तूच माझी राधा
भाग ३८
प्रिया म्हणाली , " आता तू काय करणारेस दादा ?"
मी काय करणार या अविर्भावात तो दोंघांकडे बघू लागला अन म्हणाला , " तुम्ही पण सोडून द्या विषय ती फक्त तिचं काम करायला आली होती हे लक्षात घ्या . आणि आपल्या कामाला लागा . " असं म्हणून तो लॅपटॉप वर काम करू लागला . अमोद आणि प्रिया एकमेकांकडे बघून आता काय ? अमोद डोळ्यांनीच प्रियाला म्हणतो , " आपण बाहेर जाऊया . "
एकदा प्रिया नंदन कडे बघून बाहेर आली .
बाहेर आल्या आल्या अमोद म्हणाला , " चल आपण बाहेर जाऊया कॉफी घ्यायला . "
" अरे पण , दादा ?"
" त्याला निवांत आणि थोड्यावेळ एकटा राहूदे . त्याच्या मनात चालेला गोंधळ थोडा शांत होऊ दे . तोपर्यंत आपण जाऊ येऊ . "
" चालेल . चल जाऊ . "
दोघेही बाहेर येऊन एका कॅफेत बसले होते. कॉफी येईपर्यंत दोघेही विचार करत होते . आता पुढे काय ?
दोघेही बाहेर येऊन एका कॅफेत बसले होते. कॉफी येईपर्यंत दोघेही विचार करत होते . आता पुढे काय ?
प्रिया म्हणाली , " अमोद , दादा हिच्यासाठी अजून थांबलाय पण हिचे लग्न झाले असेल तर ?" किंवा तिला दुसरे कोणी आवडतं असेल तर ?"
" ऐ बाई , असं काही म्हणू नको . असं असेल ना आपलं काही लग्न होत नसतं . "
" तुला फक्त आपलं च पडलंय . बिचारा माझा दादा "
" काही बिचारा वगैरे काहींनाही . "
प्रिया ने लगेच त्याला फटका मारला .
" मारते काय . खरे तेच बोलतोय . त्याच वेळेला काय झाल ते सांगितले असते तर आता हि वेळ आली नसती . आता काही तरी करावे लागेल . "
तेवढ्यात प्रियाचा फोन वाजला , " हॅलो , आई बोल ना काय झालं ."
" अगं मी ,मावशी आणि दोन मैत्रिणी बाहेर फिरायला जायचं ठरवतोय तर आम्हाला एखादी जागा बघून देतेस का ?"
" हो देते कि . तू दादाला सांगितलं का ?"
" आधी माझं ठरलं ना सगळं कि मी सांगते मग तो नाही म्हणार नाही . "
" बरं ठीक आहे . मी बघते आणि सांगते . मी घरीच येणार आहे आता तर घरी आल्यावर बोलू . ठेऊ फोन ."
" बरं चालेल . तू आताच नंदन ला काही सांगू नको . "
" हो . बाय "
" काय ग काय झाले . नंदन ला काय सांगू नको ?"
" अरे काही नाही . आईला, मावशीला फिरायला जायचंय तर कुठे ते आताच नको सांगू म्हणत होती ."
" हो का . त्या कुठे चाललेत ?"
" ते मलाच बघायला सांगितलं आहे ."
कॉफी आणि सँडविच आले म्हणून दोघेही खाऊ लागले .
इकडे राधा तिथून बाहेर पडली . मनात खूप चलबिचल चालू होती . मान शांत करायची गरज होती . या विचारामुळे काम काही होणारच नव्हतं . म्हणून तिने सरांना फोन करून मी आज येत नाही असं सांगून ती नेहमीच्या ठिकणी जाऊन बसली .
ती येऊन तर तळ्याच्या काठी बसली होती . पाण्यावर शांत पणे एक बदकांची जोडी फिरत होती . ती टक लाऊन त्या जोडीलाच बघत होती . बघता बघता तिच्या मनात विचार आपण काय काय स्वप्न रंगवली होती . मी आणि नंदन असेच फिरू पण हे काय होऊन बसलं आहे .
का त्याचा विचार जात नाहीय माझ्या मनातून . मी किती स्वतःला सावरलं होतो आणि आज तो माझ्या समोर आला आता कशी सावरू . तो दिसला ना तेंव्हा जाऊन त्याला जोरात मिठी मारावी वाटत होती .
पण ......
आज खूप दिवसांनी तिने डोळ्यातील आसवंना वाट मोकळी करून दिली होती .
नंदन पण सगळे निघून गेल्यावर डोळे मिटून शांत बसला होता . मनातच आला , " काय झालं होतं राधा . त्यावेळी खरं ते सांगितलं असत तर आज असे अनोखी नसतो एकमेकांना . मी अजून हि तुझीच वाट बघतोय ग . एकदा बोल माझ्याशी आपण मार्ग काढू की . "
तुझ्याकडे पण बघून वाटत होतं तुला पण अजून त्रास होतो आहे . मग आता तरी बोल ग .
एक मन म्हणताय , ' तिनेच का बोलायचे . तू पण बोलू शकतोस की ?"
दुसरं मन , " ह्याने का बोलायचं . ह्याने अधीच सांगितलं होत कि हा लग्नाला तयार आहे मग तिनेच बोलायला पाहिजे . "
" ह्याने सांगितलं असलं तरी आता परत बोलला तर काय होणार आहे ?"
" चल तुझ्या म्हणण्या प्रमाणे हा बोलेल पण ती काहीच बोलली नाही आणि तिचे लग्न झाले असेल तर . "
" त्यासाठी आधी बोलावे लागेल ना . हा असा शांत बसून राहिला तर . "
या दोन मनामध्ये नंदन पार गोंधळून गेला होता . तो जोरात ओरडला ' बास करा '
आणि एकदम भानावर आला आपण ऑफिस मध्ये आहे याची जाणीव झाली . जाऊदे आपण सध्या काम करू . कामाला लागला .
ह्या दोघांची कॉफी पिऊन प्रिया घरी तर हा ऑफिस मध्ये यायला निघाला . प्रियाला काहीतरी आठवलं म्हणून तिने अमोद ला आवाज दिला , " ऐक ना , आपण आई ला फिरायला राधा च्या रिसॉर्ट वर पाठवलं तर . "
" हा मग पाठव कि . " तो आपला सहज बोलला .
" अरे तुझ्या लक्षात येतंय का ?"
" काय "
" आपण आईला तिथे पाठवू. आणि राधाची काही माहिती मिळतीय का ते बघता येईल . "
" अरे हो खरंच की . माझ्या नाही लक्षात आलं . तू एक काम कर . मी तिच्या दादाचा नंबर देतो तू फोन करून विचार . मग ठरलं ना की पुढे काय करायचे ते ठरवू . "
" चालेल . आता मी घरी जाते . आपण तुझे ऑफिस नंतर भेटू . मग ठरवू . आणि तेंव्हाच फोन करू . "
" हो चालेल . मी जातो . नंदन ओरडेल कुठे गेला होता म्हणून . "
अमोद येऊन सरळ नंदनच्या केबिन मध्ये गेला तर तो काहीच झाली नाही या अविर्भावात काम करत होता . अमोद तर डोळे फाडून बघत होता . दाराचा आवाज आला म्हणून त्याने वर बघितलं तर अमोद त्याच्याकडे डोळे मोठे करून बघताना दिसला .
नंदन म्हणाला , " अमोद , काय झालं ? असं का बघतोय ?"
" काहीच नाही. मला वाटलं तुझा मन लागत नसेल तर तू तर असं काम करतोय जसं काही आता इथे काहीच घडलं नाही . "
" मग इथे असं काय घडलंय कि आपली काम सोडून बसू . "
अमोद नंदनचा चेहरा बघत होता पण त्याच्या चेहऱ्यावरून तरी काही अंदाज लावता येत नव्हता . म्हणून तो गप्प काम करत बसला होता .
दोघांच्या कामात लक्ष नव्हतं पण ते चेहऱ्यावरून दाखवतं नव्हते .
काम करता करता कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही . ६ वाजता दोघेही घरी जायला निघाले . नेहमीप्रमाणे दोघांना एकमेकांबरोबर जायचे नव्हते . त्यामुळे काय करायचं याचा विचार करत बसले होते .
जवळ जवळ अर्ध्या तासाने नंदन म्हणाला , " मला जरा बाहेर जायचंय तर तू आज तुझा तू जा . "
अमोदला पण जायच होत त्यामुळे त्याला काहीच प्रश्न विचारले नाही . तो पण लगेच गेला . नंदन ला आश्चर्य वाटलं पण तो काहीच बोलला नाही . तो पण लगेच निघाला .
तो निघून आज जिथे ४ वर्षांपूर्वी राधा बोलली तेंव्हा दिवसभर जाऊन बसला होता तिथेच आला होता .
बघूया पुढच्या भागात काय होतंय ते ?
क्रमश :
सौ . चित्रा अ. महाराव
सौ . चित्रा अ. महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा