Login

तूच माझी राधा भाग ३९

तिच्याशी साठी चाललेली धडपड
तूच माझी राधा

भाग ३९


काम करता करता कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही . ६ वाजता दोघेही घरी जायला निघाले . नेहमीप्रमाणे दोघांना एकमेकांबरोबर जायचे नव्हते . त्यामुळे काय करायचं याचा विचार करत बसले होते .

जवळ जवळ अर्ध्या तासाने नंदन म्हणाला , " मला जरा बाहेर जायचंय तर तू आज तुझा तू जा . "

अमोदला  पण जायच होत त्यामुळे त्याला काहीच प्रश्न विचारले नाही . तो पण लगेच गेला . नंदन ला आश्चर्य वाटलं पण तो काहीच बोलला नाही . तो पण लगेच निघाला .

तो निघून आज जिथे ४ वर्षांपूर्वी राधा बोलली तेंव्हा दिवसभर जाऊन बसला होता तिथेच आला होता .

तळजाई च्या टेकडी वरून सूर्यास्त बघत होता . त्याच्या मनात विचार आला , ' सूर्य चालला तसं राधा पण जाणार का ? आज पर्यंत मी फक्त या आशेवर होता तो जसा उद्या परत उगवणार तसं राधा कधी ना कधी माझ्याकडे येईल पण आज तर तिने मला ओळखच नाही दाखवली . छातीवर बोट ठेऊन म्हणाला इथे आज मला खूप दुखलं . काय करू राधा म्हणजे माझी होशील ग . ?

खूप वेळ तसाच सूर्याकडे बघून डोळ्यातून आसवांना वाट करून देतो . किती वेळ झाला ते त्याला कळलेच नाही.

फोनच्या आवाजाने तो भानावर आला .

" हॅलो "

" हॅलो , मी श्रीकांत बोलतोय . आपण आज रात्री भेटतोय नेहमीच्या कॅफेवर . "

" मला नाही जमणार . मी जरा बाहेर आलोय . बाय " त्याने पुढचं काही ऐकायला नको म्हणून लगेच फोनच ठेवून दिला .

अरे हा असा काय आहे .  थांब मी अमोद ला सांगतो  म्हणजे तो घेऊन येईल . असं मनात म्हणून त्याने अमोद ला फोन लावला सुद्धा .

" हॅलो अमोद ."

" हॅलो , बोल श्रीकांत ."

" आज आपण नेहमीच्या ठिकाणी भेटतोय . मी नंदनला फोने केला होता पण तो नाही जमणार म्हणाला . तर तू त्याला घेउन ये . "

" अरे मला पण आज नाही जमणार आपण उद्या भेटू . "

" अरे पण ..... "

या दोघांचं चाललंय काय ? जाऊदे आत्ता उद्याच बघू .

श्रीकांत आपल्या कामाला निघून गेला .


प्रिया आणि अमोद नेहमीच्याठिकाणी  होते .

" आता काय करायचं " दोघेही एकदम म्हणाले .

अमोद लगेच खुश झाला , अन लाडात येऊन म्हणाला , " प्रिया , आपलं किती छान जुळतं ना ?"

" ओ साहेब , पृथ्वीवर या . आता आपण आपल्याबद्दल नाही तर दादा आणि राधा बद्दल बोलायला आलो आहे . "  

" अरे हो की . थांब विचार करूया पुढे काय करता येईल . "

" आपण तिच्या ओळखीचे शोधूयात का तिच्या ऑफिस मध्ये जाऊन ."

" नको . उगाच नंदन ला कळलं तर . त्यापेक्षा आपण त्याच्या भावाला फोन करून विचारू . "

" हो चालेल . अशी हि आपल्याला काकूंसाठी चौकशी करायची आहेच ना ?"

" हो . मी फोन लावते .  "

दोघांनी एकमेकांकडे बघून मनात देवाचा धावा करत फोन लावला

" हॅलो , रोहन का ?"

" हो रोहन बोलतोय . "

" मला तुमच्या रिसॉर्ट बद्दल चौकशी करायची होती . "

" हो. तुम्हाला कधी किती जणांसाठी हवी आहे ?"

त्यांचं सगळं सविस्तर बोलणं झालं. आणि शेवटी रोहन म्हणाला , " तुमचं ठरलं कि सांगा. ठेऊ फोन ?"

" नको ."

" म्हणजे ?"

" हॅलो रोहन , मी अमोद बोलतोय . नंदन चा मित्र . आठवलं का ?"

" अरे हो आठवलं बोल की ."

अमोद अडखळत अडखळत म्हणाला , " मी ... म्हणजे मला ..... "

" अमोद , काय झालय .? नंदन ला काही झाली का ?"

" नाही नाही ... ते ... "

" अमोद , जे काय असेल ते बोल "

" अरे , आज ना सकाळी राधा आमच्या ऑफिस मध्ये एका कामासाठी आली होती . "

" मग "

" ती अचानक आली त्यामुळे  आम्हाला काही प्रश्न पडलेत ?"

" हो मला मिठीत आहे ती आलेली . मला सकाळीच राधाने सांगितलं ."

" हो का . मला तुला विचारायचं होत कि ... "

" ऐक . मी उद्या येतोय . राधाने पण मला बोलावलं आहे . मग समोरासमोर बोलू . "

" चालेल. हे योग्य राहील . "

" मी आधी राधाशी बोलतो . मग तुम्हाला भेटतो ."

मध्येच प्रिया म्हणाली , " दादा , ते राधाचं लग्न झालाय का ?"

" नाही. "

हे उत्तर ऐकून दोघांनी रोखून धरलेला श्वास सोडलेलं.

" चालेल . दादा . तुम्ही उद्या आल्यावर आपण नक्की भेटू. "

" रोहन , मी तुला दुपारी फोन करतो . बाय "

" हो चालेल. बाय "

रोहन ने जसा फोन  ठेवला . तसे बाबा म्हणाले , " काय झालं कोणाचा फोन होता ?"

" अहो . चौकशी साठी फोन होता ?"

" हो का मग तू तर उद्या पुण्याला चाललायस तर कोणाला भेटू म्हणत होता ?"

" अहो उद्या मी नाही कोणाला भेटत . ती लोकं पुढच्या आठवड्यात येणारेत तर तेंव्हा भेटू म्हणालो . "

" अच्छा . तू उद्या राधाकडे जाणारेस तर तिला परत एकदा समजावं लग्नाचं . "

" हो बोलतो . "

दोघेही आपापल्या विचारात कामाला निघून गेले .

इकडे दोघांना राधाचं लग्न झालं नाही ऐकून खुप बरं वाटलं . पण आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार . यासाठी  दोघेही विचार करू लागले .


नंदन खूप अंधार पडलाय आता घरी जायला पाहिजे असा विचार करून निघण्यासाठी उठला . थोडा पुढे आला तर त्याला अमोदचा  फोन आला .

" हॅलो . कुठे आहेस ?"

" घरी चाललोय . "

" तुझा आवाज असा का येतोय ? काय झालं ?"

" काही नाही . दमलोय . तू बोल का फोन केला होता ?"

" काही खास नाही . तू घरी गेलास का ते विचारायला फोन केला होता . "

" नको काळजी करू. मी ठीक आहे . घरीच चाललो आहे . भेटू उद्या "

" हो सावकाश जा. भेटू "

दोघांनी फोन ठेवला. नंदन घरी निघाला

अमोद  प्रियाला म्हणाला , " नंदन घरीच येतोय . तू पण घरी जा . आणि बोल त्याच्याशी . "

" चालेल . बाय "

सगळे सगळे आपापल्या विचारात घरी गेले .

बघूया पुढच्या भागात काय होतंय ते ?