तूच माझी राधा
भाग ३५
सगळे नाश्ता करायला बसलेले असताना राधाच्या वडिलांनी नंदन राव कुठे गेले हे विचारले
त्यावेळी अमोघ रोहन आणि राधा एकमेकांकडे बघत होतो कोणालाच काहीच अंदाज येत नव्हता शेवटी अमोघच म्हणाला," त्याला एक मीटिंग आहे तो तिकडे गेला आहे. म्हणून मी सोडायला आलो आहे तुमचं झालं की सांगा मग आपण निघू."
नाश्ता करून सगळे आपापल्या आवरायला निघून गेले एक दहा मिनिटात निघायचा असं ठरलं होतं पण रोहन आणि अमोघच्या काहीतरी खानाखुणा चालू होत्या.
राधा नाराज होऊन आवरायला निघून गेली. बरोबर दहा मिनिटांनी सगळे गावाकडे रवाना झाले.
सगळ्यांच्याच मनात प्रश्न निर्माण करून गेला.
" नंदन असा अचानक कुठे गेला ?"
" नंदन असा अचानक कुठे गेला ?"
सगळे तोच विचार करत आपलं आपलं काम करत होते. गाडीत पण बाबा आणि रोहनची तीच चर्चा चालू होती.
" काय रे रोहन, काल तु त्यांच्याशी रात्री बोलत होतास ना ? मग त्यांनी तूला काही सांगितले नाही. "
असं बाबा म्हणताच राधा आणि रोहनने एकमेकांकडे बघितले.
" अहो , बाबा मी काहीच नाही बोललो . त्यांना खरंच काम आले असेल . "
" असेल . "
इकडे नंदन नेहमीच्या ठिकाणी बसला होता . गेलेल्या दोन दिवसांचा विचार करत होता . आपलं काय चुकलं का ? तिने ना नकार दिला ना होकार . मला झुरत ठेवलाय . आता आमच्या नात्याचं काय भविष्य असेल ? सगळ्यांना हे कळलं तर किती वाईट वाटेल . आईला किती अपेक्षा होती ? माझी एवढी का चिडचिड होतीय ? " असं मनात म्हणून त्याने समोरील दगडाला जोरात लाथ मारली .
" का राधा ? का ? असं का केलंस .??????"
काही वेळ तो तसाच वाहणाऱ्या पाण्याला बघत बसला होता . त्याचा फोन वाजत होता पण त्याला कोणत्याही गोष्टीच भान नव्हतं . तो दिवसभर तसाच बसून होता . ना खाल्लं काही ना जगाचा हलला नाही .
अमोघ फोन करून करून वैतागला. पण त्याने उचला नाहीस . शेवटी अमोघ ने प्रिया ला फोन केला . " प्रिया , नंदन कुठे आहे ?"
" मला नाही माहित . का रे काय झालं ?"
" काही नाही . मला सांग काल दिवसभर राधा होकार देणार का नकार देणार का यावर काही बोलली का ?"
" नाही . असं काहीच नाही म्हणाली . नक्की काय झालंय सांगतोस का ?"
" अगं राधा नंदन ला काहीतरी बोलली आहे . कारण नंदन त्यांना सोडायला जाणार होता पण त्याने मला पाठवले .आणि तो आता चार वाजले तरी माझा फोन उचलत नाहीय . नक्की काय झालय ते कळायलाच मार्ग नाहीय म्हणून तुला विचारात होतो . असू दे तू नको काळजी करू मी बघतो . "
तिचा फोन ठेवला तेव्हढ्यात त्याला रोहनचा फोन आला. " हँलो, अमोघ नंदनराव असं कुठे गेले होते सकाळी?"
" नाही माहित. अजून पर्यंत तरी तो मला भेटला नाहीये. तूझं राधाशी काही बोलणं झालं का ?"
" नाही. आम्ही अजून प्रवासातच आहोत. एक दोन तासात पोचू. मला ते भेटले की मेसेज करा. "
" हो करतो. आपण दोन दिवस झाले की मग एकमेकांशी बोलू. तोपर्यंत तू राधाशी बोलून ठेव. मी पण नंदनशी बोलतो. बाय. "
रोहन आणि त्याची फँमिली साधारण सात- साडेसात च्या आसपास घरी पोचले. सगळ्यांच्या डोक्यात नंदन चा विषय काही जात नव्हता.
बाबांनी पोचल्यावर नंदन च्या आईला फोन केला. पोचलो सांगितल्यावर त्यांनी नंदन बद्दल चौकशी केली. पण आईला पण काही माहित नव्हते त्यामुळे त्यांनी पण सांगितले नाही.
यामुळे बाबांना शंका आली ," नक्कीच काहीतरी घडलं आहे पण रोहन आणि नंदन मध्ये का राधा आणि नंदन मध्ये ? काहीच समजत नाहीये. हि आताची पोरं ना नुसता जीवाला घोर लावून ठेवतात.
असेच दिवसामागून दिवस जात होते पण कोणी काहीच बोलत नव्हतं.
४ वर्षानंतर
" अमोद, आज कोणीतरी वकील येणार आहे ना आपल्याकडे कुंजीर सरांच्या केस साठी . कधी येणारेत ?"
" हो येणारेत ना ? अजून अर्धा तास अवकाश आहे . तुला माहितीय कोणीतरी मॅडम आहेत म्हणे . "
" हो का . आपल्याला काय करायचे आहे . आपल्याला फक्त त्यांना माहिती पुरवायची आहे . "
" पण मी काय म्हणतो , " तिच्याकडे तरी जरा बघ . नाहीतर बाकीच्या मुलींकडे बघून न बघितल्या सारखं करतोस . मग एकपण तुला पटत नाही . ( हळूच पुटपुटला ) तुझ्यामुळे माझे पण लग्न होत नाही . "
" काही म्हणालास का ?"
" नाही . मी जातो माझ्या केबिन मध्ये मला काम आहे . "
अमोद गेल्यावर नंदन विचार करत होता . खरंच आपल्यामुळे ह्यांचं लग्न राहिले आहे का . आपण घरी जाऊन आईशी बोलूया . माझ्यामुळे त्या दोघांना कशाला त्रास . ते तरी सुखी आयुष्य जगातील . आपल्या नशिबी काय आहे काय माहित ?
पण असं काय झालं असेल कि तिने काहीच का उत्तर दिले नसेल. स्पष्ट तरी बोलायचं ना पण नाही . या बायकांना समजणं खरच अवघड आहे . जाऊदे आपलं काम बरं आणि आपण बरं ."
*******
" हॅलो , कुंजीर सर आपल्याला आज भेटायचं आहे ना ? आहे का लक्ष्यात "
" हो हो आहे . मी तुमचीच वाट बघतोय ? "
" मी निघतीय . तुम्ही त्यांच्या ऑफिसपाशीच या . मी पण तिथे येते . "
" चालेल . मॅडम . मी येतो तिथे . "
कुणास ठाऊक पण मन चलबिचल होत होती . ती फोन ठेवून निघते . गाडीत बसल्या बसल्या जिथे जायचंय त्याचा पत्ता वाचत होती . तर त्यावर फक्त 'N & A ' एवढंच लिहिलं होत . पण का कुणास ठाऊक . आज तिला पहिल्यांदा बैचेन होत होतं . आज काहीतरी आपल्या बाबतीत घडणार असं सारखं वाटत होत. शेवटी तिने विचार करायचा सोडून डोळे मिटून मागे टेकून बसली होती . मनात विचार चालूच होता .
ड्राइव्हवर आरश्यातुन बघत होता. त्या कधी असं शांत बसत नाही त्यामुळे त्याने विचारले , " ताई , आज बरं वाटत नाहीये का ? आपण घरी जाऊया का परत ?"
" नको दादा . मला बरं वाटतंय . आपण जाऊया . माझी वाट बघत असतील . "
त्याने मानेनेच होकार कळवळा . आणि शांतपणे गाडी चालवू लागला .
इकडे आमोद विचार करत होता , " यावर राधा हे नाव आहे . हि राधा नक्की कोण आहे ? हि नंदनचीच राधा असेल का ? तीच असेल तर नंदन काय करेल . ? देवा , जर तीच असेल तर त्यांचे मार्गी लागू दे रे बाबा . म्हणजे माझा मार्ग मोकळा होईल . " तेव्हाढ्यात आमोद चा फोन वाजला आणि तो बोलत बोलत निघून गेला .
नंदन पण डोळे मिटून विचार करत होता . " राधा, का ग उत्तर दिलं नाहीस. अजून पण मी तुझीच वाट बघतोय ग ? कधी येशील ? . कोणाशी तरी बोलली असतीस तरी चाललं असतं ग ." डोळे मिटून शांत बसून होता
बघूया पुढच्या भागात दोघे समोरासमोर आल्यावर काय होतंय ते ?
खरचं माफ करा . तुम्हाला खूप वाट बघावी लागली . यापुढे नक्की तुम्हाला लवकर भाग टाकून खुश करायचा प्रयत्न करेन . खरचं खरचं माफ करा .
क्रमशः
©®सौ. चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा