तूच माझी राधा
भाग ३३
दगडूशेठ चे दर्शन घेऊन बायकांच्या आवडतीचे काम म्हणजे खरेदीला जायचे होते पण भुका लागल्या म्हणून तुळशीबागेतील अगत्य हाँटेलला जाऊन जेवायचे ठरले.
जेवण करून झालं. तर नंदन ची आई म्हणाली, " आम्ही रामाच्या देवळात बसतो. तुम्ही खरेदी करा. आता आम्ही दमलो. चालले काहो ताई. ?"
त्या विचार करू लागल्या. त्यांचा चेहरा बघूनच म्हणाल्या "ताई तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्ही जावा मी आणि ही देवळात बसतो."
सगळे खरेदीला गेले. प्रिया आणि राधा हा ड्रेस का तो ड्रेस घेऊ असं चाललं होत तर मध्येच कानातली, बांगड्या अश्या गोष्टी बघत बघत फिरत होत्या. एका ठिकाणी त्या दोघी ड्रेस घेत होत्या. प्रियाने अमोघच्या आवडीचा घेतला
तर राधा नुसतीच बघत होती. तिने एकदोनदा फिरून सगळीकडे पाहिलं पण तिला नंदन कुठेच दिसला नाही. मग परत ड्रेस वर विचार करू लागली.
फोन वर बोलता बोलता नंदनच बारीक लक्ष होत तिच्याकडे. ती आपल्याला शोधतीय असं वाटलं. पण तो सध्यातरी त्यावर.काही बोलू शकत नव्हता त्यामुळे लांबूनच चाललेला गोंधळ बघत होता.
शेवटी रोहननेच त्याला मेसेज केला, " जीजू, तुमची बायको कायम अशीच गोंधळलेली असते. तीला येऊन मदत करा नाहीतर रात्रभय इथेच थांबावे लागेल. मी आई बाबा काय घेतायत ते बघतो. तुम्ही या. "
मेसेज करून रोहन आई बाबांकडे गेला. प्रिया आणि राधा अजून ठरवतच होता तर नंदन प्रिया ला आवाज देत तिथे आला, " अरे चला. लवकर आम्हाला पण खरेदी करायची आहे. "
" अरे बघ ना दादा , हिला.काहीच पसंद पडत नाहीये. ये तूच सांग आता तिला. "
अस प्रिया म्हणताच राधा त्याच्याकडे बघून.परत खाली बघू लागली. तिच्याडोळ्यातील भाव ओळखून नंदनने मोरपंखी रंगाचा ड्रेस काढून प्रियाच्या हातात देऊन अमोघला घेऊन नंदन बाहेर आला. बाहेर येता येता तो दोन्ही ड्रेस चे पैसे दिले.
नंतर लक्ष्मी रोडला येऊन तिघांनीही शर्ट घेतले. यावेळी राधाने अजिबात लक्ष नाही दिले. नंदन ला वाटल़ होतं की ती तिच्या आवडीचा घ्यायला लावेल पण......
सगळ्यांची खरेदी करून रात्रीचे जेवण करून सगळे मावशीच्या घरी येऊन सोफ्यावर लोळत होते. राधा नेहमीसारखी बसायला जाणार पण आपण कोणासमोर बसलोय हे लक्षात येता . ती नीट बसली.
काही वेळानंतर मावशी सगळ्यांसाठी आईस्क्रिम घेऊन आली. सगळ्यांना देऊन ती बसलीच होती की राधाचे बाबा म्हणाले, " ताई. आम्ही उद्या सकाळी निघतो. तुम्ही आमचे छान आदरातिथ्य केले. खरच तुमचे धन्यवाद "
" अहो धन्यवाद काय मागता. आजचा दिवस सगळ्यांचा आनंदी गेला. "
" हो ताई खूपच छान गेला. कायम लक्षात राहिल आजचा दिवस. "
नंदन राधाकडे एकदा बघून बाबांना म्हणाला, " दोन दिवस घडलेल्या घटनांचं कोणतही दडपण घेऊ नका. आमचं पुढे ठरो अथवा ना ठरो. आपण एक फँमिली म्हणून कायम एकमेकांच्या संपर्कात राहू. "
" हो नक्कीच. आम्ही आमचा काय निर्णय असेल तो आम्ही दोन तीन दिवसात कळवतो. "
" बाबा, अजिबात घाई नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हढा वेळ घ्या. "
नंदनची आई म्हणाली, " आता आम्ही निघतो. सकाळी नाष्टा करून तुम्ही जा. नंदन सोडायला येईलच. "
राधाच्या जवळ जाऊन आई म्हणाली, " बाळ . कोणतेही दडपण घेऊ नकोस. तू कायम माझी मुलगीच राहशील. योग्य तो विचार करून निर्णय घे. येतो आम्ही आता. "
या मधल्या वेळेत राधाने नंदनशी बोलायचे आहे असा मेसेज रोहनला केला होता. रोहन पटकन म्हणाला, ' जीजू हे ऐकून राधा चिडून त्याच्याकडे बघत होती पण रोहनने दुर्लक्ष करून म्हणाला, " जीजू थोडं थांबता का ?"
" हो थांबतो की . काही काम होतं का ?"
सगळेच आपल्याकडे बघताय बघून रोहन म्हणाला, " अरे असं काय बघताय? मला माझ्या व्यवसायाबद्दल थोडं बोलायचं आहे म्हणून म्हटलं. "
रोहन ची आई म्हणाली, " मला वाटलं..."
" काय ?"
" काही नाही. चालू दे तुमचं काम. आम्ही जातो झोपायला. चला हो. "
नंदनची आई म्हणाली, " हो आम्ही पण निघतो. नंदन तू आज इथेच थांब. उद्या ये. "
" चालेल. तुम्ही सकाळी इकडेच या. "
" हो येतो. चला अच्छा. भेटू उद्या. "
सगळे गेल्यावर तिथे फक्त रोहन, नंदन आणि राधाच होते. सगळ्यांमध्ये एक आँकवोर्डनेस होता. तिघे एकमेकांकडे बघत होते.
शेवटी नंदननेच बोलायला सुरुवात केली ." अरे रोहन, बोलना काय बोलायचे आहे?"
" अरे... आपण आधी काँफी घेऊया मग बोलूयात .चालेल का ?"
" हो चालेल. तुम्ही बसा मी करून आणतो. "
राधा पटकन म्हणाली, " तुम्ही बसा . मी करते. मला फक्त काँफी आणि साखरेचे डबे सांगता का ?"
" हो सांगतो . रोहन मी.... "
" हो जा की. "
राधा पुढे गेल्यावर रोहनने हळूच नंदनला डोळा मारून म्हणाला, " मज्जा कर बेटा . "
नंदन गालातल्या गालात हसत चालला होता. हा का हसतोय असं विचार करत राधा स्वयंपाक घरात पोचली. तीने चालता चालता मागे चोर कटाक्ष टाकला होता त्यामुळे तो हासतोय हे तिला कळलं होतं.
नंदन ने काही न बोलता सगळे डबे, दूध, पातेल ओट्यावर ठेवलं. आणि तीला उचकावायच्या हेतूने म्हणाला, " तुम्हाला जमते ना काँफी ? का मी करू ? "
झालं मँडम आल्या मुळ पदावर , " का हो आमच्याकडे आला होतात तेव्हा माझ्याच हातची काँफी प्यायली होती ना मग ??"
" अच्छा ती तुम्ही केली होती का ? मला काय माहित ?"
" हो जसं काही माहितीच नाही तुम्हाला. "
" मला कसं माहिती असेल तुम्ही त्यांच्या घरातील आहात ते. आठवा तुम्ही आला होतात का माझ्या समोर. "
" असू दे असू . चला झाली काँफी. रोहन आपली वाट बघत असेल . "
राधा काँफी घेऊन आली तर तिच्या मागे नंदन पण आला. त्या दोघांना आलेल पाहून रोहन म्हणाला, " मला वाटलं आता मी झोपायलाच जावं. तुम्ही काय काँफी घेऊन येतच नाही. "
या वाक्यावर नंदन हसला तर राधा ने रोहनला चापट मारली.
काही काळ परत शांतता पसरली. आता काँफी पण संपत आली तरी रोहन काहीच बोलेना म्हणून नंदन म्हणाला, " अरे रोहन, तुला काहीतरी बोलायचं होतं ना ?"
" हो, चला आपण आपण बाहेर फिरत बोलूया. राधा तोपर्यंत तू हे उचलून ठेव. " तिला डोळ्यांनी अश्वस्त करून रोहन आणि नंदन बाहेर आले.
" बोल काय म्हणतोयस ?"
" जीजू "
" अरे तुझ्या बहिणीने ऐकलं ना ..... "
" अहो काही नाही होत. बरं ऐका. आमच्या बहिणाबाईंना तुमच्याशी बोलायचे आहे. म्हणून तीने तुम्हाला थांबायला सांगितले होते. आता तुम्ही बघा ती काय म्हणतीय ते? मी तिला पाठवतो."
" अरे.पण ... माझ्याशी काय बोलायचे ?"
" मला काही बोलली नाही. तुम्ही इथेच थांबा मी पाठवतो. " अस म्हणून रोहन राधा जवळ आला.
तो राधा कडे बघून म्हणाला, " हे बघ. उगाच चिडचिड करू नको. जे काय असेल ते स्पष्ट बोल. मी कायम तुझ्या मागे उभा आहे. काहीही निर्णय असू दे. तुला कसलीही जबरदस्ती नाही. जा. शांतपणे बोलं. "
बघूया पुढच्या भागात राधा काय बोलतीय ते ?
क्रमशः
सौ. चित्रा अ. महाराव
सौ. चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा