Login

तूच माझी राधा भाग ३

तीच्या आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट
तूच माझी राधा

भाग ३

मागील भागात आपण पाहिले की नंदने अमोदचं सहलीला न येण्याचे कारण शोधण्यासाठी त्याच्या आईला फोन केला होता.

आता पुढे

"बोला अमोद सर.  आता आपलं काय म्हणणं आहे. " नंदन म्हणाला.

याला जर मी येत नाही असं म्हटलं तर खरं कारण शोधून काढेल. हा इकडे जीव घेणार आणि ती मी गेलो म्हणून जीव घेणार . देवा वाचव रे. शेवटी मनातच हार मानून अमोद म्हणाला, " मी येतोय तुमच्या बरोबर. "

" आता कसं बरोबर बोलास. चार वाजता सगळ्यांना फोन करू आणि पुढचं ठरवू. "

" बरं. आता जरा काम करायला जातो. तुझं चालू दे काम" असं म्हणून अमोद बाहेर गेला.

इकडे राधा आणि रोहन घरी आले तर बाबा आलेच होते. त्यांना बघून बाबा म्हणाले.," काय रे झाली का सगळी काम ? "

" हो झाली ना. आज तुमच्या लाडकीने उद्योग केलाय ?"

" काय उद्योग केलाय? लागलय का कुठे? "

" अहो बाबा, नाही लागलं. मी व्यवस्थित आहे  पण ते ... ते... "

" ते काय बोल आता?" आई आतून बाहेर येत येतचं म्हणाली.

" अगं आई, ते ... ते... "

"बोल बाई पटकन. उगाच जीवाला घोर. "

वातावरण बघून रोहनच म्हणाला, " अग ते परवा येणारेत ना नंदन सर त्यांना मी फोन केला होता पण त्यांनी उचलला नाही. पण थोड्यावेळाने त्यांचा फोन आला आणि तो फोन हिने उचला. आता सांग ग पुढचं "

"तर मी त्या फोनवर ..... ....... "

असं म्हणून घडलेलं सगळं तिने आई बाबांना सांगितले. आई पटकन म्हणाली, " अगं किती वेळा सांगितले जरा जपून बोलत जा. पण नाही आईचं ऐकायचचं नसतं. " बाबांकडे बघून म्हणाली, " घ्या अजून तीची बाजू. करा लाड " असं म्हणून आई चिडचिड करतच घरात निघून गेली. रोहन पण निघून गेला आवरायला.

बाबा म्हणाले, " बाळा , जरा जपून , पुढच्याच ऐकून मग बोलावे. पुढच्या वेळी काळजी घ्या. जा आता आवर आणि आईला स्वयंपाकात मदत करं. " मानाने होकार दर्शवत राधा घरात निघून गेली.

राधा आवरून आईला म्हणाली," दे मी पोळ्या करते."

" काही गरज नाहीये. माझं मी करते. तू अजून जा कोणाला तरी बोलून ये. "

आईच्या पारा शांतता करण्यासाठी तीने आईच्या गळ्यात हात घालून म्हटले, " मी पुढच्या वेळी नक्की काळजी घेईन बोलाताना आणि ते आले की मी त्यांची माफी मागेन. "

हे ऐकून शांत झालेल्या आईने तिच्या समोर पोलपाट आणि मळलेली कणिक दिली आणि बाहेर निघून गेली. आई न बोलता गेल्यामुळे ती विचार करू लागली, " आपण खूपच चुकीचे वागलो का ?  आता मी तरी काय करणार?  मला परवाच मुक्ताने सांगितले की, असे फोन येतात अन् मुलगी बघून बोलायला सुरूवात करतात. म्हणून हे मी बोलले. आता माझं काय चुकल ? या विचारात पोळी लाटून तव्यावर टाकली अन् ती जळायला लागली तरी लक्ष नव्हतं.

तेवढ्यात दादा पाणी प्यायला आला तर त्याचं लक्ष गेलं म्हणून त्याने " राधा, अगं पोळी बघं" असं म्हणून ती पोळी तव्यावरून खाली काढली.

राधा भानावर येऊन म्हणाली, " क्षमस्व, अरे लक्षातच आलं नाही. "

" अगं लक्ष देऊन  करं . नको एवढा विचार करू. पुढच्या वेळी जर लक्ष ठेवून बोलं. " डोक्यावर थोपटून बाहेर निघून गेला.

राधा ने सगळ्या पोळ्या करून तिने ओटा आवरायला घेतला. स्वयंपाक घरातील काम करून अभ्यास करायला गेली.

चार वाजता अमोद नंदनच्या केबिनमध्ये आला ,"  नंदन चलं फोन करून घेऊ सगळ्यांना म्हणजे मला लवकर घरी जाऊन तू जो घरी फोन करून  उद्योग केलाय ना तो निस्तरावा लागेल. "

" मी नाही केला तुझ्यामुळे झालाय. ते जाऊदे आधी मला सांग जोशींच्या फाईल च काय झाले ते?  आपल्याला जायचा आधी पूर्ण करायचयं. ते उद्या येणारेत सकाळी १० वाजता. "

थोडा वेळ दोघही आँफिस चं काम करत होते. त्यांच काम पूर्ण झाल्यावर नंदन ने रामू काकांना काँफी आणायला सांगितले.

काँफी पिता पिता अमोद म्हणाला, " मला जरा आपण कुठे, कसं फिरणार आहोत हे सांगतो का ? किती दिवस ?
आँफिसचं काय करणार आहेस ?"

" अरे , आँफिसला चार दिवस सुट्टी आहे. उगाच आईला सांगितलय तू आँफिसला जाऊन बस.  आणि..."

नंदनच्या फोनची रिंग वाजली. म्हणून नंदन फोनवर बोलत होता. अन् अमोद आता तिला काय सांगायचं याचा विचार कर होता. आता हा पण लवकर सोडत नाही. नाहीतर तिला आता भेटून जरा समजवलं असतं. पण...

" अमोद , आपण परवा सकाळी सात ला निघतोय. आता श्रीकांतचा फोन आला होता. आपण गणपतीपुळे म्हणजे कोकणात जातोय. चार दिवस. आता कळलं. जा आता तयारी कर. आणि घरचं पण सांभाळ " असं म्हणून नंदन हासायला लागला.

" तू हास , तू पण सापडशील माझ्या तावडीत कधीतरी.  आता हासून घे. चलं मी जातो. " असं म्हणून अमोद बाहेर आला. आता पहिले तिला भेटतो मग आई ला समजवतो. आज माझं दोन्हीकडून लोणचं. या नंदनच्या ना... तुला भेटू दे कोणी मग बघच मी काय करतो ते.

नंदन आँफिस काम आवरून घरी आला. आल्या आल्या, " आई आई.... "
"  आलास . दमलं माझं पिल्लू . जा आवरून ये मग गरम गरम नाष्टा देते. "
" हो येतो ना. " इकडेतिकडे बघत " आई , प्रिया कुठे गेली ग? "
" मैत्रिणीकडे गेलीय येईलच ती पण ."
" बरं. येतो मी आवरून. "

" राधा, ऐ राधा, रोहन, रोहन..... "
आई दोघांना जेवायला बोलवत होती. पण ते काही येईना म्हणून आईने परत जोरात आवाज टाकला. या आवाजबरोबरच दोघही हजर.
" अरे , चला जेवायला. पान वाढलीयेत. "
" अग. अहो आई येतोच होता ना आम्ही. किती ओरडते. "
" तू गप.... " वाद वाढण्याआधीच बाबा म्हणाले, " असो. चला जेवायला. काय रे रोहन? त्यांचा फोन येणार होता ना?"

" हो येईल. करतो म्हणालेत रात्री. "

" बरं. मी आज आपल्या जोशी गुरूजींना राधा साठी स्थळ बघायला सांगितले आहे. "
" अहो ,बाबा. आताच. तीचे शिक्षण तर होऊ दे पूर्ण. " रोहन म्हणाला.

" अरे. शिक्षण पूर्ण झाल्यावरच लग्न करायचय पण आतापासून सांगितले म्हणजे बघ बघ स्तोवर  जाईल एवढं वर्ष. "

राधा हे सगळं बोलणं शांतपणे ऐकत होती आणि एकीकडे जेवत होती.

" पण बाबा, तिला विचारले का ,आता लग्न करायचय का नाही ते ?"

" अरे नाही, आताच विचारतो, बोल गं राधा तुझं काय मत आहे ते "

बघुया पुढच्या भागात काय उत्तर देतीय ते