Login

तूच माझी राधा भाग ३६

Ek Prem Katha
तूच माझी राधा

भाग ३६

इकडे आमोद विचार करत होता , " यावर राधा हे नाव आहे . हि राधा नक्की कोण आहे ?  हि नंदनचीच राधा असेल का ?  तीच असेल तर नंदन काय करेल . ?  देवा , जर तीच असेल तर त्यांचे मार्गी लागू दे रे बाबा . म्हणजे माझा मार्ग मोकळा होईल . " तेव्हाढ्यात आमोद चा फोन वाजला आणि तो बोलत बोलत निघून गेला .

नंदन पण डोळे मिटून विचार करत होता . " राधा, का ग उत्तर दिलं नाहीस. अजून पण मी तुझीच वाट बघतोय ग ? कधी येशील ? . कोणाशी तरी बोलली असतीस तरी चाललं असतं ग ." डोळे मिटून शांत बसून होता

तेवढ्यात दारावर टक् टक् आवाज झाला अन् नंदन भानावर आला.  स्वतःला शांत करून सावरून म्हणाला, " कमिंग. "

अमोद आत आला .  नंदन ने डोळ्यांनीच विचारले  'काय ?'

अमोद म्हणाला ,  "ह्या कुंजीर सरांच्या फाईल आणल्या आहेत. तू एकदा बघून घे .  ते कधीही येतील . " असं म्हणून त्याने फाईल त्याच्या समोर ठेवल्या आणि त्याच्याशेजारी दुसरी खुर्ची घेऊन बसला .

नंदन फाईल बघत होता आणि आमोद मागच्या विचारातच बसला होता . नंदन सगळे विचार झटकून फाईल बघत होता . त्यांचे काम नको अडकायला तेवढंच विचार घोळत होता . सगळे विचार तिने मागे सारून दिली होती .

तेवढ्यात काय झालं काय माहित पण त्याचं  हृदय धडधडायला लागलं होतं .  मन बैचेन झालं होतं . त्याला स्वतःलाच कळतं नव्हतं असं काय होतंय तेव्हढ्यात फोन वाजला .

अमोद फोन उचलून बोलायला लागला तरी ह्याच लक्षचं नव्हतं .  आमोदचं बोलून झालं आणि तो नंदनला म्हणाला , " कुंजीर सर आणि मॅडम आल्या आहेत "

त्यावर नंदन ची काहीच प्रतिक्रिया नव्हती म्हणून आमोद त्याच्याकडे बघू लागला  त्याने त्याच्यासमोर दोन तीन वेळा हात हलवून बघितलं तरी त्याच काही लक्षच नव्हतं .  तो त्याला हलवायला जाणार तेवढ्यात केबिनचे दार वाजले .

तरी ह्याचे लक्ष नाही असं बघून त्याने त्याला हाताने हलवून भानावर आणले .  आणि दाराकडे बघून  'कमिंग ' म्हणाला .

पहिल्यांदा कुंजीर सर आत आले . नंदन समोर बसून त्यांनी बोलायला सुरवात केली . केसं बद्दल थोडक्यात सांगून म्हणाले की , " माझ्याबरोबर राधा मॅडम आल्यात त्यांच्या प्रश्नांचीची उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो . "

" हो नक्कीच . मी माझ्याकडून जेव्हढी मदत होईल तेव्हढी नक्की करेन . "

" धन्यवाद . मी त्यांना घेऊन येतो . "


नंदनने मानेने होकार कळवला .

तो होकार  बघून कुंजीर सर राधा मॅडम ना बोलवायला गेले .

इकडे दोघांचे चेहरे बदलले . नंदन ची धडधड वाढतच होती . काही केला शांत होत नव्हती . त्याला काय करावं कळतंच नव्हतं .  अमोदचा पण चेहरा उतरला होता . त्याला सारखी शंका येत होती हि राधा नक्की कोण आहे ? दोघेही आपल्या आपल्या विचारात होते .  त्यामुळे दोघांनाही कळलं नाही ते दोघे कधी आत आले .

कुंजीर सरांनी घसा खाकरला तेंव्हा दोघांनी समोर पहिले .  आणि उभेच राहिले . नंदन ला मनातून खूप आनंद झाला होता पण त्याने तसे चेहऱ्यावर दाखवले नाही .   अमोद पटकन बोलायला जाणार तेवढ्यात नंदन म्हणाला , " या बसा . "

" नमस्कार . अँड. राधा . "

" नमस्कार , मी नंदन आणि हा अमोद . आम्ही दोघेही सरांचे अकाऊंट बघतो . "

यांनतर एक शांतता पसरली होती .  कोणीच काही बोलत नव्हतं . तिघांनाही काय बोलावं हेच कळत नव्हतं . 

नंदनला प्रश्न पडला होता , " हि आपल्याला खरच  विसरली का ? "

इकडे राधा चेहऱ्यावरून तरी शांत दाखवतं होती. तिच्या मनात चालेली चलबिचल दिसू नये एवढाच तिचा प्रयत्न .

आणि अमोद एकदा नंदन कडे तर एकदा राधा कडे बघत होता . हे खरंच एकमेकांना ओळखत नाही . राधा इथे कशी ? हि पुण्यात कधी आली ? हिची सगळी माहिती मलाच काढावी लागणार . आता हे काम पूर्ण करू मग नंतर ह्या दोघांकडे . असं मनाशी ठरवून अमोद बोलला , " मॅडम , तुम्हाला आमच्याकडून काय माहिती हवी होती ?"

अमोदचा आवाज ऐकून दोघंही भानावर आले. त्यानंतर राधा काहीच झालं नाही असं दाखवून तिने बोलायला सुरवात केली , " मि . नंदन मला यांच्या बँकांचे आणि एकंदरीत सगळ्या आर्थिक व्यवहाराची माहिती हवी होती? "

" या ४ फाईल मध्ये आहे ."

" यात अशी कोणती रक्कम दिसतीय का त्यावर प्रस्न उद्भवेल ?"

" आधी एक दोन रक्कमा होत्या पण त्यानांच त्याची  बिले सापडल्यामुळे काही वाटलं नाही . "

यावर कोणीच काही बोललं नाही . राधा सगळ्या फाईल बघत होती .  प्रत्येक पान  अन पान ती शांत पाने वाचत होती . कुंजीर सर तर फक्त आलेला घाम पुसायचा काम करत होते अन एकदा फाईल कडे तर एकदा राधा मॅडम कडे बघत होते .

नंदन फक्त तिचं निरीक्षण करण्यात मग्न होता .  अमोद त्यांना सगळी माहिती देत होता.  तेवढ्यात कुंजीर सरांना एक फोन आला म्हणून ते मी जातो असं सांगून निघून गेले . आता तिथे फक्त हे तिघेच उरले होते .

अमोद आणि राधा  कामात मग्न होते. ती खूप बारीक बारीक चौकशी करत होती .  अमोद पण तिला हवे ते सगळं पुरवत होता . मध्येच अमोद ला काय वाटलं काय माहित पण तो म्हणाला , " मॅडम , मी आपल्यासाठी कॉफी आणतो . तो प्रयन्त  तुम्ही दोघे बोला . " असं म्हंटल्यावर नंदन आणि राधा एकदम दोघेही डोळे मोठे करून अमोद कडे बघू  लागले .

" अरे म्हणजे , तुम्ही पुढचं काम बघा , मी आपल्यासाठी कॉफी घेउन येतो . "

दोघांनी मानेनेच होकार कळवला .

अमोद बाहेर गेला आणि लगेच एक फोन लावला .  " हॅलो , तू कुठे आहेस ? आताच्या आता ऑफिस मध्ये ये ?"

" पण काय झालाय ?"

" आल्यावर सांगतो. लगेच निघ . " असं म्हणून अमोदने फोन ठेवून दिला आणि कॉफी आणायला गेला .

बघूया पुढच्या भागात अमोद ने कोणाला बोलावलं ?

राधा आणि नंदन काय बोलतील असं तुम्हाला वाटतं ?

नक्की प्रतिक्रिया द्या .