Login

तूच माझी राधा भाग ३७

छोटीशी प्रेमकथा
तूच माझी राधा

भाग ३७

अमोद आणि राधा  कामात मग्न होते. ती खूप बारीक बारीक चौकशी करत होती .  अमोद पण तिला हवे ते सगळं पुरवत होता . मध्येच अमोद ला काय वाटलं काय माहित पण तो म्हणाला , " मॅडम , मी आपल्यासाठी कॉफी आणतो . तोपर्यंत  तुम्ही दोघे बोला . " असं म्हंटल्यावर नंदन आणि राधा एकदम दोघेही डोळे मोठे करून अमोद कडे बघू  लागले .

" अरे म्हणजे , तुम्ही पुढचं काम बघा , मी आपल्यासाठी कॉफी घेऊन  येतो . "

दोघांनी मानेनेच होकार कळवला .

अमोद बाहेर गेला आणि लगेच एक फोन लावला .  " हॅलो , तू कुठे आहेस ? "

" कॉलेज मध्ये . का ? "

" आताच्या आता ऑफिस मध्ये ये ?"

"  पण काय झालाय ?"

" आल्यावर सांगतो. लगेच निघ . " असं म्हणून अमोदने फोन ठेवून दिला आणि कॉफी आणायला गेला .

अमोदच्या मानत खूप प्रश्न होते . त्याचा विचार करूनहि उत्तर मिळत नव्हती .  त्या विचारातच त्याने कॉफी बनवायला सांगितली . आणि तो तिथेच बसून विचार करायला लागतो .

इकडे दोघेही बराच वेळ शांत बसून होते . कोण आधी बोलतोय याची वाट बघत होते .

शेवटी हि काही बोलणारच नाही आपणच बोलूया असा विचार करून त्याने  आवाज दिला , " राधा "

अन तिने लगेच डोळे मिटून घेतले . तिच्या मनात आले किती दिवस झाले या हाकेसाठी कान आसुसलेले होते . आज खरंच पूर्ण झालं .

आणि नंदन ची हि अवस्था काही वेगळी नव्हती . त्याने ' राधा '  असा आवाज दिला ना तेंव्हाच  त्याची धडधड वाढली होती .  ती धडधड बहुतेक तिचा आवाज ऐकूनच शांत होईल असं वाटल्यामुळे त्याने पुन्हा " राधा " आवाज दिला .

यावेळेला ती भानावर आली आणि फक्त डोळे वर करून त्याच्याकडे बघायला लागली .

" अगं मी विचारात होतो कि तू पुण्यात कधी आली ?"

" झाले ४ वर्ष मी पुण्यातच आहे . "

" काय ? ४ वर्ष ?" जोरातच नंदन ओरडला .

" तू मग काहीच संपर्क नाही केला ?"

" नाही केला . "

" अगं तेच विचारतोय का नाही केला ?"

" या विषयावर बोलून काही उपयोग नाही . माझं काम झालय मी निघते आता "

" अगं थांब . " 

तिने डोळेच मोठे केलं आणि हा बघतच राहिला . मग भानावर येऊन म्हणाला , " अगं अमोद  कॉफी आणतोय तर थांब . असं म्हणत होतो . "

तिने फक्त मानेनेच होकार कळवला आणि ती पुन्हा फाईल वाचू लागली . मग नंदन हि शांत बसून आपलं काम करू लागला .

राधा विचार करत होती , " खरंच नंदन च लग्न झालं असेल का ? आपल्याला जो फोन आला होता तसेच असेल का ?  आपण इतके दिवस लांब राहिलो पण आता ? याला आपल्याबद्दल काही वाटत असेल का ?" मध्येच तिचे लक्ष समोर जाते . तर तो लॅपटॉप मध्ये खूप एकाग्र होऊन काम करत होता .

" आता तर तो जास्तीच हँडसम दिसायला लागला आहे . त्याच्या घाऱ्या डोळ्यात विसरून जाते स्वतःला त्यामुळे मी अजूनही त्याच्याकडे बघायला घाबरते . आपल्या डोळ्यात काही दिसू नये म्हणून तिने त्याकडे न बघण्याचा निर्णय घेतला. आता आपल्याला जरा जपूनच राहावं लागेल . "

तेवढ्यात प्रिया कॉफी घेऊन ओरडत आत आली , " अरे दादा , कोण आले आहे रे  आपल्या ऑफिस मध्ये ?"  असं म्हणतच ती दादाच्या समोरच उभी राहिली . तिच्यामागे अमोद उभा होता .

नंदन अमोद कडे बघतच प्रियाशी बोलला , " तू कधी आली ? आणि तुला कोणी सांगितलं ग हे सगळं ?"

"  ते जाऊदे . मला सांग तरी "

सगळा गोंधळ बघून राधा च म्हणाली , " हाय प्रिया ."

तिला आवाज ओळखीचा वाटलं पण तिला आठवेना म्हणून तिने विचार करत तशी थांबली .

ती तशीच थांबलेली दिसल्यावर राधा ने पुन्हा आवाज दिला , " प्रिया "

या आवाजावर ती भानावर येऊन तिने राधा कडे बघितलं अन जोरात ओरडली , " राधा , तू ?"  लगेच तिच्या जवळ जाऊन तिला मिठीच मारली .  या मिठीत काय नव्हतं प्रेम, दुरावा अन तू परत येशील असा विश्वास . "

नंदन च्या मनात विचार आला , ' जशी प्रियाने तिला मिठी मारलीय ती मला पण मारता आली असती तर मी पण तिला दाखवू शकलो असतो आज ही मी तुझीच वाट बघतोय . पण .... '

राधा च्या मनात विचार आला , " आता जर आपण इथे थांबलो तर सगळे मिळून मला विचारतील  आणि मी आता काहीच सांगू शकत नाही . आपण इथून निघूयाच ."

" प्रिया मी आता निघते . मला खरंच खूप काम आहे आणि माझे सर पण वाट बघत असतील . "

" अगं थांब . "

" नको . मला खूप उशीर झालंय . " असं म्हणून ती निघून पण गेली .  तिघेही तिच्याकडे बघतच राहिले . 

प्रिया म्हणाली , " हि मी आले तर अशी का निघून गेली . दादा , तुमच्यात काही झाली का ?"

" आमच्यात काहीच नाही झालं . मी तर तिला काहीच नाही बोललो . "

तिघांच्या मनात हि अशी का गेली ? याची शंका निर्माण झाली .  हिच्या मनात काय चालू आहे ?  विचारातच ते तिघेही खुर्चीवर बसून कॉफी घेतली तरी त्यांना कळली नाही .

शेवटी प्रिया म्हणाली , " आता तू काय करणारेस दादा ?"

  मी काय करणार या अविर्भावात तो दोंघांकडे बघू लागला  अन म्हणाला , " तुम्ही पण सोडून द्या विषय ती फक्त तिचं काम करायला आली होती हे लक्षात घ्या . आणि आपल्या कामाला लागा .  " असं म्हणून तो लॅपटॉप वर काम करू लागला . अमोद आणि प्रिया एकमेकांकडे बघून आता काय ? अमोद डोळ्यांनीच प्रियाला म्हणतो , " आपण बाहेर जाऊया . "

एकदा प्रिया नंदन कडे बघून बाहेर आली .

बघूया पुढच्या भागात अमोद आणि प्रिया काय करताय ते ?