Login

तूच माझी राधा भाग ३२

एकमेकांची एकमेकांना कशी साथ मिळते
तूच माझी राधा

भाग ३२


मागच्या भागात आपण पाहिले की सगळे आज पुणे फिरायला म्हणून बाहेर पडले होते. पहिल्यांदा ते सारसबागेच्या गणपतीचे दर्शन घेऊन फिरायला सुरूवात केली. गिरीजामध्ये पेटभर नाष्टा करून सगळे शनिवार वाडा, कसबा.गणपती आणि दगडूशेठ गणपती चे दर्शन घ्यायला निघाले.

आल्याप्रमाणे सगळे गाडीत बसून निघाले. यावेळी राधा जास्ती उत्साही होती. रस्त्याने जाता जाता प्रिया आणि अमोघ दोघांना माहिती पुरवण्याचे काम करत होते.

बोलता बोलता प्रियाने रोहन ला म्हणाली, " रोहन दादा तुम्हाला खायला काय आवडतो हो जास्ती ?"

" मला ना पावभाजी फार आवडते. तुम्हाला माहितीय राधा काय पावभाजी करते. आम्ही सगळे चाटत राहतो. "

" अरे व्वा . मला अन् दादाला पण खूप आवडते. पण आम्ही बाहेरच जाऊन खातो ."

राधाने पटकन विचारले ," का ?"

"अगं मला काही येत नाही स्वयंपाकातील अन् आईला उगाच त्रास नको म्हणून आम्ही सगळे बाहेर जातो. "

" अच्छा. तूला स्वयंपाकतलं काहीच येत नाही. मग तू काकूंना काहीच मदत करत नाही. "

" नाही. "

राधा हळूच पुटपुटली, ' आईला मी मदत केली नाहीतर आई घर डोक्यावरच घेईल. '

" काय पुटपुटे ग. "

" काही नाही. ते जाऊदे अमोघला काय आवडत सांगितलेच नाही. "

प्रिया पटकन म्हणाली, " त्याला ना चायनिज फार आवडत. "

तसे सगळे तिच्याकडे बघायला लागले. ती गोंधळून म्हणाली, " अग म्हणजे आम्ही सगळे एकत्र कधी बाहेर गेलो ना तर तो चायनिजच मागवतो ना म्हणून म्हटलं."

अमोघ म्हणाला, " चला आला शनिवार वाडा. उतरा आता खाली."

राधा पटकन म्हणाली, "दगडूशेठ आणि कसबा गणपतीला जायच होतं ना? "

नंदन म्हणाला, "  हो जायचय पण इथे गाडी ठेऊ मग चालत चालत फिरू. चालेल ना "

एकदम सगळे ओरडले ," होsssssss

तेव्हढ्यात मोठ्यांची गाडी आली. त्यातून सगळे उतरल्यावर नंदन त्यांना म्हणाला, " आपण चालत चालत फिरायचं का ? तुम्हाला सगळ्यांना त्रस होणार नाही ना आपण फिरलो तर ?"

" हो चालेल . आपण फिरूया. "

" आई , तुझे पाय तर नाही ना दुखणार ?"

" अरे एका दिवसाने काही होत नाही. चलं. "

तोपर्यंत हे सगळे जण शनिवार वाड्याच्या दार पाशी जाऊन उभे राहिले. अमोघ तिकिट काढायला गेला. राधा सगळीकडे नजर फिरवून नंदन वर च आणत होती. हे पण त्याने बघितले पण लगेच नजर फिरवून घेतली होती.

सगळे आत जाऊन शनिवार वाडा बघत होते. त्याला मध्येच फोन आला म्हणून तो त्यांच्यापासून थोडा लांब येऊन बोलत होता. ते गप्पा मारत चालेले होते तर तीचे लक्ष परत त्याच्याकडे गेले.

त्याने पांढरा शर्ट, बारीक दाढी, बोलताना त्याच्या चेहऱ्यावर कधी चिंतेचे तर  कधी उत्साहाचे भाव दिसत होते. मध्ये मध्ये कधी दाढीलाच हात लाव तर कधी केसावरून हात फिरव. असं करता करता तो फेऱ्या मारत होता.

तीच पूर्ण लक्ष त्याच्यावरच होतं. त्यामुळे तीच्या शेजारी प्रिया येऊन उभी राहिले तरी तिच्या लक्षात आले नाही. प्रिया ती कुठे बघतीय बघून म्हणाली, " छान दिसतोय ना ?"

राधा तिच्या तन्द्रितच ' हो' म्हणून मान हालवली.

प्रिया ने परत विचारले, " आता आवडायला लागलाय का ?"

ती यावर विचार करत होती अन् एकदम तीला आठवल आपण कोणाशी बोलतोय म्हणून तीने बाजूला पाहिले . ती आवाक झाली.

प्रिया म्हणाली, " चला आता तूला वहिनी म्हणायला हरकत नाही तर . " असं ओरडत पळत होती. राधाही तिच्यामागे धावली. प्रिया अजून चिडवत होती . सगळे त्यांच्याकडे बघत होते.

प्रिया मुद्दामून दादा जिथे होता अन् तिथे आली . पण राधा तिच्या चिडवण्यानी वैतागली होती म्हणून चिडतच म्हणाली," अजिबात नाही. मी तुझी वहिनी नाही. "

ह्याचवेळी नंदनने पण फोन ठेवला होता. त्यामुळे त्यानेपण हे वाक्य ऐकून शांत उभा राहिला अन् प्रिया पण आहे त्याच जागी उभी राहून एकदा दादा कडे तर एकदा राधा कडे बघत उभी होती.

हे बोलत बोलत राधा पण नंदन अन् प्रियाचा जवळ आली होती. तिघेही एकमेकांकडे बघत होते. शेवटी नंदनने काही ऐकलं नाही असं दाखवत दोघींना म्हणाला, " अरे तुम्ही इकडे काय करताय. चला गणपतीला जायचे आहे. सगळे एकत्र बाहेर पडू. "

त्याने तिथूनच अमोघ ला आवाज देऊन  सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सगळे शनिवार वाड्यातून बाहेर आले.

थोडं ज्यूस वगेरे घेऊन  पहिल्यांदा कसबा गणपतीला आले.  सगळे चप्पल काढत होते तोपर्यंत नंदन नारळ आणि दुर्वा घेऊन आला अन् एक राधाच्या आणि एक प्रियाच्या हातात दिले. मग पुढे निघून गेला.

राधा  मनातच विचार करू लागली, ' खरचं यांनी काही ऐकलं नाही का ? ऐकलं असेल बहुतेक म्हणूनच  माझ्या कडे न बघता  गेले. राग आला का त्यांना ?  प्रिया पण शांत शांत दिसतय. '

नंदन हळूच तिच्याकडे बघत होता तिच्या चेहऱ्यावरून वाटतं होत की ती मगाचाच विचार करत होती. मनातच म्हणाला, ' चला मँडम . थोडाफार विचार करू लागल्या तर. हेही ना थोडके. ' गालात हसत आत निघून गेला.

रोहनने आवाज दिल्यावर राधा भानावर आली . मनोभावे प्रार्थना करतात. सगळ्यांच्या मनाने हे लग्न व्हावे अशी इच्छा होती त्याप्रमाणे प्रार्थना करत होते. तर फक्त राधा वकिल होण्याची इच्छा व्यक्त करत होती.

तिच्या दृष्टीने वकिली महत्त्वाची होती. तिला इतक्यात लग्न करायचेच नव्हते. ती अजून मनाने तयार नव्हती या सगळ्यासाठी.

बाहेर विचारत करतच आली आपल्याला लग्नच करायचे नाहीये. मग आपण ते रागवलेत का याचा का विचार करतोय. आपल्याला काय रागवले तरी. चला आज मस्त फिरायचे. बाकी काही नाही.

उद्या आपण घरी गेले की अभ्यास . बास हा विषयच नाही घ्यायचा. 

प्रियाने आवाज दिल्यावर ती भानावर आली आणि चालू लागली. प्रियापण मगाशी काही झालंच नाही असं वागत होती त्यामुळे राधा पण आधीसारखी झाली.

दगडूशेठ चे दर्शन घेऊन बायकांच्या आवडता काम म्हणजे खरेदीला जायचे होते पण भुका लागल्या म्हणून तुळशीबागेतील अगत्य हाँटेलला जाऊन जेवायचे  ठरले.


जेवण करून झालं. तर नंदन ची आई म्हणाली, " आम्ही रामाच्या देवळात बसतो. तुम्ही खरेदी करा. आता आम्ही दमलो. चालले काहो ताई. ?"

त्या विचार करू लागल्या. त्यांचा चेहरा बघूनच म्हणाल्या "ताई तुम्हाला करायचे असेल करायचे तर तुम्ही जावा मी आणि  ही देवळात बसतो."

अस ठरवून सगळे खरेदीला गेले.

बघूया पुढच्या भागात खरेदी आणि अजून काय होतय ते.