गप्पा मारत होते.
" ऐक  उद्या तू फिरायला म्हणून बाहेर पडणारेस तर मोकळ्या मनाने फिर . सगळ्याचा आनंद घे . मी आहे म्हणून कोणतंही दडपण घेऊ नको . "

" हो पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल . "

आता हि मला नको येऊ म्हणते कि काय असा विचार त्याच्या मनात आला . म्हणून  त्याने भीतभीतच विचारले , " काय करावे लागेल ?"

तिने हात पुढे करत म्हणाली , " मित्र ?"

त्याने पण आनंदाने हात पुढे करत म्हणाला, "  मित्र "

तेवढ्यात प्रिया आवाज देत आली , " दादा , ए दादा तुम्हाला आत बोलवलय . "

" हो चला तुम्ही पुढे मी आलोच . "

असं नंदन म्हटल्यावर राधा आणि प्रिया आत गेले पण नंदन झोपल्यावर तसाच बसला . " मी तिला तर सांगितलंय नेहमीप्रमाणे रहा . उगाच दडपण घेउन राहू नको .  आम्ही मैत्री केली तर ती माझ्याशी मोकळे पणाने बोलले का ? तिला बोलत करावे लागेल . त्यासाठी काय करता  येईल ?"

तेवढ्यात अमोघ त्याच्याशेजारी येऊन बसून म्हणाला , " काय रे काय विचार करतोयस ?"

" अरे तिच्याशी मी मैत्री केलीय . आता ती मोकळी राहिली  पाहिजे कारण तिने कालच्या गोष्टीच टेन्शन घेतलय ."

" होईल  .  उद्या आपण तिच्याबरोबर नेहमीप्रमाणे वागू  आणि एक तू तिच्याशी जसा भांडत होतास ना तसंच तिला उचकवायचं म्हणजे ती सगळं विसरून जाईन . प्रिया ला जरा तिच्याबरोबर हसत खेळात राहिला सांग . "

" हो चालेले. " मनात म्हणाला , ' तिला उचकवायला काहीही कारण लागत . उद्या प्रिया आणि तिची चांगलीच गंमतच करतो . ' या विचाराने त्याच्या चेहऱ्यावर हसू फुटलं .

आणि ते हसू बघून अमोघ म्हणाला,  "गेला पोरगा हातातून गेला . "

नंदन त्याचा गळ्यात हात घालूनम्हणाला , " कोण गेला ?"

" अरे पोरगा पार हातातून गेला . " लगेच नंदन ने त्याचा गळ्याचा हात थोडा घट्ट केला .

खोकायचे नाटक करत म्हणाला  ,' सोड मला सोड '

दोघ एकमेकांना मिठी मारून घरात निघून आले. उद्या सकाळी सगळे आठ वाजता फिरायला जाऊ असं ठरवून नंदन आणि त्यांचा परिवार घरी आले .

मावशींनी दिलेल्या खोलीत राधा आणि आई झोपायची तयारी करत होत्या . पण राधाच्या मनात सकाळ पासून घडलेल्या गोष्टीच येत होत्या . त्यामुळे ती शांत होती . हे आईच्या लक्षात आलं कायम बोलणारी मुलगी शांत झालेली बघून आईच्या मनात एक विचार येऊन गेला ," आपण खरच लवकर लग्न करतोय काय मुलीचं ? अशी शांत होणार असेल तर लग्न करण्यात काय उपयोग ? आपण घरी जाऊन ह्यांच्याशी बोललं पाहिजे. "

सकाळी बरोबर आठ वाजता नंदन आणि त्याच्या घरचे मावशीच्या घरी आले होते . सगळी मुलं एका गाडीत तर अमोघच्या गाडीत सगळी मोठी मंडळी बसली होती.  अमोघ ची गाडी चालवायला ड्रायव्हर काका असल्यामुळे अमोघला मुलांच्या गाडीत बसता आले.

पहिली सुरुवात त्यांनी तळ्यातल्या गणपती म्हणजेच सारसबागेच्या गणपतीचे दर्शन घेऊन केली. सारसबागच्या दारात मोगऱ्याच्या फुलांच्या वासाने सगळ्यांचे मन खूप ताजेतवाने आणि आनंदी झाले एक क्षण राधाने फुलांचा मनसोक्त वास घेतला अन् पुढे चालू लागली.

मागून येणाऱ्या नंदनने सगळ्यांसाठी गजरा घेऊन आत आला तर राधा आणि प्रिया गवतावर पकडापकडी करताना दिसल्या. त्या दोघींना सगळे बघत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद वाहताना दिसत होता.

तेव्हढ्यात राधाचे बाबा म्हणाले, " अरे पोरींनो चला, आधी दर्शन घेऊन येऊ या. "

नंदन तिच्या हासण्यातच एवढा गुंतला होता की हातातील गजरे सगळ्यांना द्यायचे भानच राहिले नाही. अमोघने त्याला थोडासा धक्का देऊन भानावर आणले आणि म्हणाला " आणलेले गजरे तर दे  सगळ्यांना."  त्याने मानेने होकार दर्शवून सगळ्यांना गजरा दिला राधाने पण गजरात हातात घेऊन मनसोक्त सुगंध घेतला.

सगळे गणपतीच्या मंदिरात आले. मनोभावे नमस्कार करून दोघांनी  योग्य तो मार्ग दाखवण्याची प्रार्थना केली.
राधाला तिथलं वातावरण खूप भावून टाकणार होतं त्यामुळे आपोआप तिच्या मुखातून

          सोनं पावलांनी आले बाप्पा,
          शेंदूर मस्तकी लावून टिला,
          सोन पावलांनी आले बाप्पा,
           शेंदूर मस्तकी लावून टिला.....

           माझा बाप्पा किती गोड दिसतो,
           माझा मोरया किती गोड दिसतो,
            माझा बाप्पा किती गोड दिसतो,
            माझा मोरया किती गोड दिसतो….

सगळे तिचे गाणं ऐकण्यात मग्न होऊन गेले. घरातले मग्न झालेच होते पण तिथे आलेले सगळे भाविक आहेत त्या जागी उभे राहून तिच्या भजनात तल्लीन होऊन गेले.

भजन संपल्यावर अमोघ ने जोरात गणपती बाप्प मोरया असा आवाज टाकला अन् सगळे भानावर आले.

पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणून सगळे बाहेर आले.

अमोघने प्रियाला डोळ्याने काहीतरी खूण केली तशी प्रिया राधाला घेऊन गवतावर आली तर अमोघ ही रोहन आणि नंदनला घेऊन  आला.

एकत्र आल्यावर सगळ्यांच्यात परत एकदा पकडापकडी सुरू झाली. बराच वेळ त्यांचा हा खेळ चालला होता .  मोठे सगळे बाकड्यावर बसून त्याचा आनंद घेत होते.

थकलेल्यावर सगळे तिथेच मांडी ठोकून बसले. प्रिया म्हणाली, " दादा आपण किती वर्षांनी असं खेळतोय ना. आज ना खूप मोकळं मोकळं वाटतय. "

हे बोलता बोलता नंदन आणि प्रियाने एकदा आई अडे नजर टाकली तर आई पण हासत खेळत सगळ्यांशी गप्पा मारत होती.

नंदन मनातच विचार करू लागला, " खरच बाबा गेल्यावर आपण एक यंत्रवत जगत होतं . आपलं हसरं घरं आज परत आनंदाने जगायला लागलय. एक मनुष्य आपल्या आयुष्यात आल्यावर किती बदल सुरू होतात ना ? कायम असं हसरं च राहू दे.  बाप्पा आता तूच काय ते बघ रे बाबा !"

अमोघ ने त्याला हात लावून भानावर आले. सकाळ पासून सगळ्यांनी काही खाल्लच नव्हते त्यामुळे सगळे जवळच असणाऱ्या गिरीजा हाँटेल मध्ये नाष्टा करायला गेले.


बघूया पुढच्या भाडात अजून दिवसभर काय करतायत ते.