Login

तूच माझी राधा भाग ३४

दोघांची गोष्ट
तूच माझी राधा

भाग ३४

नंदन आणि रोहन बाहेर बागेत येऊन बोलत असतात. रोहन म्हणतो, " राधाला काहीतरी तुमच्याशी बोलायचे आहे . म्हणून थांबायला सांगितले होते.

" अरे.पण ... माझ्याशी काय बोलायचे ?"

" मला काही बोलली नाही. तुम्ही इथेच थांबा मी पाठवतो. " अस म्हणून रोहन राधा जवळ आला.

तो राधा कडे बघून म्हणाला, " हे बघ. उगाच चिडचिड करू नको. जे काय असेल ते स्पष्ट बोल. मी कायम तुझ्या मागे उभा आहे. काहीही निर्णय असू दे. तुला कसलीही जबरदस्ती नाही. जा. शांतपणे बोलं. "

इकडे नंदन विचारात फेऱ्या मारत होता. आपण दिवसभर काही चुकीचे वागलो का ? काय झालं असेल ?  ती नकार देईल? असे एक ना हजार प्रश्न त्याच्या डोक्यात येत होते.

विचारात त्याला कळलेच नाही राधा कधी शेजारी येऊन उभी राहिली. राधानेच घसा खाकरला. तेव्हा नंदनने तिच्याकडे बघितले.

" बोला मँडम काय बोलायचे होते आम्हा पामराशी. "

" तुम्ही आणि पामर. आम्ही पामर तुम्ही तर काय बाबा मोठी माणसं. "

" आम्ही कसले मोठी माणसं. तुम्ही वकिल होणार त्यामुळे तुम्ही मोठी माणसं. "

" वकिल होणार आहे झाली नाही. "

" मग होशीलच की. "

" हो होईन  त्यासाठी  शिक्षण घ्यावे लागेल की . "

" मग तुझं शिक्षण कोणी बंद केलय. "

" बंद नाही केलं पण.... "

" राधा, काय झालय ? काही अडचण आहे का ? शांत होईन सविस्तर सांग. "

" अडचण नाही पण.... "

" मी तुला आधीच सांगितले आहे कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घ्यायचे नाही. जे आहे ते स्पष्ट बोलं. "

" आज दिवसभर तुमचं वागण, बोलणं याचे निरीक्षण सगळ्यांनीच बघितले. तुम्ही माझ्या आई बाबांची, रोहनची तसेच तुमच्या आईंची पण चांगली काळजी घेतली. तुम्हाला असं वाटत असेल की मी असा वागलो तर राधा लग्नाला होकार देईल. "

" अगं पण मी तू होकार द्यावा म्हणून असं वागतच नव्हतो. माझे काकू आले असते तरीही मी असाच वागलो असतो. घरी आलेल्या पाहुण्यांची काळजी घेतली तर यात माझं काय चुकल. सांग बरं"

"तुमचं काहीच चुकलं नाहीये पण.... "

" राधा, तू या गोष्टीकडे स्थळ म्हणून का बघतीय. आणि तुझ्या डोक्यात हाच विचार येतोय की तूला होकारच द्यावे लागेल. त्यामुळे तुला या सगळ्या गोष्टींचे टेन्शन येतय. "

तीच्या डोक्यात हेच चालू होतं त्यामुळे याला हे कसं कळलं म्हणून ती त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती. एकिकडे मनात विचार चालला होता . ह्या माणसाला सगळं कसं कळत. आता मला काय मनात सुध्दा बोलायचं नाही का

" बोलं की मनात. मी कुठे काय म्हणतोय. ?"

परत डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लाघली.

" हे बघ असं बघू नको. तुझ्या डोळ्यात दिसतं तुझ्या मनात काय चाललय ते. फार विचार नको करू. अजून काही प्रश्न आहे का ?"

" हो आहे. आता स्पष्टच बोलते. माझ्याकडून तुम्हाला कोणतेही उत्तर येणार नाही. त्यामुळे तुम्ही वाटं बघू नका.  असं म्हणून ती गप्प बसली. आणि नंदनच्या डोळ्यात बघत होती.

त्याला खूप वाईट वाटलं, त्याच्या डोळ्यातून अश्रु बाहेर आले  पण त्याने न दाखवता तो म्हणाला, " ठिक आहे. तूला नाही ना माझ्याशी लग्न करायचं काही हरकत नाही. आपण मित्र म्हणून राहू. तू पुढेमागे कधी इथे शिकायला आलीस तर आपण एक मित्र म्हणून नक्की भेटू.

तू तुझ्या घरी शांतपणे तुझं मत सांग. आमच्या कडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. "

" हो सांगेन. पण तुम्हाला विचारयचं नाही का मी असं का म्हणाले  ते ?"

त्याला खूप इच्छा होती ते कारण ऐकण्याची पण त्याला माहित होतं आपण तीला समजवत बसू आणि त्या समजवण्याने ती आपलं ऐकून होकार देईल पण तो मनापासून नसेल. मला ती मनापासून माझ्याजवळ यायला पाहिजे. असा विचार होता त्याच्या मनात म्हणून तो नाही म्हणाला पण हे त्याला उघड बोलता येत नव्हते.

त्यामुळे तो एवढचं म्हणाला, " अगं प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. तुला मी नसेल आवडलो.  ठिक आहे तू नको विचार करू. जा झोप जा. तुम्हाला जायचय ना उद्या. जा झोप. "

राधा एकदा त्याच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न करत होता पण तो  तिला काही दिसणार नाही याची काळजी घेत होता.

शेवटी राधा आत निघून गेली पण का कुणास ठाऊक आपण असं पटकन बोलल्याचं तिला दुःख वाटत होतं . सारखी मागे वळून वळून बघत चालली होती. पण त्याने चेहरा नाँर्मल ठेवला होता.

तिला त्याच्या मनात काय चाललय ते कळतच नव्हतं.

ती शेवटी पळत येऊन आईच्या शेजारी आडवी पडली. डोळे मिटायचा प्रयत्न करत होती पण तिला झोप काही लागत नव्हती.

इकडे नंदनने ती गेल्यावर  इतक्यावेळ आडवलेल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. आपल्याला नकार असेल का तिचा ?

किती वेळ तो तिथे बसून होता त्याला कळलेच नाही.  राधाला झोप येत नव्हती म्हणून ती खिडकीतून  त्याला बघत  उभी होती.

पहाटे पहाटे तिला झोप यायला लागली म्हणून ती आई शेजारी येऊन झोपली.  नंदन पण तिथेच बसल्या बसल्या झोपला होता.

सकाळी जेव्हा  रोहन उठून बाहेर आला तर त्याला नंदन बाकड्यावरच झोपलेला दिसला.

त्याच्या चेहरा बघून रोहनला शंका आली की, राधा काहीतरी विचित्र बोलून गेलीय. नंदनचा चेहरा सुकलेला दिसत होता.  त्याला उठवायचं कसं आणि तो उठल्यावर त्याच्यासमोर जायचं कसं असा प्रश्न  पडला .

आधी राधाशी बोलावं मग पुढे सविस्तर बोलूयात असं ठरवून रोहन मागे गेला.

नंदन उठून बाहेरच्या बाहेरचं घरी निघून गेला . जाता जाता त्याने अमोघला फोन.करून सांगितले की तू रोहन आणि त्याच्या परिवाराला सोडायला जा.

त्याने का म्हणून विचारले पण नंदन ने उत्तर द्यायचे टाळून फोन कट करून टाकला.

इकडे राधा उठल्यावर पटापट आवरत होती जेणेकरून नंदन शी परत एकदा बोलता येईल.

ती आवरून खाली आली तर समोर अमोघ बसलेला दिसला. तीने आजूबाजूला नजर फिरवली पण तिला नंदन काही दिसला नाही तेवढ्यात सगळेच आवरून आले त्यामुळे तिने फार लक्ष दिलं नाही

सगळे नाश्ता करायला बसलेले असताना राधाच्या वडिलांनी नंदन राव कुठे गेले हे विचारले

त्यावेळी अमोघ रोहन आणि राधा एकमेकांकडे बघत होतो कोणालाच काहीच अंदाज येत नव्हता शेवटी अमोघच म्हणाला," त्याला एक मीटिंग आहे तो तिकडे गेला आहे. म्हणून मी सोडायला आलो आहे तुमचं झालं की सांगा मग आपण निघू."


नाश्ता करून सगळे आपापल्या आवरायला निघून गेले एक दहा मिनिटात निघायचा असं ठरलं होतं पण रोहन आणि अमोघच्या काहीतरी खानाखुणा चालू होत्या.

राधा नाराज होऊन आवरायला निघून गेली.  बरोबर दहा मिनिटांनी सगळे गावाकडे रवाना झाले.

सगळ्यांच्याच मनात प्रश्न निर्माण करून गेला.
" नंदन असा अचानक कुठे गेला ?"


बघूया पुढच्या भागात काय उत्तर मिळतय प्रत्येकाला .